Skip to main content

ऊन-सावली नाते अपुले

लेखक जयवी यांनी गुरुवार, 08/11/2012 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
. पानावरच्या दवबिंदूपरी सजते, निसटुनिया विरते ऊन - सावली नाते अपुले कधी हसते अन्‌ कधी रुसते कधी हिरवाईच्या मखमाली भिरभिरते अन्‌ बागडते कधी काहिली, कधी होरपळ कधी पेटुनी धगधगते कधी पौर्णिमेच्या चंद्रापरी चमचमते अन्‌ लखलखते कधी गर्द अवसेच्या राती काळोखातुन पाझरते लडीवाळ कधी मोरपिसापरी हळुच कानी कुजबुजते कधी अनावर प्रपातापरी दुमदुमते अन्‌ कोसळते कधी मौनाच्या बंद क्षणांनी हिरमुसते अन्‌ मुसमुसते कधी शब्दांच्या पागोळ्यातुन गहिवरते अन्‌ रिमझिमते विरहाच्या एकांती नाते उष्ण आसवांनी भिजत
काव्यरस

स्वार्थ..

लेखक राघव यांनी गुरुवार, 08/11/2012 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
स्वार्थामधेच सारा आनंद मानतो मी! निस्वार्थ म्हणविणारा नसत्या भ्रमात आहे! ऐसे अनेक आले.. आले तसेच गेले.. माझी इथेच सत्ता तरीही भरात आहे.. संतांस काय जाते नीती जपा म्हणाया.. नाही सुखास म्हणणे अवसानघात आहे धर्म-अधर्म सारे कोळून प्यायलो मी.. आता मिजास माझी.. तुमची वरात आहे.. -- चघळून रक्त अपुले, कुत्रा सुखावतो ना? आमीष हाडकाचे.. अन्‌ मी सुखात आहे! राघव

खंडोबा मंदिर - मुळगाव, बदलापूर

लेखक सौरभ उप्स यांनी गुरुवार, 08/11/2012 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
खूप इच्छा होती सगळ्यांची नाईट आउट करायची, दसर्यादरम्यान ठरवलेला प्लान कोसळून गेला, ठरता ठरता २७ ऑक्ट ला शनिवारी रात्री जायची मुहूर्तमेढ झाली. मागच्या प्लान पेक्षा काहीजण वाढले पण अन्याने मात्र ऐन वेळी टांग दिली (चालायचंच). कल्याण ला सगळे बाईकस्वार भेटलो, आणि हिरवा झेंडा फडकला.... पेट्रोल भरण्यासाठी मी आणि किसन मध्ये थांबून पेट्रोल पंपावर गेलो, आणि २ जण स्पा ची वाट बघत थांबले जेणेकरून तो पुढे जाऊन चुकामुक नको व्हायला, आणि व्हायचे तेच झाले, स्पांडूराव आपण मागे राहिलो कि काय या विचाराने जे सुसाट पुढे गेले ते आम्हाला गावलेच नाहीत, १५-२० मिन्तानी आम्ही गाड्या काढून पुढे झालो, कारण फोने पण लागत नव

जंबो पास्ता शेल्ल्स सॅलॅड

लेखक Mrunalini यांनी बुधवार, 07/11/2012 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः जंबो पास्ता शेल्ल्स - १०-१२ चिकन - १ कप (उकडुन आणि shreded) क्रिम चिज - १ कप (मी लसुणच्या फ्लेवरचे घेतले होते) स्वीटकॉर्न - १/४ कप चेरी टोमॅटो - ३ चमचे बारीक चिरुन (टोमॅटो मधील गर काढुन टाकावा) गाजर - ३ चमचे बारीक चिरुन बेसील - २ पाने बारीक चिरुन ऑलिव्ह ऑईल - २ चमचे काळि मिरी पावडर - १ चमचा मिठ चवीनुसार पाणी पास्ता उकडण्यासाठी कृती: १. एका भांड्यामधे पाणी गरम करण्यास ठेवावे. त्यात १ चमचा ऑलिव्ह ऑईल व २ चमचे मिठ टाकावे. २. पाणी उकळल्यावर त्यात पास्ता टाकुन १०-१२ मिनिटे शिजवुन घ्यावा.

