Skip to main content

मेंदू

लेखक drsunilahirrao यांनी मंगळवार, 09/07/2013 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
विचार असे ...मग़ तसे आणि कसेही.. इथे -तिथे ,घऱात , रस्त्यात , ऑफिसात भुणभूण भुणभूण ; मेंदू नुसता ठसठसतो ! कायच्या काय अंतर्बाह्य घुसळण. प्रवास कुठुन कुठे .. कुठेच्या कुठे. कसलेकसले मेंदूइतके क्लिष्ट संदर्भ: धुसर, गडद ,काळे, निळे ,हिऱवे ,भगवे; मिसाईलसारखे धावून येतात अंगावर ! दीर्घ युद्धातली वाताहत झाल्यावर अखेर तू भेटतेस : विचार तिथेच अडतात, गुंततात , विसाव्याला थांबतात ...! मी शिणलेला मेंदु टेबलवऱ काढुन ठेवतो ! - डॉ. सुनील अहिरराव http://aaskmed2.blogspot.in/2013/07/blog-post_8.html

सुख

लेखक अनिल आपटे यांनी मंगळवार, 09/07/2013 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यभर सुखाकरिता धडपडणे किंवा त्याचा शोध घेणे हा माणसाचा आवडता छंद असतो. त्याचे अवघे आयुष्य या धडपडीत निघून जाते. पण नेमके सुख कशात असते हे त्याला समजत नसते. नेमके काय केल्याने सुख मिळेल हे त्याला समजत नसते. बालपण खेळण्या बागडण्यात, तारुण्य विषयोपभोगात तर वृद्धत्व माणसाला रोग व चिंता यांनी ग्रस्त अवस्थेत नेउन सोडते. त्यामुळे मिळालेले सुखाचे क्षण उपभोगणे हेच योग्य. कारण मनुष्य स्वभाव असा आहे कि सुखाचा सहवास घडला तर त्याचा प्रत्यक्ष आस्वाद घेण्याऐवजी ते ओसरून तर जाणार नाहीना या काळजीने मन काळवंडून जाते म्हणून सुखात डुंबता आला पाहिजे. शेवटी सुख हे मानण्यावरच असते नाही का?

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (५)

लेखक तुमचा अभिषेक यांनी मंगळवार, 09/07/2013 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसभर पायाला भिंगरी लावलीय, असे धावपळीचे आयुष्य आम्हा मुंबईकरांचे. संध्याकाळी परतताना मात्र पळत सुटायचे काम ट्रेनवर सोपवून आम्ही निवांत बसतो.. नेहमीचेच कंपार्टमेंट, अन आवडीचीच जागा, पण नेहमीच काही गप्पा मारल्या जात नाहीत किंवा पुरेश्या मारून झाल्या की आपापल्या आवडीनुसार हाताला चाळा अन बुद्धीला खाद्य पुरवायला सुरुवात होते. ती मोबाईल गेम्स उघडते, तर मी माझ्या तोडक्यामोडक्या ईंग्रजीच्या भरवश्यावर न्यूजपेपरमध्ये शिरतो. आजही तसेच काहीसे.. मांडीवर ठेवलेल्या पेपर वरून नजर भिरभिरवत सहज सवयीनेच एक नजर उजवीकडे तर एक नजर डावीकडे.. तर फिरून पुन्हा आणखी एक नजर उजवीकडे फिरवली..

बाळूचे स्वप्न - (बाल कविता)

लेखक विदेश यांनी सोमवार, 08/07/2013 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
सशाने धरले सिँहाचे कान गरगर फिरवून मोडली मान । शेळीने घेतला लांडग्याचा चावा लांडगा ओरडला-धावा धावा । मुंगीची ऐकून डरकाळी कानात हत्ती घाबरून पळाला रानात । कासवाने लावली हरणाशी शर्यत हरीण दमले धापा टाकत । उंदराने बोक्याच्या पकडून मिशा काढायला लावल्या दहा उठाबशा । बाळूने मोजले दोन सात चार स्वप्नात बाळू मोजून बेजार ! '
काव्यरस

पत्रास कारण की… (कथा)

