गणराया चरणी मंत्र्याचं साकडं
हे गणराया पडतो मी पाया,निवडून येऊ दे...।
निवडून येऊ दे...मला मंत्री होऊ दे...॥धॄ॥
मी निवडुन आल्यावर ।
करेन जनतेचा उध्दार ।
बंगला बांधीन एक सुंदर ।
तो तुमच्याच पैशावर ।
दारामध्ये फॉरच्युन गाडी ऊभी राहु दे...।
ऊभी राहु दे...मला मंत्री होऊ दे...॥१॥
मग जाईन दिल्लीला ।
पी.एम्.ला भेटण्याला ।
मंत्री पद मागण्याला ।
दिल्या वचना जागण्याला ।
राजभवनावर मंत्रीपदाची शपथ घेऊ दे...।
शपथ घेऊ दे...मला मंत्री होऊ दे...॥२॥
मंत्री पद मिळाल्यावरी ।
करीन परदेशाची वारी ।
सर्व काँट्रॅक्ट माझ्याच घरी ।
मलाई एकटाच खाईन सारी ।
आदर्श घोटाळ्याची मला सवय होऊ दे...।
सवय होऊ दे...मला मंत्री होऊ दे...॥३॥
भ्रष्टाचाराचा तोड
मिसळपाव