चिकन शवर्मा

लेखक गणपा यांनी बुधवार, 07/11/2012 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात व्हेजींसाठी फलाफील आणि व्हेज-शवर्मा झाला. एक आठवडा कोंबडीलाही विश्रांती मिळाली असेल. म्हणुन पुन्हा सामिश प्रेमींसाठी चिकनकृती. :) साहित्य : . चिकन थाईज. (हाडं काढुन टाकलेली.) २ चमचे तंदुर मसाला. २ चमचे आलं वाटण. १ चमचा काश्मिरी लाल तिखट. १ चमचा काळीमिरी पुड. १ चमचा लसुण पुड.

चावडीवरच्या गप्पा – महाराष्ट्र की मद्यराष्ट्र

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 07/11/2012 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
“ते घोर कलियुग का काय म्हणतात ना, त्याची प्रचीती दिली हो तुमच्या साहेबांनी, बारामतीकर!”, घारुअण्णा तिरमिरीत चावडीवर प्रवेश करत. “ काय? आज कसला बार उडवताय घारुअण्णा?”, नारुतात्या. “अहो, ह्या बारामतीकरांच्या साहेबांनी महाराष्ट्रात दारूचा महापूर आणून महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ बनविण्याचा घाट घातला आहे, म्हणून म्हणालो घोर कलियुग”, घारुअण्णा भयंकर उद्विग्न होत. “कोण म्हणतंय असं ?”, इति नारुतात्या. “मटातली बातमी वाचली नाही का? ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी हे म्हटले आहे आणि ह्याचे सत्तापीठ बारामतीत आहे ह्याची चिंता व्यक्त केलीय.”, घारुअण्णा त्याच उद्विग्नतेत . “काय?

पांडेश्वरचे देखणे शिवमंदिर

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 06/11/2012 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
लोणी भापकरची मध्ययुगीन मंदिरे पाहून परत फिरलो ते पांडेश्वरचे असेच शिल्पसमृद्ध मंदिर पाहण्यासाठी. वाटेत मोरगावच्या मयुरेश्वराचे दर्शन करण्यासाठी थांबलो पण महादरवाजाच्याही पुढे आलेली प्रचंड गर्दी पाहून तसेच परत फिरलो. मोरगाव-जेजुरी रस्त्यावर मोरगावपासून ५/६ किमी अंतरावर मावडी गावातून उजवीकडे पांडेश्वरला जाणारा फाटा आहे.

मेरे हर लफ्ज मे छुपा हुआ तूफान है !

लेखक वडापाव यांनी मंगळवार, 06/11/2012 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
मेरे हर लफ्ज मे छुपा हुआ तूफान है, खुदा भी अभी तक जिससे अन्जान है. मिटा दी है वक्त ने मासुमियत इस चेहरेसे, आँखे बताती है इरादा, क्या करु मैं, पहलेसे. दिल तो साहब साफ है, पर जिस्म बे-ईमान है मेरे हर लफ्ज मे छुपा हुआ तूफान है, काबिल को अपनी मंजिल पे लेजाने का जो राज है बेकार हम बैठे ह्ये, काम कर रहे अल्फाज है. दिमाग ये जागा है तब जब दिल हुआ बेजान है मेरे हर लफ्ज मे छुपा हुआ तूफान है, तू ही साहिल, तू ही मंजिल, तू ही है ये जिंदगी तू नही तो कुछ नही, ये जिंदगी है बेतुखी तेरे दीदार से समझता हु की मुझमे जान है मेरे हर लफ्ज मे छुपा हुआ तूफान है, हुस्न का ये रंग कभीसे मुझपे क्यु नाराज है ना तेरा साय

मका बटाटा टोस्ट

लेखक neeta यांनी मंगळवार, 06/11/2012 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : चार ब्रेड स्लाईस, उकडलेले बटाटे दोन, उकड्लेले मक्याचे दाणे अर्धीवाटी,१ सिमला मिरची बारीक चिरून, मीठ, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, आले लसूण पेस्ट १ चमचा, लिंबाचा रस थोडासा, १ चमचा बटर. एका कढईत थोडेसे बटर घेऊन वितळल्यावर त्यात आले लसूण पेस्ट घाला, नंतर त्यात बारीक चिरलेली सिमला मिरची , कुस्करलेले बटाटे, उकड्लेले मक्याचे दाणे, मीठ, चिली फ्लेक्स, लिंबू रस घालून थोडे ढवळावे व खाली उतरवावे. मिश्रण गार करावे. ब्रेडचा स्लाईस घेऊन त्याला बटर लावावे त्यावर हे मिश्रण घालावे त्यावर किसलेले चीझ घालावे व दुसरा ब्रेड्चा स्लाईस ठेवावा व टोस्टरमध्ये घालून टोस्ट करावा.