Skip to main content

गणराया चरणी मंत्र्याचं साकडं

लेखक Bhagwanta Wayal यांनी शुक्रवार, 17/05/2013 या दिवशी प्रकाशित केले.
हे गणराया पडतो मी पाया,निवडून येऊ दे...। निवडून येऊ दे...मला मंत्री होऊ दे...॥धॄ॥ मी निवडुन आल्यावर । करेन जनतेचा उध्दार । बंगला बांधीन एक सुंदर । तो तुमच्याच पैशावर । दारामध्ये फॉरच्युन गाडी ऊभी राहु दे...। ऊभी राहु दे...मला मंत्री होऊ दे...॥१॥ मग जाईन दिल्लीला । पी.एम्.ला भेटण्याला । मंत्री पद मागण्याला । दिल्या वचना जागण्याला । राजभवनावर मंत्रीपदाची शपथ घेऊ दे...। शपथ घेऊ दे...मला मंत्री होऊ दे...॥२॥ मंत्री पद मिळाल्यावरी । करीन परदेशाची वारी । सर्व काँट्रॅक्ट माझ्याच घरी । मलाई एकटाच खाईन सारी । आदर्श घोटाळ्याची मला सवय होऊ दे...। सवय होऊ दे...मला मंत्री होऊ दे...॥३॥ भ्रष्टाचाराचा तोडीन आळा । काळा पैसा करीन गोळा । गावागावांत माझ्याच शाळा । कंपन्यांना लाविन टाळा । रोज एक खोका माझ्या घरी येऊ दे...। घरी येऊ दे...मला मंत्री होऊ दे...॥४॥ कार्यालये जी सरकारी । ती खाजगी करीन सारी । योजना आणिन भारीभारी । कामगारंना बसविन घरी । कामगारांच्या पैशावरच व्याज खाऊ दे...। व्याज खाऊ दे...मला मंत्री होऊ दे...॥५॥
लेखनविषय:

वाचने 743
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया