सोबत होती तुझी जेथवर
कधी एकटा ना पडलो
धुंद तुझ्या त्या सहवासातच
कसा होईना, पण घडलो
सकाळ तुझीया शिवाय माझी
होतच नव्हती सुरु तशी
दिवसभरातून तुझी भेट मग
घडतच होती माझ्याशी
तू नसल्यावर जीव व्हायचा
उगाच कासाविस माझा
परंतु तुझीया भेटी नंतर
स्वतःस समजे मी राजा
वैद्य भेट ती नित्य व्हायची
तुझीया संगे फिरल्याने
शुष्क खोकला आणिक थकवा
ऊर धुराने भरल्याने
परिवाराची मित्रांची मी
पथ्करली गे नाराजी
कारण तव दुर्गंध सोसण्या
होतच नव्हते ते राजी
अखेर सोडून दिधले तुजला
स्मरणही नाही होत तुझे
परतुनी येऊ नको मजकडे
हेच मागणे गे माझे
[वैधानिक इशारा - धुम्रपान आरोग्यास अपायकारक आहे ]
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1541
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
ब्येस्ट!
महाराष्ट्र शासनाच्या जनहितार्थ प्रकाशनाकडे रवाना
एकदम भारी विझवलीत
एकदम भारी विझवलीत. मस्त.
फक्त कोणीतरी मला एक सांगा, हे तुझीया, माझीया, तुजकडे, मजकडे असले लिहायची पध्दत कोणी सुरु केली?
प्रतिसादाचं शीर्षक वाचून क्षणभर मला शिवी आहे का काय असं वाटलं!
In reply to एकदम भारी विझवलीत by अभ्या..
पण आभ्यानं वेळीच सावरलंय
@प्रतिसादाचं शीर्षक वाचून
In reply to प्रतिसादाचं शीर्षक वाचून क्षणभर मला शिवी आहे का काय असं वाटलं! by संजय क्षीरसागर
@प्रतिसादाचं शीर्षक वाचून क्षणभर मला>>>
हल्ली शीर्षकांवरून कोणाकोणाला काय काय वाटेल,सांगता येत नै व्बॉ.!!! 
हाहाहा!
लै भारी!
धन्यवाद
In reply to हाहाहा! by पैसा
सर्वप्रथम धन्यवाद मित्रांनो, नवीन आहे तुमच्या दिग्गजांच्या जगात मी, आताशा कुठे सुचायला लागलय, त्यामुळे लहान मोठ्या चुका मोठ्या मनाने सहन कराल, अशी अपेक्षा
विषयाला धरुन
प्रतिसाद सुरुवातील विषयाला धरुन असतात पण नंतर भरकटत का जातात…