Skip to main content

मूळ

लेखक अज्ञातकुल यांनी शनिवार, 25/02/2012 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
गुंता गुंता फांदी फांदी शकुनाची ना करिते कसली अनावधानी चिंता येती जाती ऋतु-पर्णे मोहोर अवघे अव्यक्त तळातिल; "मूळ" गातसे गीता निष्काम कर्म गत युगायुगांचे गीत निश्वासांप्रति श्वासांस खेळवी प्रीत उधळून गंध रंगात उमलवी काया बघ निसर्ग कैसा जगण्याचे संगीत मोहात अडकले पाश पृथक जन्मांचे विसरले गमक रुजण्यातिल; वंश मनूचे मिथकांचे रांजण स्वैर उधळवी माया ओंजळी रिकाम्या स्वप्न काय कामाचे ? सौहार्द मुके रे जगा जगू द्या सारे शिणु नका; मिळूनी; वस्त्र विणू या न्यारे भंगूर क्षती मग चिरंजीव होतील पुन्हा रे ऋतुमानपरत्वे; आपले आपण; वळतिल बुजरे वारे ......................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 791
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया