Skip to main content

सिंदबाद...

लेखक मन यांनी बुधवार, 30/11/2011 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
सिंदबाद... एक वेडा खलाशी.समुद्रावर जातो म्हणून खलाशी म्हणायचं. वृत्ती तीच, भटक्याची,प्रवाशाची. अमुक ठिकाणी "पोचणं" हे त्याचं उद्दिष्टच नसतं. त्याला फक्त तिथं "जाण्यात" मजा असते म्हणून जायचं असतं. हरेक सफरीत काहितरी वेगळं सापडेल म्हणून थेट नौका अथांग समुद्रात फेकणारा तो सिंदबाद. इतर खलाशी "बाप रे वादळ येतय" असं म्हणताना हा "अरे व्वा! वादळ येतय " शिडांच्या जुळजुळवीला अफाट उत्साहाने लागणारा पठ्ठया. वादळातून नाव काढल्यावर "वाचलो", "सुटलो" असे म्हणण्यापेक्षा "कस्ला थरार होता हा." असे म्हणून रोमांचित होणारा व रूढ जगाच्या दृष्टीने गाढव.

आवाहन: मराठीतील वाचनीय पुस्तके कोणती?

लेखक amit_m यांनी बुधवार, 30/11/2011 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतील वाचनीय पुस्तके कोणती? पुस्तकांबद्दल योग्य माहिती नसल्याने महाजालावर पुस्तके खरेदी करताना खुपदा गोंधळ होतो. जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे. कथासंग्रह, अनुवादित, कादंबरी, ललित, चरित्र-आत्मचरित्र, अनुवादित ई. प्रकार चालतील.

गुपित

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी बुधवार, 30/11/2011 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
हे चिमुरड रोप दिवसभर आकाशाकडे तोंड करून काहीतरी बोलत राहतं ती भली मोठी निळी छत्री त्याच्याच मालकीची जणू ते सुद्धा खुशाल गोंजारतं त्याची सगळी गुपितं, हळूच दडवतं आपल्या पांढ-या शुभ्र दाढीत. आणि रात्री आपल्या प्रेमळ हातांनी झोके देत निजवतं त्याला अलगद. सकाळी उठून हे वेड पोर त्या छत्रीकडे बघून तोंडभर हसतं कोणास ठाऊक काय चालत दोघांच आपल्या आपल्यात… पण रोज सकाळी मला दिसते माझी बाग फुललेली!
काव्यरस

कोलावेरी डि

लेखक मिश्रेया यांनी बुधवार, 30/11/2011 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
रजनिकान्त च्या जावया ने'धनुष' ने गायलेले 'कोलावेरी डी' अर्थहिन असुन ही ऐकायला छान वाटते. त्याचे गाणे बघायला हि छान वाटते, गाणे शुट करताना पहायला मजा वाटली. ते इतके हिट झाले आहे की लगेच त्याचे मराठी व गुजराती वर्जन हि निघाले. छान च आहे. एकदा तरी ऐकावे. हल्ली काय हिट होइल आणी काय फ्लॉप होइल काही सान्ग्ता येत नाही. आधि 'सेनोरिटा' (ZNMD) हि असेच हिट झाले व त्याचे मराठि वर्जन हि लगेच आले.

कुपन मशिन

लेखक मिश्रेया यांनी बुधवार, 30/11/2011 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
आता ATVM मशिन चा वापर वाढावा म्हणुन रेल्वे ने कुपन मशिन बन्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या आधी त्यानी ह्या ATVM मशिन मुळात चालु आहेत का हे तरी पहावे न, घाइ च्या वेळी दोन्ही मशिन चा काहि उपयोग होत नाही. शेवटी कुपन वर स्टेशन वर तिथला शिक्का मारुन घेण्या शिवाय पर्याय नसतो. प्रत्येक स्टेशन वर दोन्ही मशिन आहेत, पण कार्यरत आहेत का?

प्रेयसी

लेखक विवेकखोत यांनी बुधवार, 30/11/2011 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
किती नाजूक ती लाजते लाजत माझ्या कडे बगते तुझ्या हसण्याने संजीवनी मिळते तुझ्या असण्याने शांतता मिळते माझे आयुष्य आता बदलले सुंदर तैलचित्र मनी जाहले किती तू अशी दूर राहणार किती ह्या काळजा जाळणार तुझा दुरावा आता सहन होत नाही जीवाची घालमेल आता बघवत नाही
काव्यरस

जीवन असेच पुढे सरकत असते...!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 30/11/2011 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
पहाट झाली कोंबड्याने बांग दिली मग चिमण्या पाखरांचा कलकलाट ऐकू आलां सायकलची घंटी वाजली चला पेपर आला. हे रोजचेच असते सकाळ झाली की उठणे भाग पडते चहाचा गंधही झिरपत येत असतो चहा पितापिता पेपर चाळत बसतो संप ,अपघात ,उपोषण ह्यांच्या शिवाय तो काय वाचतो ...? सिनेमाची जाहिरात बघत नाही घरबसल्या सिनेमा बघता येतो कोणताही महागाई तर वाढत असते नको ईतकी खिशाला पडलेले भोक वाढत असते तिळातिळाने....
काव्यरस

वाट !!

लेखक स्पंदना यांनी बुधवार, 30/11/2011 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
वाटा तश्या अनेक असतात. प्रत्येकाची आपापली वेगळी असते. वाटा फ़ुटतात, वाटा हरवतात, वाट मिळते, वाट सापडते. वाट पाहिली जाते, वाट दावली जाते, अन वाट लावलीही जाते. कधी कधी आपल्याआपण वाट लागतेही. वाटा चोखाळल्या जातात, जोखल्या जातात. वाट वळणाची असते, वाट निसरडी असते, कधी वाटा वेगळ्या होतात, कधी वाट वाकडी करुन येण होत, अन कधी वाकड्या वाटेला जाण ही होत. कुणी आपापल्या वाटेने जात असतो, कुणास वाट दाखविणारा भेटतो, कुणी वाट अडविणारा असतो. कुणी वाट राखतो, कुणी वाट मारी करतो. कधी कधी वाटेला जायच नसत.गप आपापली वाट धरायची असते. वाटेला धरुन चालायच असत. तश्या वाटा तुम्ही आम्ही खुप पाहिलेल्या असतात.