मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाळूचे स्वप्न - (बाल कविता)

विदेश · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
सशाने धरले सिँहाचे कान गरगर फिरवून मोडली मान । शेळीने घेतला लांडग्याचा चावा लांडगा ओरडला-धावा धावा । मुंगीची ऐकून डरकाळी कानात हत्ती घाबरून पळाला रानात । कासवाने लावली हरणाशी शर्यत हरीण दमले धापा टाकत । उंदराने बोक्याच्या पकडून मिशा काढायला लावल्या दहा उठाबशा । बाळूने मोजले दोन सात चार स्वप्नात बाळू मोजून बेजार ! '

वाचने 2824 वाचनखूण प्रतिक्रिया 4

गंगाधर मुटे 09/07/2013 - 12:47
एकदम चांगली विनोदी कविता. (पण प्राण्यांचा स्वभावविशेषगूण समजले आहे, एवढे वय असणार्‍यांनाच ही कविता कळू शकेल आणि आनंद घेता येईल.)