काही महिन्याखाली रोममध्ये जायचं होतं म्हणून आंतरजालावर मराठी काही माहिती आहे का ते शोधत होतो. अपेक्षेप्रमाणे एक-दोन ब्लॉग तेही युरोप पर्यटनावर सोडले तर काहिच मिळालं नाही. दुसरं म्हणजे पुर्वी जाउन आलेल्या ठिकाणाबद्दल कुणी काही माहिती विचारली तर फोटो सोडले तर माझ्याजवळ काहीच नसतं. मग ठरवलं की आपल्या संदर्भासाठी आणि आठवणीसाठी (इमोशनल कॉलबॅक, यु नो! :)) प्रवासवर्णनं लिहुन ठेवायची. आता लिहिलंच आहे तर मिपावर टाका म्हणून टाकतोय. :)
१. शाफहाउसन
खूप दिवस कुठे फिरायला गेलो नव्हतो, त्यामुळे ह्या विकांताला कुठेतरी जायचं ठरवलं. जवळपासची सगळी ठिकाणं फिरून झाली होती.