Skip to main content

घरपण

लेखक अज्ञातकुल यांनी रविवार, 10/02/2013 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
घर चार कुडाच्या भिंती घरपण अमृत रसना नाती आकाश निळे झरणार्‍या चांदण राती ओंजळी भरूनी स्वातीचे मोती स्वप्ने जरतरी नयनी आतुर भरती हृदयी गाभारा तृप्त तेवत्या ज्योती आवेग कळांचे लाटेवर देहाच्या रुधिरातिल माया ममता लय ओघवती शरिरापलिकडले गोत सवे सांगाती दुष्काळी निर्मळ सोबत नित अनुप्रीती घर हे अनुभूती अनुबंधांची व्याप्ती घरपण पण असते रेष रसिक रसरसती ....................अज्ञात
काव्यरस

सोबत होती तुझी जेथवर

लेखक शैलेश हिंदळेकर यांनी रविवार, 10/02/2013 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
सोबत होती तुझी जेथवर कधी एकटा ना पडलो धुंद तुझ्या त्या सहवासातच कसा होईना, पण घडलो सकाळ तुझीया शिवाय माझी होतच नव्हती सुरु तशी दिवसभरातून तुझी भेट मग घडतच होती माझ्याशी तू नसल्यावर जीव व्हायचा उगाच कासाविस माझा परंतु तुझीया भेटी नंतर स्वतःस समजे मी राजा वैद्य भेट ती नित्य व्हायची तुझीया संगे फिरल्याने शुष्क खोकला आणिक थकवा ऊर धुराने भरल्याने परिवाराची मित्रांची मी पथ्करली गे नाराजी कारण तव दुर्गंध सोसण्या होतच नव्हते ते राजी अखेर सोडून दिधले तुजला स्मरणही नाही होत तुझे परतुनी येऊ नको मजकडे हेच मागणे गे माझे [वैधानिक इशारा - धुम्रपान आरोग्यास अपायकारक आहे ]

कुठे असतोस मित्रा

लेखक शैलेश हिंदळेकर यांनी रविवार, 10/02/2013 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे असतोस मित्रा तुझी भेट होत नाही तुला भेटल्या शिवाय झोप नीट येत नाही उपकारांचे मी तुझ्या कसे फेडावे रे ॠण हाच विचार असतो कैक दिवसांपासून तुझ्यामुळेच लाभली माझ्या पत्नीची ती मिठी फक्त तुलाच पाहून तिला वाटते रे भिती दॄढ मैत्रिचा आपल्या केला तीनेच की घात कीट-नाशक फवारा तीने मारला घरात आता कसली ती मिठी आणि कसे बिलगणे औषधाचा तो राहतो गंध अनेक महिने

एक विमान हरवलेलं...

लेखक चावटमेला यांनी रविवार, 10/02/2013 00:48 या दिवशी प्रकाशित केले.
झी मराठीवर दर शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता मधली सुट्टी नावाचा एक छान कार्यक्रम असतो. सलील कुलकर्णी अँकरींग करतो. वेगवेगळ्या गावांतील शाळांमध्ये जावून तिथल्या विद्यार्थ्यांशी एक सुंदर संवाद साधायचा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. एरवी तो सलील त्याच्या रिअ‍ॅलिटी शोज मधल्या भाषणांनी कधी कधी डोक्यात जातो, पण हा शो मात्र मला मनापासून आवडतो.तर,ह्या आठवड्याच्या भागात, सांगली जवळच्या एका खेडयातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शो होता. सलील चा नेहमीप्रमाणे मुलांशी संवाद सुरू होता.

हे' शास्त्रीय संगीत ' हाय तरी काय राव ? भाग ३

लेखक चौकटराजा यांनी शनिवार, 09/02/2013 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
भारत देशात अभिजात संगीताच्या दोन शैली प्रामुख्याने आढळतात. त्यात हिन्दुस्थानी शैली व कर्नाटक शैली असे दोन प्रकार आहेत.वापरले जाणारे ताल, साथीसंगतीची वाद्ये व सादरीकरण ( यात आवाजाचा लगाव,. तान क्रिया ई चा समावेश ) यात मूलभूत फरक आहे. रागांचे वर्गीकरण करण्याचीही पद्धत वेगवेगळी आहे. पण या गुंतागुन्तीच्या विषयात आपल्याला शिरायचे नाही.कारण ऐकले तर आवडते पण का आवडते हे समजत नाही अशी अवस्था असलेल्या रसिकाला समोर ठेवून ही मालिका लिहिली जात आहे. हिंद्र्स्थानी अभिजात संगीतात घराणी नावाचा एक प्रकार आहे. त्या बद्द्ल एवढेच आपण समजून घ्यायचे आहे की घ्रराणे म्हणजे सादरीकरणाची शैली.

