Skip to main content

ओल्या हळदीचे लोणचे:

लेखक गौरीबाई गोवेकर यांनी मंगळवार, 04/12/2012 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
ओल्या हळदीचे लोणचे: साहित्य:ओल्या हळदीचे कंद, आले, लिंब, हिरव्या मिरच्या, मोहरीची डाळ, हिंग, मेथीचे दाणे, तेल, मिठ. दोन वाट्या हळदीच्या फोडी असतील तर २ वाट्या आल्याच्या फोडी, दीड वाटी मिरच्यांच्या फोडी, १ वाटी मोहरीची डाळ, दोन ते तीन चमचे हिंग पुड व १ चमचा मेथी पुड असे प्रमाण घ्यावे. तयारी: हळदीचे कंद स्वच्छ धुवुन अर्धा तास पाण्यात बुडवून ठेवावे. नंतर पाण्याबाहेर काढून स्वच्छ फडक्याने पुसून घ्या.ते कंद बारीक चिरून त्याच्या फोडी करून घ्या. तसेच आले व मिर्चांचे सुध्दा चिरून बारीक तुकडे करून घ्या. मिर्च्यांचे केलेले तुकडे अगदी जरासे (एक सेकंद) मिक्सरला फ़िरवा. मेथीचे दाणे थोड्या तेलावर तळून

ओरिगामी प्रदर्शन

लेखक सुधांशुनूलकर यांनी मंगळवार, 04/12/2012 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
|| श्री गुरवे नमः || ओरिगामी मित्र या संस्थेतर्फे मुंबईमध्ये ‘वंडरफोल्ड २०१२’ हे वार्षिक ओरिगामी प्रदर्शन आयोजित केलं आहे. शुक्रवार, ७ डिसेंबर ते सोमवार, १० डिसेंबर या चार दिवशी सकाळी ११ ते संध्याकाळी ६ या वेळात प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे कला अकादमीमध्ये हे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनाला येण्याचं समस्त मिपाकरांना आग्रहाचं वैयक्तिक निमंत्रण. . प्रदर्शनाव्यतिरिक्त ओरिगामी शिकण्यासाठी सशुल्क कार्यशाळाही घेण्यात येतील.

वसंताच्या उंबरठ्यावर..

लेखक रविंद्र रुपन् यांनी मंगळवार, 04/12/2012 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
(या मालीकेचा पहीला धागा http://www.misalpav.com/node/23312) हा सारा अद्भुत स्वप्नांचा प्रदेश आहे. धुक्याने वेढलेल्या गर्द पर्वतराजींचा. धूसर. जाणीव-नेणिवेच्या सीमारेषेवरचा. स्वप्नाळू डोळ्यांनी स्वतःलाच न्याहाळणारा मुग्ध आसमंत. काळ वसंताच्या पहिल्या चाहुलीचा. वेळ रात्र व दिवस ह्यांच्या मधली. स्थळ-काळाप्रमाणे ‘ती’ देखील कौमार्य-यौवन, निरागसता-आत्मभान ह्यांच्या संधिप्रदेशात उभी. वसंतातल्या तांबुस पिंपळपानाइतकी नाजुक अन् कोवळी.

समसचा २० वा वाढदिवस

लेखक विकास यांनी सोमवार, 03/12/2012 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
३ डिसेंबर १९९२ ला नील पॅपवर्थ नामक ब्रिटन मधील एका टेलीकम्युनिकेशन मधे काम करत असलेल्या इंजिनियरने मोठ्या संगणकावर Merry Christmas असे टंकले आणि "एंटर" चे बटन दाबताक्षणी ते युकेस्थित व्होडाफोनच्या एका डायरेक्टरच्या हाताच्या पंजापेक्षा मोठ्या असलेल्या मोबाईल फोनवर चमत्कार झाल्याप्रमाणे ते अवतिर्ण झाले आणि जगातला पहीला एस एम एस तयार झाला. अर्थात एका हाडाच्या इंजिनियरच्या दृष्टीने त्याने एक प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला. यापुढे काही नव्हते. पण कंपनीच्या उद्योजक मनास त्यातूनच एक मोठी धंद्याची संधी दिसली. पुढे बघता बघता एस एम एस चे प्रस्थ वाढत गेले.

एक ओळ फक्त.........!

