कुठे असतोस मित्रा
तुझी भेट होत नाही
तुला भेटल्या शिवाय
झोप नीट येत नाही
उपकारांचे मी तुझ्या
कसे फेडावे रे ॠण
हाच विचार असतो
कैक दिवसांपासून
तुझ्यामुळेच लाभली
माझ्या पत्नीची ती मिठी
फक्त तुलाच पाहून
तिला वाटते रे भिती
दॄढ मैत्रिचा आपल्या
केला तीनेच की घात
कीट-नाशक फवारा
तीने मारला घरात
आता कसली ती मिठी
आणि कसे बिलगणे
औषधाचा तो राहतो
गंध अनेक महिने
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3761
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
सॉलीड प्रॉब्लम आहे!
त्रिकोणी पोपट म्हणतात याला
हा हा हा... भारी..
हा हा हा... भारी..
हा हा हा...भारी.. काय?
In reply to हा हा हा... भारी.. by आनन्दिता
फवारा उडेल अंगावर!
नाही तर काय...
In reply to हा हा हा...भारी.. काय? by संजय क्षीरसागर
फवारा अंगावर उडणं चांगलं नाही.
पण मी काय म्हणतो
In reply to नाही तर काय... by धन्या
पंपच गुल केला तर सगळे प्रश्न सुटतील असं नाय का वाटत?
येवढी मेहनत का करावी? पंपाच
In reply to पण मी काय म्हणतो by संजय क्षीरसागर
येवढी मेहनत का करावी? पंपाच प्रेशर वाढणार नाही इतकच बघा म्हणजे झालं.
पंपाच प्रेशर वाढणार नाही इतकच बघा म्हणजे झालं?
In reply to येवढी मेहनत का करावी? पंपाच by शैलेन्द्र
आहो, पंप पत्नीकडे आहे ना!.. त्यामुळे प्रेशर कंट्रोल करणं शक्य नाही, हे एक.
आणि केंव्हा, कसा आणि कुणावर फवारा उडेल याचा नेम नाही, हे दुसरं.
आहो, पंप पत्नीकडे आहे ना!..
In reply to पंपाच प्रेशर वाढणार नाही इतकच बघा म्हणजे झालं? by संजय क्षीरसागर
पत्नीवर कंट्रोल नाही हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न
दादा, दृष्य डोळ्यासमोर दिसलं पाहिजे! पंप पत्नीच्या हातात आहे...
In reply to आहो, पंप पत्नीकडे आहे ना!.. by शैलेन्द्र
त्यामुळे पंपावर कंटोल नाही!
तो मुद्दाच नाही ...
In reply to दादा, दृष्य डोळ्यासमोर दिसलं पाहिजे! पंप पत्नीच्या हातात आहे... by संजय क्षीरसागर
मुद्दा हा आहे पत्निने पंप स्वतःहुन हाति घेतला की तुम्ही दिला ? जर तुम्ही दिला नसेल तर पत्नीवर कंट्रोल नाही हेच बरोबर.. अन तुम्हिच हाती दिला असेल तर मात्र पंपावर कंट्रोल नाही असं म्हणा हवं तर... ;)
पण..
In reply to नाही तर काय... by धन्या
काही लोकं आवडीने उडवतात आणि काही आवडीने अंगावरती उडवून घेतात असे पाहण्यात आले आहे.
सहमत आहे
In reply to पण.. by परिकथेतील राजकुमार
आवड एकेकाची =))
आणि...
In reply to सहमत आहे by प्रसाद गोडबोले
पाहणार्याचीही :)
छ्या बुवा !!! कवितेची टर
In reply to हा हा हा... भारी.. by आनन्दिता
छ्या बुवा !!! कवितेची टर उडवली तर पैसा ताई चावट म्हणते... अन भारी म्हटलं तर संक्षी काका ,बाजुला हो फवारा उडेल म्हणतात... करु तो क्या करु??
:) :)
नाइलाज आहे
समजू शकतो तुमचं दु:ख. :(
मस्त!
भारी प्रकार आहे!
बाहेरुनच तुमच्या कवितेची
बाहेरुनच तुमच्या कवितेची
लागली मला कुणकूण
पण आहे नक्की कोण तो ?
उंदिर की ढेकूण ??? :-b
काही तरीच काय बुवा?
In reply to बाहेरुनच तुमच्या कवितेची by अत्रुप्त आत्मा
पत्नी मिठी मारते म्हणजे सॉलिड कुणी तरी असणारे. आणि मग...
हे कसं जुळणार?
पण... किटकनाशक फवारणीचं नवं अस्त्र उजेडात आणल्यामुळे श्वास कोंडला आहे.
झुरळ
प्रस्तुत प्राणी झुरळ आहे काय? (कीटनाशकांमुळे उंदीर मरत माहीत. आणि बायकांना झुरळांची जितकी भीती वाटते तितकी ढेकणांची वाटत नाही त्यामुळे वाटले.)

झुरळाला भेटून झोप येण्याचा काय संबंध?
In reply to झुरळ by आजानुकर्ण
पहिलं कडवं वाचा!
समजून घे ना भाऊ
In reply to झुरळाला भेटून झोप येण्याचा काय संबंध? by संजय क्षीरसागर
समजून घे ना भाऊ, अरे कविता म्हणजे काय ते आता कुठे थोडं थोडं उमाजायला लागलय, जमेल लवकरच, तोवर जे काही तोडकं मोडकं मांडतोय त्याला तुम्हा दिग्गजांची दाद मिळाली तर लवकर सुधारणा होईल आणि ते सारं झुरळा बद्द्लच होतं बरं, काही मित्रांच्या प्रश्नाला उत्तर म्हणून सांगतो.
दादा, हे त्या सिग्रेटीच्या कवितेला तळटीप दिली तसं
In reply to समजून घे ना भाऊ by शैलेश हिंदळेकर
शेवटी (म्हणजे आता नाही, कवितेच्या शेवटी) सांगितलं असतं तर इतका फवारा उडाला नसता!
मला झुरळाच्या कविता खूप
मला झुरळाच्या कविता खूप आवडतात. कालच आमच्या बाईंनी शाळेत शिकवली.
एक होतं झुरळ
चालत नव्हतं सरळ..!
तिकडून आली बस...
बसमध्ये बसलं,
तिकीट नाही काढलं....
तिकीटचेकरने पाहीलं,
चिमटीत धरून फ़ेकलं.....!!!
मिसळीत पडलं झुरळ...!
मिसळीत पडलं झुरळ...! :(