भारताचं खरं दुर्दैव
नुकत्याच एका ऐतिहासिक ठिकाणाला दिलेल्या भेटीत पुन्हा एकदा लोकांच्या भावनाहीनतेचं, चंगळवादाचं, मगरुरीचं, अहंकाराचं प्रदर्शन बघायला मिळालं. तसं ते वाण्याकडून चार साबण आणायला गेलो तरीही बघायला मिळतं; पण अशा विशेष ठिकाणी, किंवा काही विशेष सण-समारंभात ते जरा ‘विशेष’ असतं. रस्त्यावर गाडी चालवताना तर आपण जगाचे राजे हा भाव तनामनात घेऊन लोकं वावरतात. म्हणजे सांगायचंच झालं, तर त्यांच्या वाटेमधे साधं पाखरू जरी आलं तरी त्याची आई-बहीण काढतात.
आता रांग आहे, म्हणजे आपल्या पुढे लोकं असू शकतात. पण आपण जगाचे राजे म्हटल्यावर आपल्या मधे कुणी येऊच कसा शकतो?
मिसळपाव
याच वर्षात दादासाहेब फाळके या भारतातील चित्रपटक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने पुरस्कृत झालेले हिंदी चित्रसृष्टीच्या गतकाळातील "सुप्रसिद्ध" खलनायक तसेच चरीत्रनायक प्राण सिखंड यांचे वृद्धापकाळाने आणि आजारापणाने निधन झाले आहे.
खलनायक पण ग्रेसफूल असू शकतो हे प्राण यांच्या भुमिका बघताना समजते... मधूमती, कश्मीर की कली, आदी अनेक चित्रपटातील त्यांच्या खलनायक असलेल्या भुमिका गाजल्या असल्या तरी त्यापेक्षा कसौटी आणि जंजीर मधली त्यांची दोन गाणीच अधिक आठवत आहेत...