होय ( शर्मिला इरोमसाठी ) : सत्चिदानन्दन यांच्या मलयाळम कवितेचा अनुवाद
माझं शरीर आहे
माझा ध्वज अर्ध्यावरचा.
मला पाणी मिळतं
उद्याच्या नदीतून,
भाकरी
वार्याच्या स्वयंपाकघरातून.
माझ्या मेंदूत आहे एक
बंदुकीची गोळी
हिरवीगार
अंतर्ज्ञानी माणसाच्या पोपटासारखी.
माझं नाव आहे
शेवटचं अक्षर माझ्या पुरातन भाषेतलं
शेवटचं उत्तर प्रत्येक कोड्याचं
तात्पर्य प्रत्येक म्हणीचं
ईश्वर प्रत्येक जादुई सुरावटीचा
दुश्चिन्ह...
( सत्चिदानंदन यांनी जयपूर फेस्टिवलमध्ये वाचलेल्या कवितेचा मराठी अनुवाद )
मिसळपाव