Skip to main content

वेदना

लेखक रेशा यांनी शुक्रवार, 05/04/2013 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
बोलायचे आहे काही, सांगायचे आहे काही भावनेस तिच्या कसे, शब्दांचे वावडे बाई वेदना मुकेपणाची, सलत आत राही निश:ब्दात गुज हे, गुंफीयले जात नाही मनाचा सय्यम मोठा, परी उर फुटो पाही पाणावल्या डोळ्यांनी, ती जळतच राही आनंदते आक्रंदते परी, ओठांवर काही नाही आंदोलने मनातली, जणू गोठून आत जाती उपभोगले त्याने बाईपण, ती वेदनेत न्हाली जीवन उरले फक्त .. जगणे जळून जाई ... रेशा
काव्यरस

छायाचित्रण भाग १. छायाचित्रण समजून घेताना

लेखक एस यांनी गुरुवार, 04/04/2013 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्रणाविषयी थोडेसे...
प्रस्तावना चित्रकला ही जगातील आदिम कला समजली जाते. अगदी जैव-सामाजिकशास्त्रीय पद्धतीने विचार केला तर किमान सस्तन प्राण्यांच्या विकासात अनुकरणाला खूप महत्त्व असल्याचे दिसून येईल. अनुकरणाची सवय आणि अंगभूत शारीरिक वैशिष्ट्ये यांची सांगड घालून मानवाने प्रगतीचे विविध टप्पे गाठले आहेत. हाताच्या अंगठ्याचे इतर बोटांपासून वेगळे असणे हे वैशिष्ट्य आपल्याला खूपच वेगळी क्षमता प्राप्त करून देते. यातूनच दृश्य प्रसंग, वस्तू, प्राणी इ.

पी आय ए- पी के ३२६ अपहरण

लेखक लाल टोपी यांनी गुरुवार, 04/04/2013 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
मार्च १९८१ मध्ये पाकिस्तानात कार्यरत असणारी एक दहशतवादी संघटना अल झुल्पिकारने पाकिस्तान विमान कंपनीचे विमान अपहरण केले. या दहशतवादी गटाचा नेता होता पाकिस्तानचे माजी अध्यक्ष झुल्फिकार अली भुत्तो यांचा मुलगा मुर्तजा भुत्तो . हे अपहरण नाट्य तब्बल १३ दिवस चालले होते त्यावेळी हे सर्वात जास्त काळ चाललेले अपहरण नाट्य होते. पी आय ए चे विमान उड्डाण क्र. पी.के. ३२६ नियमित देशांतर्गत वाहतुकीसाठी दिनांक २ मार्च, १९८१ रोजी कराचीहून पेशावरच्या दिशेने झेपावले. या विमानात एकुण १३५ प्रवासी आणि ९ कर्मचारी मिळून १४४ जण होते.

भानोळी

लेखक साबुदाणा खिचडी यांनी गुरुवार, 04/04/2013 05:44 या दिवशी प्रकाशित केले.
a बारीक चिरलेला कोबी - २ वाट्या डाळीचं पीठ (बेसन) - २ वाट्या नारळाचे दूध - १ वाटी मिरची+कोथिंबीर+आलं+लसूण वाटण २ चमचे २ अंडी फेसून (भानोळी हलकी होण्यासाठी) सोडा चिमूटभर तिखट - १ चमचा किंवा चवीनुसार गरम मसाला - १ चमचा हळद - १ चमचा धणे-जीरे पूड - १ चमचा मीठ व साखर चवीनुसार तेल - ४ चमचे भानोळी केकसारखी दिसते. कोबीप्रमाणेच फ्लॉवर किंवा करंदीची किंवा कोळंबीचीदेखील भानोळी बनवतात.

उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर १३ : परतीची कहाणी

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 04/04/2013 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
==================================================================== उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

मोबाईलमधील वाय फाय कसे वापरावे?

लेखक सागर यांनी बुधवार, 03/04/2013 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, मला (आणि कदाचित माझ्यासारख्या अनेकांना) मोबाईल मधील वाय-फाय नेमके कसे वापरावे याची माहिती हवी आहे. अलिकडेच मिपावर मोबाईल वरील दोनेक धाग्यांनी माझे लक्ष वेधून घेतले. मिपावरील तज्ज्ञ मित्र मला नक्की मदत करतील याची खात्री वाटल्याने हा धागा सुरु करतो आहे. तर माझी विनंती आहे की मोबाईलमधील वाय-फाय कसे वापरावे? (जे फुकट असते असा माझा समज आहे) त्यासाठी काय करावे लागते? हा वापर किती सुरक्षित आहे? सुरक्षा जपण्यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे? या व त्याअनुषंगाने अधिक माहिती कोणी देऊ शकेल तर खूप आभारी राहीन. उदाहरणार्थ माझ्याकडे एन्ड्रॉईड ४ वर आधारित सोनी चा एक्सपेरिआ आहे.

