Skip to main content

Perfume

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 07/02/2013 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
. Perfume: The Story of a Murderer,,,, directed by Tom Tykwer,, Perfume हा Hollywood चा चित्रपट २००६ नेट वर टंगळ मंगळ करताना हा सिनेमा मिळाला ..तोरेन्त वरुन त्याला डाऊन केला ..त्याची हि कथा हि कथा एका Jean-Baptiste Grenouille नावाच्या तरुणाची आहे...कथा फ्रान्स मधे १८ व्या शतकात घडते जन्म झाल्यावर लगेच ह्याची आ‌ई गरिब असल्याने व सांभाळ करता येणे शक्य नसल्याने त्याला कच~यात टाकुन देते.. अनाथ व बेवारस हे मुल एका फ्रांस मधल्या अनाथ आश्रमात वाढु लागते... हे जरी असले तरी त्

आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का?

लेखक ग्रेटथिन्कर यांनी गुरुवार, 07/02/2013 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
आयुर्वेद हि भारतीयांनी जगाला दिलेली देणगी आहे असे म्हणतात. आयुर्वेदात अनेक औषधी काढे ,आसवं यांचा वापर केला जातो. आयुर्वेदात वात, कफ, पित्त अश्या तीन प्रकृत्ती मानल्या गेल्या आहेत, त्याद्वारे निदान करण्याची पद्धत आहे. प्रश्न असा आहे कि वैज्ञानिक कसोट्यांवर आयुर्वेदाचे वात कफ पित्त आदी विचार सत्य ठरतात का? double blind trial पद्धतिने आयुर्वेदीक औषधांचे परिक्षण झाले आहे का? या औषधांची काढ्यांची आसवे वगैरेची bioavailability ,metabolism, pregnancy category ,side effects विषयी अभ्यास झाला आहे काय? असल्यास त्याची माहिती कुठे मिळेल.

आधारकार्डाचा आधार सर्वांपर्यंत पोहोचलाय?

लेखक अनन्न्या यांनी गुरुवार, 07/02/2013 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारने आधार कार्ड सर्वच महत्त्वाच्या गोष्टींसाठी अनिवार्य केले आहे. शाळेच्या प्रवेशापासून ते गॅस कनेक्शन पर्यंत प्रत्येक ठिकाणी आधारकार्ड अत्यावश्यक आहे. परंतु ते देशाच्या सर्व भागात उपलब्ध झाले आहे का? शहरी भागात उपलब्ध असेलही परंतु अनेक खेडेगावात अजूनही आधार कार्ड उपलब्ध नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी जेथे आधार कार्ड दिले जाते तिथेही योग्य सुविधा नाहीत. संपूर्ण दिवस घालवून नंबर लागतो. बरं, एवढा वेळ घालवून सर्व खटाटोप केला तर ते आपल्या पर्यंत वेळेत पोहोचते का? माझे आधारकार्ड मिळायला दीड वर्ष लागले. अर्थात ते मिळाले हे ही नसे थोडके!! गॅस एजन्सीत मी ते वेळेवर देऊ शकले नाही.

विश्वरूप : "मखमल के कालीन में टाट के पैबंद "!

लेखक विसुनाना यांनी गुरुवार, 07/02/2013 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
शराबीमधला प्राणचा खणखणीत ड्वॉयलॉग - 'मखमल के कालीन में टाट के पैबंद' आठवण्याचं कारण म्हणजे नुकताच पाहिलेला 'विश्वरूप'! या चित्रपटाकडून माझ्या खूपच अपेक्षा होत्या. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एक संवेदनशील कलाकार कमल हासन यानं त्या चित्रपटाचं केलेलं लेखन आणि दिग्दर्शन. या चित्रपटावर त्यानं खूपच मेहनत घेतलीय, वेळ दिलाय, खर्च केलाय वगैरे ऐकत होतो. शिवाय शेखर कपूर, नासर, जरीना वहाब आणि राहुल बोस असे काही कसलेले अभिनेते या चित्रपटात असल्यानं उत्तम अभिनयाची रेलचेल पाहायला मिळेल अशीही अपेक्षा होती. आजकाल अनेक चित्रपटांचे प्रोमोज आणि त्याचा दर्जा यांच्यात जमीन-अस्मानाचे अंतर असते.

