Skip to main content

मुंबईच आगळ रुप पाहताना

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 14/07/2013 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण मुंबईत एका बांधकाम पूर्णत्वाला आलेल्या इमारतीमध्ये अगदी थेट गच्चीवर जायची संधी मिळाली. मुळात वर जाणे हासुद्धा एक थरारक अनुभव होता - अजुन काम बरेच बाकी असल्याने उद्वाहन कार्यरत झाने नवह्ते. इमारतीच्या बाहेरुन लोखंडी मनोरा बांधुन त्यात तात्पुरते उद्वाहन म्हणजे चक्क एक पिंजरा बसविला होता. एखाद्या हॉटेलच्या बाहेरुन लावलेल्या कॅपसूल लिफ्ट मधुन बाहेर पाहणे वेगळे. इथे फट फट फट फट आवाज करत सरळ्सोट वर चढत जाणार्‍या पिंजर्‍यातुन लहान होत जाणार्‍या इमारती आणि आपण केवळ एका कप्पीवर आहोत ही धास्ती क्षणभर का होईना पण जाणवली.

पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०३ : पूर्वतयारी - आपले मार्गदर्शक

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 14/07/2013 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
===================================================================== पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८...

आनंदाचे डोही आनंद तरंग (तीन)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 14/07/2013 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
उनक जे समोर आहे ते बिनशर्त खाणे हा बायकोच्या जाचातुन सुटायचा सर्वोत्तम मार्ग आहे. तीने जे बनवले ते बिनशर्त खाल्ले की मग तक्रारीला जागाच रहात नाही. पण मुकाट खायला तुमचे मन धजवत नाही. आणि "तुम्हाला माझे कौतुकच नाही" असे म्हणत बायको हॉटेल मधुन पार्सल आणु देत नाही. आपले लगाम बायको कडे आहेत हे आपण उघडपणे नाकारतो (किंवा चारचौघात तसे कबुल करायला लाजतो). पण त्या मुळे सत्य लपुन रहात नाही आणि मग चारचौघात बायकोच्या इशार्‍यावर नाचत नाही हे दाखवणार कस?

ग बाई तुन्ह नाव शे सुपडाबाई

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 14/07/2013 03:39 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी खालील गीत हे अहिराणी भाषेत (खानदेशी नव्हे) लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. ही भाषा मला ऐकून ओळखीची आहे परंतु त्यावर माझे प्रभुत्व नाही. यास्तव काही शब्द कमीजास्त असतील तर ते सांगावेत.
Taxonomy upgrade extras

चारोळी

लेखक राजा सोव्नी यांनी शनिवार, 13/07/2013 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
काव्य शोधण्या हवे मन कोमल हास्य शोधण्या हवे मन निर्मल प्रेम शोधण्या हवे मन गंभीर दुखः झेलण्या हवे मन खंबीर काव्य हे स्फुराया हवे हास्य हे फुटाया हवे विचार हे प्रगटाया हवे भाव हे फुलाया हवे
काव्यरस

पेरी-पेरी (बटरफ्लाय) चिकन

लेखक गणपा यांनी शनिवार, 13/07/2013 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो. उद्या रविवार त्यात परत एकादशी, संकष्टी वैग्रे ही काही नाही. तेव्हा कोंबडी हाणायला कुणाची हरकत नसावी. काय म्हणता ? ;) ईथे बाहेर मस्त धो धो पाऊस कोसळतोय. काही तरी झणझणीत चापायची इच्छा होतेय. आज फार दिवसांनी मुड ही लागलाय.

केस

लेखक drsunilahirrao यांनी शनिवार, 13/07/2013 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
' केस ' 10 April 2013 तारखेला 11:58 AM वाजता डोक्यावरचे केस हा प्रत्येकाच्या व्यक्तीमत्वाचा महत्वाचा भाग असतो. काही लोक निव्वळ केसांमुळे ओळखले जातात आणि प्रसिद्ध होतात. काही निव्वळ केस नाहीत म्हणून ओळखले जातात. अनेक सेलिब्रिटींचे केस हीच त्यांची ओळख असते. उदा. बच्चन, अनुपम खेर वगैरे. एपीजे अब्दुल कलाम आणि तत्सम महान लोक यांचा आपण इथे अपवाद करुयात. कारण हे लोक त्यांच्या कर्तृत्वाने जेवढे ओळखले जातात, तेवढेच त्यांच्या केसांमुळे ! समजा अनुपम खेर यांच्या डोक्यावर शोले चित्रपटातील बच्चनच्या केसांचे रोपण केल्यास कसे वाटेल ?

< निशःब्द >

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 13/07/2013 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा http://misalpav.com/node/25136 सुरेश चे लग्न जमत नसते त्यामुळे तो टेन्शन मधे असायचा. आज बुधवार होता. बुधवारी एक कविता करणे हा सुरेशचा नियम होता त्यामुळे तो आजतरी बाहेर जाणार नव्हता. मात्र लग्न जमत नाही या तेन्शन मुळॅ त्याच्या बुधवारच्या कविता आटल्या होत्या. इतक्यात रमेश चा फोन आला " काय अरे सुरेश बाबांची प्यान्ट टेलरकडुन आणायची विसरलास.