Skip to main content

आहे का कोणी ?

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 14/06/2011 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
अमरजीतसींग हा आर्थिक क्षेत्रात फार मागे, मात्र बौद्धिक क्षेत्रात नवनवी शिखरे पादाक्रांत केलेला आणि नव्या शिखरांची स्वप्ने रंगवणारा विद्यार्थी. ह्या वेळच्या बारावीच्या परीक्षेत ह्या विद्यार्थ्याने ६०० पैकी ५७८ गुण मिळवले. येवढेच करून न थांबता आज लागलेल्या CET च्या परीक्षेत त्याने २०० पैकी १९२ गुण पटकावून घवघवीत यश संपादन केले. पण आता पुढील शैक्षणिक खर्चाचे काय? घरच्या आर्थिक अडचणीतून मार्ग काढून तो पुढे शिकू शकेल ? का हि बुद्धिमत्ता झाकोळून जाणार ? हे प्रश्न मनात उभे राहतं असतानाच तुमच्या आमच्यातूनच एक मदतीचा हात पुढे येतो आणि त्याच्या पुढील चार वर्षाच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलतो.

' वर्षा सहल - ०१ - जुन २०११

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 14/06/2011 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
चिंब भिजलेले.... तुम्हाला हे गाणं माहितच असेल ना, चिंब भिजलेले झाडाखाली बसलेले.. चिंब भिजलेले झाडाखाली बसलेले.. काय नाही माहीत, असं कसं होईल, एवढं फेमस गाणं अन माहीत नाही, बघा बघा आठवा, छान पाउस पडतोय, आणि आजुबाजुला हिरवाई आहे, पाना पानातुन थेंब टपकताहेत आणि लांब कुठंतरी नदीच्या उफाणाचा आवाज येतोय, नेहमी करपट वाटणारे दगड पण जिंवत वाटतात, आणि त्यावेळी मनात हे गाणं घुमायला लागतं.. चिंब भिजलेले झाडाखाली बसलेले.. चिंब भिजलेले झाडाखाली बसलेले.. नाही आठवलं अजुन, अवघड आहे मग...

रावण

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 13/06/2011 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
१) रामायणातील लढाई संपवायची रावणाला इच्छा होती . त्याला स्वतःच्या कृत्याचा पश्चाताप झाला होता. पण एक प्रश्न पडल्यामुले समेट होऊ शकला नाही. माफी कुठल्या तोंडाने मागायची? २) रावण शाळेत असताना त्याला नेहमी मागल्या बाकावर बसवायचे. कारण पुढच्या बाकावर रावण बसला की कोनालाच फळ्यावर लिहीलेले दिसायचे नाही ३)रावणाचे डोके दुखू लागले. त्याला डॉक्टरानी झेन्डू बाम दिला.

मासे २८) करंदी

लेखक जागु यांनी सोमवार, 13/06/2011 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळ्यात करंदी भरपुर आणि चांगली येते. त्यामुळे करंदी आणि आंब्याची कढी हे कोम्बीनेशन चांगले जमते. करंदी म्हणजे छोटि कोलंबीच. पहिला कोलिम मग जवळा मग करंदी असा ह्यांचा क्रम करंदीचे कालवणही करतात. त्यातही कांदा घालतात. आळुवडीतही करंदी घालतात. करंदी पुलावही चांगला होतो. ही आहे करंदी.

Android फोन वर मराठी वेबसाईट्स कशा पहाव्या?

लेखक आदिजोशी यांनी सोमवार, 13/06/2011 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
सद्ध्याच्या माझ्या फोन मधे देवनागरी फाँट दिसत नाही. सद्ध्याचा फोन कुठला ह्याला महत्व नाही. लवकरच Android फोन घेणार आहे. त्यावर मराठी साईट्स, ब्लॉग्स वाचता यावेत अशी इच्छा आहे. त्यासाठी काय करावे लागेल? कुणाला अनुभव आहे का? कुणी ह्या बाबतीत मदत करू शकेल का?

घरगुती साजूक आणि रवाळ तूप

लेखक स्वरालि यांनी सोमवार, 13/06/2011 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
(देशा बाहेर राहताना साजूक तूप बनवणे जमत नाही, त्यांच्या साठी) १. LURPAK नावाचे (unsalted) बटर मिळते. (कोणत्याही SUPERMARKET मध्ये FROZEN सेक्शन मध्ये दिसेल. 250G चा एक CUBE मिळतो). २. त्याला जाड बुडाच्या भांड्यात घेवून, GAS वर कढत ठेवा. (साधारण १५-२० मिनिटे, मध्यम आचेवर). ३. मधून मधून ढवळावे (खाली लागू नये म्हणून, पण तुम्हाला हि खाली लागलेली खरड नुसती खायला आवडत असेल तर जरूर खाली लागून द्यावे...). त्यानांवर GAS बंद करा. आणि तूप तसेच ठेवून द्या.

मोल्टन लावा केक

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 13/06/2011 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १/२ कपपेक्शा किंचित जास्त किंवा ४ आऊंस बेकिंग चॉकलेट १/२ कपपेक्शा किंचित जास्त किंवा ४ आऊंस अनसॉलटेड बटर १/३ कप साखर २ अंडी १/४ कप मैदा . पाकृ: बेकिंग चॉकलेटचे बारीक तुकडे करून डबल बॉयलर वापरून वितळवून घेणे .( डबल बॉयलर म्हण्जे एका मोठया भांड्यात पाणी घेऊन उकळ्णे व त्यावर दुसरे भांडे ठेवून त्यात चॉकलेट घालणे म्हण्जे गरम पाण्याच्या उष्णतेने ते वितळेल .)

घेऊ कसा उखाणा (तिकडम)

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 13/06/2011 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
तिकडम सगळे जण आग्रह करतात लवकर नाव घ्याना तोंडात लाडुचा बकाणा घेऊ कसा उखाणा? . , . . शिकावू डेंटीस्टने- ढिली बनवली कवळी दात वाजती टणाणा मधे अडकून जीभ- करतेय नुस्ता ठणाणा घेऊ कसा उखाणा? . . . . पहिल्यांदा पडली टाळी, दुसऱ्याचा झाला हशा तिसरा सपशेल उताणा चौथ्याचा जिकर केला, तर लोक म्हणले हाणा घेऊ कसा उखाणा? ..........................................................
काव्यरस