Skip to main content

(कॅन्टीन कॅन्टीन...)

लेखक किसन शिंदे यांनी रविवार, 30/06/2013 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणेचा स्त्रोत : आमच्या मित्राचा हा लेख! हाफिसच्या कॅन्टीनात मागच्याच आठवड्यात घडलेला एक किस्सा.. जेवता जेवता मध्येच एखाद्याने चमत्कारीक आवाज काढल्याने "तो मी नव्हेच" असे दाखवत इतरत्र बघत कसे तोंड लपवावे हे कळणार्‍या प्रसंगांपैकी एक प्रसंग.. दुपारचे जेवण सुरू होते.. माझ्या डब्यातील भाजी आणि आमच्या वडगाव बुद्रूकच्या हापिसातील एका दुसर्‍या सहकार्‍याची भाजी हि काही केल्या संपतच नव्हती... आणि अचानक 'टुर्रर्रऽऽऽ' असा बारीकसा पण बर्‍यापैकी ऐकायला जाईलसा आवाज आमच्या टेबलावर झाला.. कोणाकडून आला हे कळायचा मार्गच नव्हता.. शेवटी असा निष्कर्ष निघाला क

गाकर (हारोळ्या)

लेखक सचिन कुलकर्णी यांनी रविवार, 30/06/2013 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
गाकर हा माझा अत्यंत आवडता पदार्थ. आम्ही देशावरील मंडळी याला हारोळ्या म्हणतो. जाडसर कणिक थोडे मोहन, थोडे जास्त मीठ आणि ओवा घालून भिजवायची. दहा मिनिटे कणिक मुरवायची आणि लाटून साधारण पुरीपेक्षा थोड्या मोठ्या पण चार मिलीमीटर जाडीचा गाकर लाटायचा. एकाबाजूने तव्यावर शेकायचा आणि दुसर्या बाजूने अर्धवट तव्यावरच शेकायचा. नंतर अग्निमध्ये (ग्यासच्या चुलीवर. खर्या चुली तर आता गावात पण नसतील..)मस्त खरपूस हि हारोळी भाजून घ्यायची. वरून भरपूर साजूक तूप टाकायचे आणि तोंड शेकत शेकत खायची. Alternatively तुम्ही हि बटर किंवा घरातल्या ताज्या लोण्याबरोबर पण खाऊ शकता.

आडदांड पाऊस

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 30/06/2013 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
आडदांड पाऊस

अडदांड बेत ओला शिजवून पावसाने
केला शिवार खच्ची भिजवून पावसाने

गाळून घाम विणले मी वस्त्र स्वावलंबी
केल्यात पार चिंध्या खिजवून पावसाने

आले मनात जेव्हा तेव्हाच निग्रहाने
केले सपाट डोंगर झिजवून पावसाने

खाण्या-पिण्यात झाला पाऊसही अधाशी
हंगाम फस्त केला निजवून पावसाने

नाही दिले कुणाला थोडे 'अभय' परंतू
खरडून दैव नेले थिजवून पावसाने

आयगरची उत्तरभिंत ... टोनी कुर्झ आणि ऊली स्टेक

लेखक भडकमकर मास्तर यांनी रविवार, 30/06/2013 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
आय्गरची उत्तरभिंत इन्टरलाकेनच्या लेक थुनमधून दिसणारी बर्नीज आल्प्समधली ही डोंगररांग. डावीकडे आय्गर, मध्ये मॉन्ख आणि उजवीकडे युन्ग्फ़्राउ. मॉन्ख आणि युन्ग्फ़्राउला जोडणार्याग खिंडीपर्यंत रेल्वे नेलेली आहे.

गेटींग थिंग्स डन - डेव्हीड अ‍ॅलन

लेखक सुधीर यांनी रविवार, 30/06/2013 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
कधी असं होतं का? एखादं काम करायचं आहे हे आपल्याला फार पूर्वी लक्षात आलेलं असतं. पण इतर महत्त्वाच्या कामांच्या उपद्व्यापात आपण ते छोटंसं काम पूर्णपणे विसरून जातो आणि मग एक वेळ अशी येते की ते काम "आज, आता, ताबडतोब" म्हणून बोंबलतं. मग हातातली सगळी इतर कामं सोडून आपल्याला त्या कामाच्या पाठी लागण्याशिवाय गत्यंतर नसतं. असं बर्‍याच वेळा होतं आणि सगळी कामं सोडून ते काम करण्यात फारसं विशेषही नसतं. पण कधी कधी असं झाल्याने आपल्याला चांगलाच आर्थिक वा इतर फटका पडतो.

