मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोणत्या भारतीय क्रिडापटूला भारतरत्न द्यावे?

सदानंद ठाकूर · · काथ्याकूट
जर एखाद्या भारतीय क्रिडापटूला भारतरत्न द्यावयाचे झाले तर ते प्रथम कोणाला द्यावे? पर्याय - १ : हॉकीचा जादुगार ध्यानचंद (२९-८-२००५ ते ३-१२-१९७९) क्रिकेट मध्ये जेवढा डॉन ब्रेड्मन ग्रेट व अव्दितीय तसाच हॉकीत ध्यानचंद. त्याचे गोल करण्याचे कौशल्य वादातीत होते. त्याने एकूण कारकिर्दीत १००० पेक्षा जास्त गोल केले. यापैकी ४०० गोल त्याने आंतराष्ट्रीय सामन्यात केले होते. असे वाचले व ऐकले आहे कि तो सामन्यात सहभागी असेल तर ध्यानचंदचे जादूचे प्रयोग पहावयास अवश्य मैदानात या अशी जाहिरात त्या काळात केली जात असे. १९२८, १९३२ व १९३६ मध्ये त्याने भारतीय हॉकी संघाला ऑलिंपीक सुवर्ण पदक मिळ्वून दिले. त्याचे चेंडूवरील नियंत्रण अफलातून होते, असे म्हणतात कि लोखंड जसे लोहचुंबकाला चिकटून बसतं तद्वत चेंडू त्याच्या हातातील स्टिकला चिकटत असे. त्याने भारतीय सैन्यदलात प्रदिर्घ सेवा केली. वयाच्या ५१ व्या वर्षी तो मेजर म्हणून रिटायर झाला. १९३६ बर्लीन ऑलींपीक नंतर हिटलरने त्यला जर्मनीचे नागरिकत्व व सैन्यदलात अधिकारी होण्याची ऑफर दिली होती ती त्याने नम्रपणे नाकारली होती. पर्याय - २ : विश्वनाथन आनंद (११-१२-१९६९ चा जन्म) १९८८ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी ग्रा. मास्टर किताबाचा मानकरी होणारा पहिला भारतीय बुध्दीबळपटू. वर्ष २०००, २००७, २००८, २०१० व २०१२ पांच वेळा जगज्जेता. म्हणजेच २००७ पासून तो सतत ५ वर्षे चॅम्पीयन आहे. १९९१-९२ मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरःस्काराने सन्मानीत. २८०० चे रेटींग मिळवणारा ज्गातील फक्त ६ बुध्दीबळपटू पैकी एक. बुध्दीबळाच्या सर्व चारी प्रकारच्या स्पर्धेत विजेतेपद मिळवले (एकमेव). पर्याय - ३ : सचिन तेंडूलकर ( २४/४/१९७३ चा जन्म) भारताचा सार्वकालीन ग्रेट फलंदाज. २३ वर्ष क्रिकेट कारकिर्द. १०० आंतराष्ट्र्रीय शतके. कसोटीत सर्वाधीक ५१ शतके. एकदिवसीय सामन्यात सर्वाधीक ४९ शतके. जंटलमन खेळाडू. वरील तिघेही ग्रेट खेळाडू आहेतच, तिघेही भारतरत्न साठी एलिजीबल दावेदार आहेत. पण तुम्ही भारतरत्न पुरःस्कारासाठी वरीलपैकी एकालाच प्रथम निवडावयाचे असल्यास कोणाला निवडाल.

वाचन 3292 प्रतिक्रिया 0