लेखक मी_देव यांनी सोमवार, 08/07/2013 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
ते दिवस मला आजही जसेच्या तसे आठवतायत. त्यावेळी ब-याच पोस्टल कर्मचा-यांच्या बदल्या झाल्या होत्या. माझी ही झाली आणि माझं संकट आणखी मोठं झालं. उतार वयामुळे माझ्या आईची तब्येत खूप खालावली होती. पण नशिबाने मला माझ्या त्या वेळेच्या राहत्या घरापासून तसं जवळच हलवलं गेलं. मी मूळचा राजापूरचा. राजापूर कोंकणातलं एक टुमदार गाव. आता त्याला शहर अशी ओळख मिळाली असेल, पण १९८९ मध्ये ते एक गावच होतं. माझी बदली भांबेडला झाली होती. भांबेड तसं खूप छोटं गाव, पण आजूबाजूच्या दुर्गम भागात तेच एक मोठं. भांबेड आणि आजूबाजूची पाच-सात गावं सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेली. कोंकणाचा पूर्वेकडील अगदी शेवटचा भाग.

आणि काही रंगीत लँडस्केप्स.........

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 08/07/2013 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
दहा आत्ता व दहा पुढच्या भागात टाकेन......... तळजाई.......पुणे. Simple, Free Image and File Hosting at MediaFire कोकणातील एक रस्ता व त्यावरील हलणारी झाडे... Simple, Free Image and File Hosting at MediaFire भिगवणचे घोडे.........

आधीन

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 08/07/2013 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
ओठात माणसांच्या पोटातले उखाणे मेघात चांदण्यांचे संकेत आड गाणे आधीन ओघळांच्या वाहे उदंड पाणी एकांत सागराची पागोळते विराणी थेंबास थेंब भेटे वाटेत पथिक गोटे ओसांड अंतराचे पथ सोडुनी समेटे कधि कुंपणे तळ्याची प्रतिबिंब अंबराचे साकेत भ्रामकांचे अंदाज थेट खोटे सारे खरे परंतू हृदयी उलाल कोणी मातीत सांडलेले उगवे फिरून अवनी संजीवनी जणू ही गत सुप्त भावनांना आशा अजून वेडी संदेश हा पळांना ........................अज्ञात
काव्यरस

'बिग डेटा' - म्हणजे काय रे भाऊ?

लेखक सोत्रि यांनी सोमवार, 08/07/2013 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
आज तंत्रज्ञानाचा वेग आणि झपाटा इतका आहे की त्या वेगाने बावचळूनच जायला होते. त्यात सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या सगळ्या ‘दादा’ कंपन्यांना 'मार्केट शेयर'वर ताबा मिळविणे गरजेचे असल्याने त्यातली स्पर्धा अतिशय जीवघेणी झालेली आहे. त्यामुळे ‘टाइम टू मार्केट’ ह्याला इतके महत्त्व आले आहे की थोडा उशीर झाला तर स्पर्धेतून बाहेर फेकले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे मग एखादी संकल्पना घेऊन बाजारात त्यावर आधरित एक गरज निर्माण करून, त्यावर आधारित प्रॉडक्ट्स बनवून ती विकण्यासाठी ‘बाजारपेठ’ तयार करण्याचे काम ह्या बलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्या नेमाने करत असतात.

वारी......

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 08/07/2013 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
दर आशाढी कार्तिकी एकादशी ला पंढरपूर ला वारी निघते. लाखो लोक वारीत सामील होतात. आषाढी वारीला जायचे म्हणजे खरेतर शेतात पेरणीचा हंगाम ऐन बहरात असतो. नुकतीच पेरणी झालेली असएत व्हायची असते अशातच शेतकरी कामेधामे सोडून वारीला जातात. त्यांच्यासाठी वारी हा एक विरंगुळा असतो. पण त्यामुळे कामे रखडतात / शासन यंत्रणेवर अवास्तव ताण येतो. कारण नसताना शासन यंत्रणेला सुरक्षा यंत्रणेला राबवले जाते. लोकांचाही वेळ वाया जातो. खरेतर हिंदु धर्मात वारी देव दर्शन या वैयक्तीक गोष्टी मानलेल्या आहेत.