शेतकर्‍याची आत्मह्त्या (फाशी)

लेखक Bhagwanta Wayal यांनी बुधवार, 03/04/2013 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
आला सोसाट्याचा वारा गेले छ्प्पर ऊडुन। मातीच्या चार भिंती गेल्या पाण्यात बुडून॥ गोठ्यातील जनावरे गेली जलप्रवासाला। शेत जमिनही त्याची तिचा पिकपात झाला॥ आली सरकारी फौज गेली पहाणी करुन। झालेले नुकसान म्हणे देऊया भरुन॥ पूर्ण झाले वर्ष एक नाही मदत पोह्चली। सावकाराच्या कर्जापाई त्याची कंबर खचली॥ झाला कर्जाचा डोंगर चिंता मनाला वाटली। खचले आत्मबळ त्याचे "फाशी" झाडाला घेतली॥

ओज-शंकराची कहाणी

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 03/04/2013 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. शंकर दिनकर उपाख्य भैयाजी काणे (जन्मः ६ डिसेंबर १९२४, वरवडे, रत्नागिरी – मृत्यूः २६ ऑक्टोंबर १९९९, कोल्हापूर) हे न्यू तुसॉम, जिल्हा उख्रूल, मणीपूर राज्य, भारत, ह्या त्यांच्या कर्मभूमीत, ओज-शंकर म्हणून ओळखले जातात. तिथे, पूर्व-सीमा-विकास-प्रतिष्ठानतर्फे स्थापन करण्यात आलेल्या ओज-शंकर विद्यालयाच्या स्वरूपात, आज त्यांचे कार्य दिमाखाने उभे आहे. शिक्षणाद्वारे राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या त्यांच्या जीवनव्यापी ध्यासाचे, आज एका मोठ्या चळवळीत रूपांतरण झालेले आहे. त्या त्यांच्या भरतभूस ललामभूत ठरलेल्या कार्याची ही कहाणी आहे. भैयाजींचे प्राथमिक शिक्षण पुण्यात आणि माध्यमिक शिक्षण सातार्‍यात झाले.

प्राध्यापक

लेखक श्री गावसेना प्रमुख यांनी बुधवार, 03/04/2013 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रात गल्लो गल्ली कॉलेजेस चे पेव फुटले आणी प्राध्यापक नावाची एक नवीच जमात लोकांच्या नजरेस यायला लागली,त्या अगोदर बहुसंख्य विद्यार्थी हे ९ वी १० वी पर्यंत च गुचक्या देत बाहेर व्हायचे,हे प्राध्यापक म्हणजे चालता बोलता सरस्वतीचे अवतारच, बिचार्या प्राध्यापकांना शिक्षणाचा खर्च् भरपुर,वर जिथे ते नोकरी करतात तिथले संस्था चालक हे प्राध्यापकांच्या अर्ध्या वयापर्यंत त्याला अर्धाच पगार देणार्,बिचार्यांच कस काय भागणार. मग हे कॉलेज मध्ये शिकवण कमी करु लागले आणी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी बोलावुन शिकवु लागले(ज्याला आपण क्लासेस वैगरे म्हणतो),प्राध्यापकांचा पगार हा वेतन आयोगाच्या शिफारसी प

भारतात क्रिकेट वर सट्टा अधिकृत झाला पाहिजे,

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी बुधवार, 03/04/2013 05:59 या दिवशी प्रकाशित केले.
आय पी एल च्या निमित्ताने आता सट्टेबाज सक्रिय झाल्याची बातमी वाचली , सट्टेबाज ,त्यांची कार्य पध्ध्ती पंचतारांकित वर्तुळात नेहमीच पहिली आहे. सट्टा हा परदेशात म्हणजे युके व जर्मनी मध्ये कायदेशीर आहे , त्याने सरकारला प्रचंड महसूल मिळतो. एरवी क्रिकेट च्या सामन्यावर भारत हजार ते दोन हजार कोटींचा सट्टा लागतो. हा अनधिकृत धंदा असल्याने ह्यातून सरकार ला कर मिळत नाही , व ह्यातून मिळणारे उत्पन्न हवाला मार्फत परदेशात जाते किंवा काळा पैसा म्हणून पडून राहतो. भारतात घोड्यांच्या शर्यतीवर सट्टा लाऊ शकतो , सध्याचे क्रिकेटर व त्यांना सतत स्पर्ध्धेत पळवणारे त्यांचे मालक पाहता ह्यांच्यावर लागणारा सट्टा थांबवणे ज