फिरुनी केली मनात दाटी...
फिरुनी केली मनात दाटी जुन्या क्षणांनी
टिपे जराशी झरुनी गेली गालावरुनी.
जुन्या फुलांचा जुना सुगंध अवती भवती
किती क्षणांची घुटमळ जुन्या रस्त्यावरती
फिरूनी ओठावर येती पुन्हा जुनीच गाणी.
किती रेशीम क्षणांचा गुंता गुंतत असता
कुणी उसवला नाही मी पण व्यापून जाता
पसा गतकाळाचा भरला तुटलेल्या धाग्यांनी.
देठ तुटताना तेव्हा रडले होते पान पान
असे उठले होते वादळ उजाड हा माळरान
सडा सुकलेल्या फुलांचा गेला गंध उडुनी.
मिसळपाव
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 ऑक्टोबरला राष्ट्रपती अंगरक्षक (President’s Body Guard) दलाला राष्ट्रपतींची चंदेरी तुतारी आणि पताका प्रदान केली.
भारतातील पहिल्या महिला आमदार .
भारतात आरक्षण ना आंबेडकरांनी आणले होते ना पेरियारानी. ते आधीच आले होते. ब्राह्मणवादाच्या विरोधात मद्रासमध्ये जस्टिस पार्टीची स्थापना झाली आणि त्यांनी सरकार स्थापन केले हे मी आधी नमूद केले आहे. त्यावेळी पेरियार काँग्रेसमध्ये होते, आणि खादीचा प्रचार करत होते. जस्टिस पार्टीनेच आरक्षण विधेयक मंजूर केले. पेरियार यांची त्यात कोणतीही भूमिका नव्हती.