चुकवु नये असे चित्रपट - कॅसिनो

लेखक प्रसाद१९७१ यांनी शनिवार, 09/02/2013 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस ह्या सिनेमा बद्दल लिहायचे होते कारण oscar वगैरे मधे बाहुली न मिळाल्या मुळे भारतात तसा ह दुर्लक्षीत झालेला सिनेमा होता. कॅसिनो हा १९९५ सालचा सिनेमा, Martin Scorsese नी दिग्दर्शीत केलेला. हा दिग्दर्शक पण भारतात फारसा प्रसिद्ध नाही ( का ते कळत नाही ), पण आता त्याला जवळ्-जवळ Best Director of our time वगैरे नी गॉरवले जात आहे. मार्टीन ला ७ वेळेला ऑस्कर नोमिनेशन मिळाली पण एकदाच ऑस्कर मिळाले. त्याला AFI lifetime achievement award ही दिले. golden globe वगैरे बरीच मिळाली.

एक दक्खनी कविता - कुतुबमिनार

लेखक विसुनाना यांनी शनिवार, 09/02/2013 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
'परसूंकीच बात है' हा लेख लिहून बरेच दिवस झाले. त्या लेखावर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये दक्खनी भाषेबद्दलही काही विचारणा होत्या. मी काही दक्खनी भाषेचा जाणकार नाही. पण त्या भाषेची आणखी ओळख वाचकांना व्हावी म्हणून म्हणून इथे त्या भाषेतील एक कविता देत आहे. दक्खनी ही मराठीची खूपच जवळची बहिण आहे. (कदाचित 'सख्खी' असे म्हणता येईल.) दक्खनी भाषेचे एक अभिमानी, उर्दु-हिंदीचे हरहुन्नरी कवी आणि प्रथितयश चित्रकार श्री. नरेन्द्र राय श्रीवास्तव 'नरेन' यांची एक विनोदी दक्खनी कविता वाचनात आली.
काव्यरस

इश्कबाजांच्या मैफिलीत

लेखक अधिराज यांनी शनिवार, 09/02/2013 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
इश्कबाजांच्या मैफिलीत तू असावीस गाजलेली नशा शायरीत आणताना तू असावीस लाजलेली. दो जीवांची स्पंदने ही असावी तुझ्यातच रुजलेली वसंतातले रंग लेऊन तू असावीस सजलेली. घेऊन चांदणे उशाला तू असावीस निजलेली धुंद जाणिवेच्या धारांमध्ये तू असावीस भिजलेली. विरहसमय आला तरी नसावी प्रेमवात विझलेली बहू पालटले ऋतू जरी नसावी गझल झिजलेली.

पुजाच्या फेसबुक अकाऊंट मधे शिरलेला आत्मा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 09/02/2013 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेज ला सुटी असल्याने पूजा निवांत होती.... सकाळी कॉफी चा मग घेऊन ती कम्प्युटर च्या टेबलावर आली अन डेस्क टॉप चालू केला.. फेस बुकच्या अकौंटर गेली अन पोस्ट वाचू लागली .. डाव्या कोप~यात नजर गेली अन कुणाची तरी मैत्री विनंती आलेली तिला दिसली.. तिने क्लीकले व फोटोवर क्लीकून त्या अकांऊंट वर गेली... राहुल पानसे नी ती मैत्री साठी विनंती केली होती.....सॉफ्टवेअर इंजिनिअर..राहणार पुणे ..सद्ध्या फरीदाबाद...पूजा वाचत होती.. तिने त्याचे मित्र चेक केले बरेचसे मित्र पुण्यातलेच होते एकूण १५-२० मित्रांची यादी होती.. पूजा विचारात पडली की याने ओळख नसताना का मैत्री याचना केली असेल? फोटो तर खरा वाटत होता..एकदा वाट्ल

खल्लास

लेखक श्री गावसेना प्रमुख यांनी शनिवार, 09/02/2013 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
एकदाचा खेळ खल्लास झाला अफजल गुरु चा,आज सकाळी ५.३० ला तीहार जेल मध्ये ह्या दहशतवाद्यास फाशी देण्यात आली ह्याची माहीती गृह सचीव आर के सिंह यांनी दिली,पण एक समजत नाही की ह्याला फाशी दिल्याने काश्मीर मध्ये हाय अलर्ट, कॉलेजेस चे सगळे कार्यक्रम रद्द्,हा काश्मीरी नागरींकाचा देव वैगरे होता की काय .(कसाब च्या बाबतीत काही हिंसा झाली नाही) आता भाजप काय म्हणनार ह्या विषयावर्,बाकी बाळासाहेबांनी दुसर काम केलय स्वर्गात गेल्यावर. जय हिंद 1