लेखक Piyush mrudung यांनी सोमवार, 03/12/2012 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
** कधी कधी शब्दांपेक्षा सहवासाचा एक क्षणही पुरेसा असतो, मनातलं खूप काही बोलायला----------------------- मृदुंग ** बस तुझ्या माझ्या आठवणींचा सुगंध छळतोय..............! आठवणीतच पण माझ्या मनात दरवळतोय .................! ----------------------- मृदुंग ** तू आहेस तर सगळंच आहे... तू नाहीस तर काहीच नाही... क्षणभरचे पापण्यातले स्वप्नच... आता जगायला पुरेसे आहे... ------------ मृदुंग ** प्रत्येक इछेची 'विलक्षण' इच्छा असते, सुरुवातीला नव्हे शेवटीच त्याचे लक्षण दिसते....------© मृदुंग ** "लक्ष ' ण" कळायला लक्ष वेळा लिहिले, तरी सुद्धा सुरुवातीला लक्ष देऊन नाहीच पहिले.....

दम (दिलेली) बिर्याणी.

लेखक स्पंदना यांनी सोमवार, 03/12/2012 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
" हे बघ तू उगा मला त्या गणपा अन सानिकाची कारणे नको देउ." माझा नवरा मला जेवता जेवता सुनवत होता. "अरे पण ऐक तरी...." मी मध्येच त्याच बोलण तोडायचा प्रयत्न केला. पण तोवर माझ्या नवर्‍याने सानिकाच्या पराठ्याचा तुकडा तोडुन तो गणपाच्या खिम्यात खुपसला होता. तुकडा भरुन गणपाचा खिमा तोंडात कोंबत त्यान पुन्हा मला फैलावर घ्यायला सुरुवात केली." ये बद, तुगलन मनजे काय सापसपाई कलनाली...ऑम ऑम्...वाटली का तुला? अग सुगरण म्हणजे कशी अशी लोणच्यासारखी स्वयंपाकघरात मुरलेली पाहिजे. खाराशिवाय जस लोणचं तशी तेलाचे, तिखटामिठाचे डाग असल्याशिवाय सुगरण" नवर्‍याने तारे तोडावे तसे शब्द तोडले. कप्पाळ माझ!!!

स्वप्नघरांच्या भिंती

लेखक रविंद्र रुपन् यांनी सोमवार, 03/12/2012 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
रामचंद्र गुहा हे भारतातील सर्वात लोकप्रिय इतिहासकार आहेत. ‘इंडिया आफ्टर गांधी’ हे त्यांचे महत्त्वाचे पुस्तक. भारत म्हणजे प्रचंड अंतर्विरोध व कमालीची बहुविधता. असे असूनही हा देश एकत्र कसा राहू शकला, हा त्या पुस्तकाचा विषय. गुहा याचे श्रेय येथील सामान्य माणसाची जिद्द, लोकशाही, संविधान, धर्मनिरपेक्षता, एकसंघ बाजारपेठ अशा अनेक घटकांना देतात. सरतेशेवटी ते म्हणतात,
“जोपर्यंत हिंदी सिनेमे पाहिले जातात व त्यांची गाणी गायली जातात, तोपर्यंत भारत टिकून राहील.”
हिंदी सिनेमा व त्यातील गाणी यांना आपल्या आयुष्यातून वेगळे करताच येणार नाही.

मी काय करू??..........

लेखक बटाटा चिवडा यांनी रविवार, 02/12/2012 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
मी काय करू??.......... तो रिटायरमेंट घेणार आहे म्हणे.. मग मी काय करू?? त्यांचं स्मारक इथं नाही तिथं बांधणार म्हणे मग मी काय करू?? त्याच्या त्या मुव्ही मध्ये ती मर्डरर नाहीये म्हणे मग मी काय करू?? म्हणे तो तर डेंग्यू ने मेलाय मग मी काय करू?? तो म्हणे भारताचा नेक्स्ट पंतप्रधान मग मी काय करू?? आणि तो म्हणे भारताची नवीन WALL मग मी काय करू?? फेसबुक BAN होणार आहे म्हणे मग मी काय करू?? अरे पेट्रोल महाग ..Gas महाग महागाईची भडकलीये आग तसं म्हंटलं तर मी काहीच करू शकत नाही.. कारण ना मी "हृदयसम्राट", ना मी कोणाचा "माही" तुटपुंज्या कमाईत जगतोस रे कसा तू.. अशी कोणीच विचारपूस करत नाही