Skip to main content

(भा SSSSS सं भा SSSSS सं)

लेखक स्पा यांनी शुक्रवार, 13/01/2012 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: सो...हम....सो...हम!! उपाकर मित्रमंडळींनो, `खाईन मांडे ` नावाने उसळपाव वर वावरणारा त्रस्त समंध गेले काही दिवस, काही महिने कुठे गायब झाला, असा प्रश्न आपणांस पडला असणे साहजिक आहे. अर्थात, हा आपला माझा समज. `तुझ्यावाचून उपा ओस पडलंय रे बाबा, कधी परततोयंस` अशी आर्त साद मला कुणी खव किंवा टपाल हापिसातून घातलेली नाही. उपावर एकाहून एक सरस आणि सुरस संपादक असताना अस्मादिकांची विशेष दखल घ्यावी असे नाही. तरीही अस्मादिक कुठे होते, आणि सध्या काय करतायंत, हे सांगण्याचा हा आगाऊ प्रयत्न. गेले काही दिवस खाजवायला फुरसत नाहीये.

भालदार फेस (माहुली )

लेखक अप्पा जोगळेकर यांनी गुरुवार, 12/01/2012 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्याने भालदार फेसचे फोटो बघितले तेंव्हा हा समिट होणार नाही याचा अंदाज होताच. क्लायंबिंग ग्रेड-३ पिनॅकल आणि त्यातून अंगावर येणारे ओव्हरहँग म्हटल्यावर आणखीन काय होणार ? पण तरीसुद्धा अटेम्प्ट करायचा हे पक्कं ठरवलं होतं. नुकत्याच केलेल्या तेल्बैल्याच्या समिट्मुळे बर्‍यापैकी कॉन्फिडन्स गाठीशी होताच. मी, यतिन नामजोशी, मनोज धारप आणि राजेश पाटील चौघांनी रात्री ३ च्या सुमारासच माहुली माथा गाठला. तीनेक तासांची झोप घेतली आणि उजाडल्यावर नाश्ता करुन डायरेक्ट रॉक फेसच्या खाली धडकलो. यतिन पहिल्या लेज पर्यंत जाणार याची सगळ्यांना खात्री होतीच. त्यामुळे आधी राजेशने आणि मी अटेम्प्ट करावा असे ठरले.

पाकिस्तानी चित्रपट भाग १: खुदा के लिये

लेखक अन्या दातार यांनी गुरुवार, 12/01/2012 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
दहशतवादाचे परिणाम काय फक्त आपल्यालाच सोसावे लागतात का? दहशतवादाची जिथून सुरुवात होते त्यांना कधीच काही चटके बसत नसतील का? सगळेच पाकिस्तानी दहशतवादी असतात का? अर्थात चित्रपटाची ओळख करून देण्याची हि काही पद्धत नसावी. पण हे विचार मनात आल्याशिवाय हा चित्रपट बघू नये. माध्यमांना जर समाजमनाचा आरसा समजत असाल तर नक्कीच या प्रश्नांचा उलगडा होण्यासाठी तरी का होईना हा चित्रपट बघावा. चित्र पहिले: शिकागो, एका हॉस्पिटलमध्ये एक बाई येऊन हुंदके देत रडतेय. चित्र दुसरे: लाहोर, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी एक रॉक कॉन्सर्टची तयारी चालू आहे. अचानक एक जमाव लाठ्या घेऊन येतो, तिथल्या जागेची नासधूस करतो.

मुळ्याच्या पानांची भाजी

लेखक किचेन यांनी गुरुवार, 12/01/2012 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ्याच्या पानांकडे भाजी म्हणून मी कधीच बघितलं नव्हत.काळ भाजीवाला मुळ्याच्या पानांच्या गड्ड्या स्वस्तात विकत होता.मी सहज विचारला ह्याचा काय करतात तो बोलला लसून मिरची टाकून मस्त भाजी होते.मी सहज म्हणून एक गद्दी घेतली आणि भाजी केली.पाककृती खाली देतीये.तुम्हीही करून पहा. साहित्य: १ मुळ्याची गड्डी, ५-६ मिरच्या, एक लहान चमचा आल्याचा कीस,१ चमचा जिरे, ५-६ लसणाच्या पाकळ्या,१ चमचा हळद,१ चमचा हिंग, चवीनुसार मीठ. पाककृती.: १.

मेथी डाळ !!

लेखक सुहास.. यांनी गुरुवार, 12/01/2012 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
ही आधी केलेली स्वयंपाक घरातील लुडबुड http://www.misalpav.com/node/16330 http://www.misalpav.com/node/13709 http://www.misalpav.com/node/13909 http://www.misalpav.com/node/14007 आणि दिपालीदेवी आणि गणपाशेफ यांच्या प्रेरणेवरून. विनंती : पाकृ करताना फोटो काढण्याच्या त्रेधा-तिरपटी साठी लेखकांस क्षमा असावी भारतीय आहारपध्दतीत डाळी ला अन्यनसाधारण महत्व आहे, (लोक घर की मुर्गी दाल बराबर म्हणत असले तरी जर का

पुन्हा पाकिस्तान

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 12/01/2012 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या आपल्या शेजारी असलेल्या दोन्ही राष्ट्रातील घडामोडी चिंताजनक आहेत पाकिस्तानातील राष्ट्रपती झरदारी हे दुबई भेटीला गेले आहेत. त्यांच्या राजिनाम्याचा प्रश्न ऐरणीवर आहें. नव्याने निवडणूका होण्याची शक्यता आहे पंतप्रधान गिलानीनी संरक्षण सचीव खलीद नईम लोढिंची हाकालपट्टी केली आहे. लश्कर प्रमुख जनरल कयानी यांच्या विरोधात हा इशारा आहे माजी लश्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ हे पाकीस्तानात पुन्हा परतण्याची भाषा करताहेत. अमेरीकेचे पाकिस्तानचे संबन्ध तणावग्रस्त आहेत. चीन ने आपल्या विस्तारवादाची नव्याने नांदी तैवान व तेथील समुद्रात केलेली आहे. अमेरीकेला आर्थीक मंदीने ग्रासले आहे.

सामोसा/समोसा चाट

लेखक सानिकास्वप्निल यांनी गुरुवार, 12/01/2012 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य सामोसा/समोसा भाजी: ४ बटाटे उकडून त्याच्या बारीक फोडी करुन घ्याव्यात १/२ वाटी उकडलेले मटारचे दाणे २ टेस्पून आले + हिरवी मिरची + लसूण पेस्ट १ टीस्पून धणेपूड १/२ टीस्पून जिरेपूड १ टेस्पून गरम-मसाला १ टीस्पून आमचूर पावडर (फोटोत नाही आहे पण पुढे कृतीत वापर केला गेला आहे ) १/२ टीस्पून जीरे मीठ चवीनुसार ५-६ कढीपत्ता तेल . पाकृ: एका भांड्यात तेल गरम करुन जीरे, कढीपत्ता,