Skip to main content

(भाव(खावू)गीत):फेसबुकमुळे

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 28/11/2011 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
(भाव(खावू)गीत):फेसबुकमुळे
तो: जग हे आभासी कोणा न कळे ती: (हो रे, ते खरे, पण) तु अन मी जवळी आलो फेसबूकमुळे ||धृ|| तो: तुझा आयडी होता आयडी हा खरा ती: तुझ्याच आयडीमुळे तुला शोधीला मी बरा तो: होताच लॉगलाईन तेथे प्रित आपली जुळे ||१|| तो: आठव पोस्टला माझ्या केलेस तू लाईक ती: त्यानंतर आपण कितीक फिरवीली बाईक तो: फोटो तुझा आता डिलीट करून टाक गडे ||२|| ती: नकोच फेक आयडी आता नवे नवे ते करणे तो: नकोच तसलेच फोटो पाहून उगाचच झुरणे ती: दोन आयडी नको आता एकच आयडी पुरे ||३|| ती: होईल रे आता स्टेटस अपडेट एकदा तो: नकोच
काव्यरस

शोध रेसिपी चा

लेखक फोलपट यांनी सोमवार, 28/11/2011 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
गदग ला गेले असताना तान्दुळ आणि उडिद डाळिबरोबर चुरमुरे घालुन केलेले जाळिदार डोसे / आम्बोळ्या खाण्यात आले. पाकक्रुति शोधत आहे. कोणाला माहित आहे का?

'सह-गान' (विदुषी वसुंधरा कोमकली- कलापिनी कोमकली)

लेखक चैतन्य दीक्षित यांनी सोमवार, 28/11/2011 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
.... 'चैत्या, अरे तुम्ही चेन्नईत असून किती रे भाग्यवान?' अशा वाक्याने बंगलोरमधली एक मैत्रीण मला पुढे एकही अक्षर उच्चारू न देता फोनवर सुरू झाली ! मागच्याच आठवड्यात शुभा मुद्गलांचं गाणं ऐकायला गेल्याचं मी तिला सांगितलं होतं. आणि तिने मला या आठवड्यात चेन्नईत होणार्या श्रीमती वसुंधरा कोमकली आणि कलापिनी कोमकली यांच्या 'सह-गान' बद्दल सांगायला फोन केला होता. माझ्या पत्रिकेत त्या दोन आठवड्यात 'संगीत-घबाड' योग असणार खास ! आधीच्या आठवड्यातली शुभा मुद्गलांची चांगली अडीच तास रंगलेली मैफल अजून कानात घुमत होती.

शाळेची वेळ

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 28/11/2011 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील बहूतेक शाळा ह्या दोन सत्रात भरतात. एक सकाळ सत्र व दुसरे दुपार सत्र असली त्यात विभागणी असते. विद्यार्थीसंख्येत वाढ झाल्याने असे करावे लागते. या शाळांत प्राथमिक व माध्यमिक शाळा येतात. सकाळच्या शाळेची वेळ साधारणत: सकाळी ७ ते १२ व दुपारच्या शाळा ह्या दुपारी १२ ते ५:३० ह्या वेळात असतात. सकाळ सत्राच्या विद्यार्थ्यांना शाळा संपवून दिवसभर मोकळा वेळ मिळतो. ते विद्यार्थी या वेळेत घरी जावून, ताजेतवाने होवून दुपारच्या दरम्यान एखाद्या शैक्षणीक वर्गाला जावू शकतात. फावल्या वेळेचे छंद, वाचन, घरकाम करू शकतात. एखादा गरजू विद्यार्थी एखादे काम करून हातखर्चाला पैसे मिळवू शकतो.

भंगार, डबडा, पंचर आणि अजुन ही काही !!

लेखक सुहास.. यांनी सोमवार, 28/11/2011 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्व-प्रकाशित वपुंच एक वाक्य आहे, की माणूस प्रेमात पडला रे पडला की सर्वात प्रथम काय करतो ते म्हणजे कविता आणी त्यांनी अशीच एका नवकवीची (आनंद बक्षी ..आपल हे..नक्षी...आपल हे..पक्षी : नव प्रेमीची ) कविता ऐकविली. ' देइन मी तुला इडली ' ' तु दे मला डोसा ' ' पाहिन कोणी आपल्याकडे ' ' तर देइन त्याला ठोसा ' अर्थात हे कितपत सत्य आहे ते मला माहीत नाही आणि करुन घ्यायचे पण नाही !

क्रांतीतै चे अभिनंदन

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 28/11/2011 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपावरील सदस्या क्रांतीतै हिला विदर्भ साहित्य संघातर्फे देण्यात येणाऱ्या वार्षिक साहित्य पुरस्कारांत नवोदित लेखनासाठीचा पुरस्कार 'असेही-तसेही' या गझलसंग्रहासाठी जाहीर झाला आहे. पुरस्कार दि. १४ जानेवारी २०१२ रोजी विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापनदिनी वर्धा इथे प्रदान करण्यात येणार आहे. रोख रु. ५०००/- आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.