मँगो शिरा

लेखक दिपक.कुवेत यांनी गुरुवार, 27/06/2013 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
Sheera साहित्यः १. रवा - १ वाटि २. साजुक तुप - पाव वाटि ३. ताजा मँगो पल्प - १.५ वाटि (नसेल तर टिन्ड/कॅन मधला वापरु शकता पण चवीत फरक पडेल) ४. दुध/पाणी - १ वाटि प्रत्येकि ५. चवीनुसार साखर (आंब्याच्या गोडिनुसार) ६. बारीक चीरलेले बदाम/पिस्ते ७. पाव चमचा वेलचीपुड कॄती: १. मंद आचेवर एका नॉनस्टिक कढईत तुप तापलं कि रवा खमंग भाजावा/परतावा २. एका भांडयात १ वाटि दुध आणि पाणी एकत्र करुन उकळि आणावी ३.

...हे असचं आहे

लेखक दिपक.कुवेत यांनी गुरुवार, 27/06/2013 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
कविता/लिखाण हा आपला प्रांत नाहि. जी लोकं हे करतात त्यांच्याबद्द्ल आपल्याला प्रचंड आदर आहे. मिका कवी म्हणुन ग्रेट आहेतच त्यामुळे खालील विडंबन करुन त्याना दुखवावं किंवा त्यांची खील्ली उडवावी असा विचार अजीबात नाहि. फक्त हे उत्स्फुर्त सुचलं म्हणुन लिहलं.

मराठी इतिहासाचा मागोवा !!

लेखक ब़जरबट्टू यांनी गुरुवार, 27/06/2013 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
खुप दिवसापासुन मराठी इतिहासाचा पुर्ण फडशा पाडावा असा ईच्चार सुरु आहे. रणजित देसाईच्या "श्रीमान योगी "ने सुरुवात केली. नंतर सावंतांचे "छावा " पण वाचुन झालेय. "स्वामी" "द्रोहपर्व" पण वाचलेत. पण शिवशाहीतुन थेट पेशवाईत उडी घेतल्यासारखे वाटले . आम्हा मधला इतिहास अजून अन्धारमय आहे. मधल्या खुप दुवा तुटल्यासारखा वाटताहेत. कुणी वाचनाचा योग्य क्रम व त्यानूसार पुस्तके सांगू शकेल का ? कुपया योग्य लेखक सांगा हो…म्हणजे बघा जी वातावरण निर्मिती श्रीमान योगी वाचतांना होते, ती द्रोहपर्व वाचतांना वाटली नाही. थोडे धडे वाचत असल्यासारखे वाटले ते…

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (४)

लेखक तुमचा अभिषेक यांनी गुरुवार, 27/06/2013 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
२० जुन २०१३ आजकाल आमच्या घडाळ्यात साडेदहा वाजले की माझ्या डोक्याचे सव्वाबारा वाजतात.. त्यावेळी आमच्या टीवीवर एक सिरीअल लागते जी मला "बडी बोअर लगती है" .. न बघणे हा पर्याय संपुष्टात येतो कारण माझी आई आणि बायको.. दोघींनाही ती "बडी अच्छी लगती है" .. जेवायची आमची वेळही साधारण हिच असल्याने आणि जेवायची जागाही अर्थातच टिव्हीसमोर असल्याने इच्छा नसूनही बघावीच लागते. सासूसुनेच्या भांडणात पुरुष बिचारा मधल्यामध्ये मरतो असे म्हणतात खरे, पण जेव्हा याच सासूसुनेची युती होते तेव्हा जगणेही मुश्किल होते हा अनुभव मी गेले काही दिवस या मालिकांमुळे घेतोय.