राजकीय पुढाऱ्यांची गाजलेली (विनोदी) विधाने
आपल्या देशातील पुढाऱ्यांमध्ये एका चांगला संवादलेखक लपलेला असतो की काय अशी शंका यावी एवढी जोरदार विधाने त्यांच्याकडून येतात.
जसे की, स्व. प्रभा राव काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष असताना त्यांचे एक विधान फारच गाजले होते.
पक्ष असो वा पक्षी, उडालेले सर्वच एक दिवस काँग्रेस मध्ये परत येतात.
आपले बारामतीचे मोठे साहेबही फार हजरजबाबी आहेत, एकदा लोकसभेत वाजपेयी सरकारवरच्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असताना रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. अन जेवणानंतर प्रस्तावावर मतदान घ्यायचे ठरत होते.
(एखाद्या नवोदित लेखकाचा टांगणीला लागतो जीव)
प्रिय मिपाकरांनो,
अलीकडे आम्ही, मिपावर पुनरागमन केलेल्या नाना चेंगट यांचे दमदार लेख वाचतो. त्यात परासारख्या अनेक जुन्या खोंडांचे प्रत्येक धाग्यावरील प्रतिसाद पाहून अस्वथ व्हायला होते. आमच्या डोळ्यांसमोर मिपावरील त्या नवोदीत लेखकांची आकृती उभी राहते. जुन्या खोंडांच्या एका प्रतिसादासाठी त्यांच्या केविलवाण्या डोळ्यांत गोळा झालेले प्राण, त्यासाठी झालेली त्यांच्या जिवाची तगमग, त्यांच्या सृजनाला न जुमानता सं.मं. क्रूरपणे उडवलेले धागे हे सर्व आमच्या डोळ्यांसमोर उभे राहते.
जुन्या मिपाकरांच्या लेखांवर तुम्ही अगदी मिटक्या मारून प्रतिसादावर प्रतिसाद देता, पण नवोदीत लेखकांना फाट्यावर मारता.
सत्यमार्गा उजळुनी आम्हास तारा बापुजी
अंतराळी कालगंगी अढळ तारा बापुजी
सत्यमार्गा उजळुनी आम्हास तारा बापुजी
पेटत्या हीमालयाची रोजची होई व्यथा
तोफगोळ्यांचा धुमसता नित्य मारा बापुजी
विहिर सुकली रान सुकले ऊष्ण उन्हाच्या झळा
आपुल्या शेळीस आणू कुठुन चारा बापुजी
भ्रष्ट नेते देश लुटती खाटकाची गाय ही
संस्कृतीचे वाजवीती रोज बारा बापुजी
पीक येवो वा न येवो नित्य कर्जे काढली
फाटला घेऊन बोजा सात बारा बापुजी
पाचशेची नोट कोणी काल दारी फेकली
धुंद लोकांच्या सभेचा आज नारा बापुजी
काव्यरस
प्रणब दा - राष्ट्रपती पदावर ?
प्रणब मुखर्जीं ना यु.पी.ए. ने आपले राष्ट्रपती पदाचे उमेदवार केले आहे. प्रणबदा हया पदास योग्य आहेतच आणि म्हणूनच त्यांचे (उमेदवारीसाठी) अभिनंदन.
आजवर मनमोहन सरकारवर आलेल्या पेच प्रसंगातून बाहेर काढण्यात प्रणवदानी आपले कौशल्य दाखवले आहे. अर्थमंत्री म्हणूनही त्याचे काम ( ईतर मंत्र्यांच्या तुलनेत) निश्चित उजवे आहे.
प्रणबदा ना राष्ट्रपती करण्यात सोनियांनी मान्यता दिली हे ही जरा विशेषच आहे. कोणीतरी सैपाकी , पाणक्याला त्या पदावर सोनियाबाई बसवणार असा कयास होता. पण बाईनी शहाणपणा दाखवला. (अर्थात राहुल बाबा ला ही पुढे चाल -कारण आता मनमोहन बाद)
परंतु आता अर्थमंत्री कोण ?
टोल वसुली योग्य की अयोग्य....
गेले काही दिवस राज्य शासनाच्या टोल वसुली वरुन मनसे व राज्य सरकार ह्यांच्यात झगडा चालु आहे. रस्ता बांधणीसाठी लागलेली रक्कम सरकारने टोल वसुलिच्या रुपात वसुल करुन झाली असतानाही सरकार लोंकाच्या खिशातुन अजुनही टोल घेत आहे स्वताचे व ठेकेदारांचे हित संबंध सांभाळण्यासाठी. बर हे टोल वसुल करूनही रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. टोल रुपात घेतले जाणारे रुपये खुप आहेत. पुणा मुंबई एक्सप्रेस वेला टोल आहे रुपये १६५ खाजगी वाहनाना. ईतर वाहनांचा वेगळाच व तोही एका वेळचा.
वितंडगड (तिकोना) - भाग २
तिकोना हा विसापूर-लोहगडच्या अगदी मागच्या बाजूला पवना धरणाच्या बाजूला वसलेला गड आहे. समोर तुंग उभा असून मध्ये पवनेचे अथांग पाणी व हिरवेगार खोरं असे मनोहरी रूप दिसतं. गडावरून पुर्ण मावळ प्रांत आपल्या नजरेच्या टप्पात येतो. तिकोना जरी अवघड श्रेणीतील गड नसला व चढाई सोपी जरी असली तरी थोडी फार काळजी घेत गड चढणे आवश्यक आहे. तुम्ही लोहगड सारखे निर्धास्तपणे येथे वावरू शकत नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे निसर्गाच्या मार्यामुळे गडाची झालेली हानी.
मिसळपाव