Skip to main content

बासरीविषयी थोडेसे !

लेखक चैतन्य दीक्षित यांनी सोमवार, 09/01/2012 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
बासरी हे भगवान् श्रीकृष्णाच्या हातात शोभलेलं एक लोभस वाद्य. कान्ह्याच्या बासरीचे सूर उमटावेत आणि गोपिकांनीच काय गाई-वासरांनीही देहभान विसरून जावं इतकी ह्या बासरीची किमया. अर्थात् ती बासरीची किमया की कान्ह्याची हे सांगणं अवघडच. ह्या बासरीविषयी एक कथा वाचण्यात आली ती अशी की कृष्णाचं बासरीवरच सर्वात अधिक प्रेम आहे हे जाणून गोपिका बासरीवर चिडून असायच्या. एकदा त्यांनी बासरीला विचारलंच की आम्ही असताना कान्ह्याचं तुझ्यावर इतकं प्रेम कसं? तर बासरीने उत्तर दिलं की मला एकूण सात छिद्रं आहेत. त्यातल्या ६ छिद्रांतून षड्रिपू केव्हाच बाहेर गेलेले आहेत.

मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१२

लेखक सुशान्त यांनी सोमवार, 09/01/2012 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने 'मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१२' आयोजित करण्यात येत आहे. त्यासंबंधीचे संस्थेचे निवेदन इथे दिले आहे. -------------------------------------------------------------- संगणकावर मराठीतून माहितीचा देवाणघेवाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनातील विविध विभागांकडे असणारी माहिती लोकांना सहज उपलब्ध व्हावी ह्यासाठी प्रयत्न होत आहेत. कला, क्रीडा, संस्कृती, विज्ञान, अर्थव्यवहार अशा विविध विषयांवरील माहिती आज मराठीतून संगणकावर उपलब्ध होऊ लागली आहे.

शिशिराची चाहूल

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 09/01/2012 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
पाने गळू लागली आणि झाडांवर पक्षी दिसू लागले. म्हणजे पाने कमी झाल्यामुळे ते झाडावर येत आहेत असे मला म्हणायचे नाही तर पाने कमी झाल्यामुळे ते दिसू लागले. फुले गळाल्यामुळे फुलातले किडे खाणारे छोटे पक्षी गायब झाले आणि त्याची जागा घेतली झाडांच्या टणक शेंगा खाणार्‍या पक्षांनी. मैनांनी, आणि पोपटांनी. अर्थात एकदा त्यात एक हळद्याही घुसला होता. त्याचा सुंदर पिवळा रंग बघताना भान हरपते. त्याचाही फोटो टाकला आहे. पोपटांना चेहरा असतो आणि त्यावर भाव उमटतात हे आपल्याला हे फोटो बघितलेत तर उमगेल.

आला दिवस गेला दिवस ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 09/01/2012 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
आला दिवस गेला दिवस कसा दिवस निघून जातो घरी बसलो म्हणून दिवस काही थांबत नसतो एके दिवशी म्हणालो त्याला थांब जरासा थोड्याशा गप्पा मारू जरा माझे-तुझे जुने दिवस आठवीत बसू हलकेच म्हणालो त्याला तिच्यावर माझे प्रेम होते हे तुला माहित होते तुझे सगळे भन्नाट होते माझे मन झुलत होते ती तर बोलूच नको काळजाचे गाणे होते हसला दिवस लाजला थोडासां अरे थांबरे जरासा कटाळलास कारे बाबा ..? तिला आठवताना किती बरे वाटते तिला आठवताना शप्पत तुझी आठवण मात्र नक्की असते उदासला दिवस हलकेच निघाला म्हणालो जरा फ्रेश होण्यासाठी तुझ्यासाठी चहां टाकतो मग जराश्या गप्पा मारू जरा जुने दिवस आठवीत बसू त्याला थां
काव्यरस

एक शंका

लेखक शरद यांनी सोमवार, 09/01/2012 08:13 या दिवशी प्रकाशित केले.
प्रा. यनावाला यांची निरिश्वरवादी मते ते नेहमीच पोटतिडीकेने मांडत असतात. स्वखुशीने बुडणार्‍या लोकांना वाचवावयाचे प्रयत्न करणार्‍या अशा लोकांबद्दल मला नेहमीच कुतूहल (व आदरही ) वाटत असतो. आमची वर्गवारी निराळी. माझ्याकडे कधीही पूजा नसते पण कोणी बोलावलेच तर आनंदाने जातो, रुपया टाकतो, "प्रसाद छान झाला आहे" असे म्हणून परत एकदा मागून खातो ( घरी आल्यावर बायकोची बोलणीही!) पण कोणाला सुधारावे असे कधीच वाटले नाही. तर सांगत काय होतो यनावालांनी उपक्रमवर असाच एक लेख टाकला व त्या ललित लेखाला चांगले ९७ प्रतिसाद लाभले.

तुम्ही पी एम बनणारच ..

लेखक ajay wankhede यांनी सोमवार, 09/01/2012 06:29 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा आमचे युवराज वदून गेलेत .......त्याला कोणीही रोखू शकणार नाही तेव्हा आम्हा झाला साक्षात्कार खरेच..... चोऱ्या, दरोडे, खून, बलत्कार, जुगार या गोष्टी चालूच राहणार त्याला कोणीही रोखू शकणार नाही. भेसळ, साठेबाजी, नफेखोरी, कर बुडविणे या गोष्टी चालूच राहणार त्याला कोणीही रोखू शकणार नाही. भ्रष्टाचार, स्वीस बँकेतील काळा पैसा, पैसे, दारू वाटून निवडून येणे या गोष्टी चालूच राहणार त्याला कोणीही रोखू शकणार नाही गावात अमंळ लोड शेडींग कचरा, घाण,रस्त्याचे कडे वरील ....विधी या गोष्टी चालूच राहणार त्याला कोणीही रोखू शकणार नाही शहरात चार दिवसाआड पाणी, पुतळ्यांची गर्दी रस्त्यांवरील खड्डे,....निष्पापा
काव्यरस