टोका प्रवरासंगमचे अद्भूत शिवमंदिर

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 07/02/2013 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
देवगिरी बघून आणि नगर फाट्यावर बिरूटे सर आणि श्रुतीताईंना भेटून आम्ही औरंगाबादेहून आता परतीच्या मार्गाला लागलो. पण एक ठिकाण अजूनही बघायचे राहिले होते ते म्हणजे गंगापूर फाट्याच्या थोडेसे पुढे असलेले टोका गावातील शिल्पसमृद्ध सिद्धेश्वर मंदिर. वास्तविक औरंगाबादला येतानाच हे मंदिर बघायचे होते पण वेळेअभावी ते परतीच्या वेळी पाहायचे ठरले. हे मंदिर गोदावरी आणि प्रवरेच्या संगमानजीकच आहे. अगदी महामार्गाला लागूनच, प्रवरेवरच्या पुलानजीकच. सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात आलो. हे मंदिर सर्व बाजूंनी तटांनी बंदिस्त केले आहे. मुख्य प्रवेशद्वार बंद करून मंदिराच्या मागच्या दरवाजाने प्रवेश आहे.

मी...

लेखक सुयशतात्या यांनी गुरुवार, 07/02/2013 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
नियतीने केलेला आयुष्यावर घाव सोसला मी त्याच घावाच्या साथीत अश्रुंचा माग शोधला मी एका परिचे स्वप्न आयुष्याच्या सुखद वळणावर पाहीले मी त्याच स्वप्नाचा विरत जाणारा दु:खद अनुभव घेतला मी सर्व दु:खे "प्याल्यात" बुडवली मी व्यसनाच्या अंधःकारात स्वत:ला लोटले मी मनाच्या तगमगीत आयुष्याचा अंत पाहिला मी त्याच अंताची निरंतर अपेक्षा करणार मी...

घर

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 07/02/2013 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
या घराला विचारले मी एकदा असा रिकामा रिकामा असतोस वाईट नाही वाटत? क्षणभर विचार करून घर म्हणाले, नाही, म्हणजे नेहमीच नाही . . म्हणाले या भिंती पाहिल्यास किती सुंदर रंग लेवून उभ्या आहेत इकडे ये, या खिडक्या पहा आपली कवाडे उलगडून उनपावसाला बोलावून आणताहेत . . अन् ते दार बघितलेस सताड उघडे, सगळे सामावून घ्यायला उत्सुक येणार्‍याला खिडकीतून आलेला पाऊस विनामूल्य देणारे वा सोनसळी उन्हाची खुशाल मेजवानी घालणारे . . हे सगळे पहिले कि नाही वाईट वाटत मी सुखावतो आणि आकंठ भरून जातो रिकामपण माझे काही क्षण का होईना विसरतो विचारले त्याला मग मगशी 'नेहमीच नाही' म्हणालास ते कां? . . म्हणाले जरा वर पहा ते झगमगणारे आक
काव्यरस

बोलतो जे अर्णव

लेखक रामबाण यांनी गुरुवार, 07/02/2013 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
एके संध्याकाळी घरी पोचलो. कुठलं तरी चॅनल सुरु होतं, न्यूज चॅनलच असावं.. जाहिराती सुरु आणि अर्णव बारकाईनं बघत बसलेला, मी आत येऊन बसतो न बसतो तोच त्यानं प्रश्नांची सरबत्ती सुरु केली, ती काकू तशी का झोपलीय ओ? काय झालंय तिला? तिचं पोट दुखतंय का बाबा? मी उत्सुकतेनं टीव्हीकडे नजर टाकली तर त्यातली मॉडेल; बहुदा सनी लिओन, प्रेमानं आळोखे पिळोखे देत होती आणि ‘तुम्ही मला एक सरप्राईज द्या मी तुम्हाला एक देते’ वगैरे आवाहन करत होती… अर्णवचं लक्ष दुसरीकडे गेलं आणि ती काकू तसं का करत होती हे उत्तर द्यायचं संकट टळलं..

किरण

लेखक मयुरपिंपळे यांनी बुधवार, 06/02/2013 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
एक क्षितीजा ची किरण येते रंगात रंग देऊन जाते! सावलीला ही किरणाची सवय लागते अंधार मधे जाऊन विसावा ती घेते! -- मयुर

काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 06/02/2013 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
बालपणातली आठवण अशी की आजारी पडलो, की आई-वडील किंवा आजी-मावशी बरोबर (औषधाच्या) बाटल्या घेऊन दवाखान्यात जायचो. तिथं एक (च) डॉक्टर अन एक कंपाउंडर असायचा. डॉक्टरकाका तपासायचे अन एका कागदावर चार ‘अर्वाच्य’ (पक्षी-वाचता न येणारे ) शब्द खरडून द्यायचे. मग कंपाउंडरकाका मागच्या कपाटातून भरलेल्या असंख्य बाटल्यांपैकी काहींची बुचे फिरवून एका पत्र्याच्या पांढऱ्या मगात त्याचे ‘मिक्स्चर’ बनवीत अन आमच्या बाटल्यांमध्ये भरून देत. अन पुढे चार दिवस आम्ही ते मिक्स्चर अन वहीच्या कागदाने बांधलेल्या पुडीतल्या गोळ्या पोटात ढकलायचो.