Skip to main content

INDIA UNBOUND

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 25/02/2012 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
इतिहास आपण सगळेच शिकतो. इतिहासाची शालेय पुस्तके असो वा कोणा अभ्यासकाने कागदपत्रे मिळवून लिहीलेला राजकीय इतिहास असो, क्वचितच त्यातून सामान्य माणसाच्या आयुष्यावरचा परिणाम दिसतो. त्यामुळे इतिहासावरून एक सामान्य माणूस म्हणून काय शिकायचे असाच प्रश्न पडतो. संपूर्ण शाळेत आणि इतर अवांतर वाचनात भारताचा इतिहास मी वाचला. एक निसर्गसंपन्न, संस्कृतीचे पाळणाघर असलेला आणि तत्त्वज्ञानाचा गाभारा असलेला देश म्हणून भारताच्या उज्ज्वल भूतकाळाचा उदोउदो वाचला, इंग्रजांची तथाकथित जुलमी राजवट आणि त्याविरुद्ध दिलेला तेजस्वी लढा, मोठमोठे तत्त्वनिष्ठ नेते आणि क्रांतिकारक यांचे बलिदान हे सगळं वाचलं.

चाळीशी ……… गद्धे पंचविशी

लेखक यशोधन वर्तक यांनी शनिवार, 25/02/2012 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यात अनेक वाढ दिवस साजरे झाले . चाळीशीत गेलेल्या सोबत्यांचे अभीनंदन सार्वजन मिळून करत आहेत.खरच चाळीशी झाली की आपला या जगाकडे बघायचा नजरियाच बदलतो नाही ! जन्माला आल्या पासून ते शाळेत जायला लागे पर्यंत आपण तसे सर्व दृष्टीने तसे परावलंबीच असतो. शाळेत जरा इतर मुलां मध्ये मिसळल्यावर आपल्याला थोडीशी मतांची शिंगे फुटायला लागतात . मैत्री भांडण राग लोभ अशी भावनांची आंदोलने याच वयात सुरु होतात ती अगदी कॉलेज मध्ये जाई पर्यंत पुरतात. साधारणतः शाळेत असताना आपले आयडॉल्स क्रिकेटपटू सैनिक , लेखक होते. चार्ली चाप्लीन , लॉरेल हार्डी , मिकी माउस , आपल्या आवडी होत्या .

!!......" चिवड्यात लाडू "........!!

लेखक जेनी... यांनी शनिवार, 25/02/2012 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
ऐन दिवाळीतले दिवस ..सगळीकडे फटाकड्यानचा आवाज. नुस्त वातावरण एकदम तजेलदार . दारादारात रांगोळ्यांचे सडे ..आकश्कन्दिलान्चा हलकासा प्रकाश . सगळ उजळून निघाल होत .वहिनीही नुकतीच रांगोळी काढून घरात आली होती .स्वयंपाक घरात ..काहीतरी चालू होत तीच आणि आईच .दिवाळीची बहुतेक दुसरी संध्याकाळ असावी .आईने दारात खिडक्यांवर ..देवघरात ..अगदी सगळीकडे पणत्या लावल्या होत्या .

मूळ

लेखक अज्ञातकुल यांनी शनिवार, 25/02/2012 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
गुंता गुंता फांदी फांदी शकुनाची ना करिते कसली अनावधानी चिंता येती जाती ऋतु-पर्णे मोहोर अवघे अव्यक्त तळातिल; "मूळ" गातसे गीता निष्काम कर्म गत युगायुगांचे गीत निश्वासांप्रति श्वासांस खेळवी प्रीत उधळून गंध रंगात उमलवी काया बघ निसर्ग कैसा जगण्याचे संगीत मोहात अडकले पाश पृथक जन्मांचे विसरले गमक रुजण्यातिल; वंश मनूचे मिथकांचे रांजण स्वैर उधळवी माया ओंजळी रिकाम्या स्वप्न काय कामाचे ? सौहार्द मुके रे जगा जगू द्या सारे शिणु नका; मिळूनी; वस्त्र विणू या न्यारे भंगूर क्षती मग चिरंजीव होतील पुन्हा रे ऋतुमानपरत्वे; आपले आपण; वळतिल बुजरे वारे ......................अज्ञात
काव्यरस

कृपाछत्र हरपले!

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 25/02/2012 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12027781.cms अलीकडे कृपाशंकर नामक महात्म्याचे नाव वारंवार चर्चेत येते आहे. ह्या सद्गृहस्थाने घरावर सोन्याची कौले घालायचेच बाकी ठेवले होते. अशा अचाट आणि अफाट रकमेच्या उलाढालीने कोर्ट (म्हणे) चक्रावून गेले. हे काही नवे नाही. ही विभूती भ्रष्टाचाराकरता कायमच चर्चेत होती. पण नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकात काँग्रेसचे पानिपत झाल्यामुळे सोनियाच्या कौलावरील सोनियाचे कवच हटले.

निवडणुक...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 25/02/2012 05:13 या दिवशी प्रकाशित केले.
सुकलेला का होइना..?पण कुणीसा गाडीला घातला होता गजरा या निमितानी मी माझ्या.. गाडीलाच केला मुजरा काय सालं नशिब हीचं..? पाहिलं तरी फिदा होतात आंम्ही कडक कपडे घालतो तेंव्हा,कोण जाणे या कुठे जातात..? जरी असल्या या आजुबाजुला तरी, नळाला पाणी यावं तश्या बोलतात आल्याच समोर तर नंतर मग, मागे जाऊन कुजबुजतात. ''हँडसम दिसतोय गं...हम्म्म्म, पण कपड्याचा चॉइस बरा नाहीये दिसतोय जॉन अब्राहम सारखा.., पण अ‍ॅटिट्यूट काही खरा नाहीये..'' ''ए,,तुला काय करायचाय अ‍ॅटिट्युट..? नुसतं नाव विचार ना..?'' ''शी...!नाव काय विचारायचं..? त्यापेक्षा डायरेक्ट फोन नंबर घे ना..!'' असे पिछाडीला संवाद घडुन सैन्य
काव्यरस

झटपट नाश्ता-गुळ पोहे.

लेखक ज्योति प्रकाश यांनी शनिवार, 25/02/2012 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-१)जाडे पोहे. २)खवलेले खोबरे. ३)बारीक किसलेला गुळ. ४)चिमूटभर मिठ. ५)साजुक तुप. कृती :-प्रथम जाडे पोहे धुवून घ्यावे.