Skip to main content

गंध फुलांचा गेला सांगून

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 26/07/2013 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावच्या दर्दी वाचकांना आवाहन. वेगवेगळ्या ऋतूंमधली वेगवेगळी फुले, त्यांचे विविध रंग अन सुवास! शिवाय त्या सुवासांबरोबर त्या सणांच्या अन सभारंभांच्या आठवणी... आठवणींची कुपी उघडली की असे अनेक सुवास तरळत बाहेर येतात. गुगल करून खूप शोधले, पण जशी हवी तशी, भारतातल्या फुलांची माहीती, अगदी महिन्यानुसार कुठेच मिळाली नाही. उगाच फुलवाल्यांच्या जाहिरातींनी भटकावले, किंवा अगम्य ईंग्लीश अथवा चायनीज नावे मिळाली. मिसळपावचे माहितगार वाचक महिना- भारतात मिळणारी फुले/फळे अशी माहीती इथे जमा करू शकतील असे वाटले, म्हणून इथे आलो आहे. चला तर, जमवू या... पारिजातक...

प्रिय सखे....

लेखक वेणू यांनी शुक्रवार, 26/07/2013 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय सखे, हे पत्र नाही, एक आवेग आहे... तो ओसरला की सारं शांत होईल... पूर्वीप्रमाणे, शांत! फक्त हा आवेग सांभाळून घे, समजून घे.... पेलून घे... दोन दिवस.. दोन दिवस झाले प्रचंड घूसमटते आहे.. प्रचंड! दोन दिवसांपूर्वी तुला फोन केला... खूप आनंदात.. माझ्याकडची आनंदाची बातमी तुला न देता तो आनंद साजरा होईलच कसा...?आपली सवयच ना... लहान लहानग्या इच्छा पूर्ण झाल्या की कर फोन ...आणि फोनवरच्या शब्दांतच सिलीब्रेशन, खरं तर तेच खरं आनंदानं न्हाऊन जाणं! अगदी तसाच तुझा नंबर डायल केला... तू फोन उचलेपर्यंत, नेमकं काय काय बोलायचंय...

रात्रीस उखाणा सुचला

लेखक प्रसाद साळवी यांनी गुरुवार, 25/07/2013 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
मी शब्द तुला सुचलेला, उधळून लावीतो कविता मी सूर उसवले दोन्ही, तिसर्‍याच्या उदयाकरता बघणार्‍या नजरांमधले वाटेत थांबले अंतर नजरेच्या क्षितिजाआडून सतरंगी जंतरमंतर वाजवता रंग उद्याचे, शत-गंध मोकळे होती ओघळत्या सेकंदांचे अडवून ठेवले मोती देऊळ-खांबा पक्षी क्षत-पंख पुसे इवलासा रदबदली अंधाराशी, हा निव्वळ फोल दिलासा वितळत्या भूतकाळातून निसरडी पाऊले आली घमघमत्या आज-उद्याशी आडवी-तिडवी रमली कधी स्तब्ध उभ्या असलेल्या, डोंगरमाथ्याआडून मुक्त स्वरांनी सरिता नाचते जाणीवा विसरून
काव्यरस

पोटभर जेवा !

लेखक मदनबाण यांनी गुरुवार, 25/07/2013 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी देशात सगळं कसा आनंदी आनंद आहे ! अहो कसा नसणार आपल्या नेत्यांनी पोटभर जेवणाची सोय केली आहे.राज बब्बर म्हणतात १२ रु आजपण मुंबईत पोटभर जेवण मिळते. तर त्यांच्याच पक्षातील रशिद मसुद यांनी तर फक्त ५ रु दिल्लीत पोटभर जेवण मिळेते. दिल्ली मुंबई पेक्षा इतके स्वस्त आहे आणि ५ रु च्या जेवणासाठी मुंबईत १२ रु मोजावे लागतात त्यामुळे मुंबईतल्या महागाईचा मी निषेध नोंदवतो. मी म्हणतो देशातल्या लोकांना या गोष्टीचा आत्ता पर्यंत पत्ता कसा लागला नव्हता ? इतकी स्वस्ताई तुम्ही किती वर्षापुर्वी अनुभवली होती बरं ? आठवुन सांगाल काय ? काय फार विचार करायला लागतोय ? नक्की कधी ते आठवत नाही ?

तान्हुला

लेखक Bhagwanta Wayal यांनी गुरुवार, 25/07/2013 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
चिमुकला तान्हा ठेऊन घरी आई त्याची जाते कामावरी असते गरज आणिक मजबुरी करते मग ती लोभाची चाकरी कोणी ठेविती त्याच्यासाठी दाई परी आईची माया कोण देई जीवापाड सांभाळ करू पाही तरी आईची सर येणार नाही पूर्ण वेळ ऑफिसात जातो घरी येण्यास रोज ऊशिर होतो वाट बघून बाळ झोपी जातो झोपेतच तो आई आई म्हणतो बाळ वाढले पाळ्णा घरात आईबाबांच्या आठणी ऊरात आसवांचा पुर लोट्ला जोरात रडे तेंव्हा तो भावनेच्या भरात आई मित्रांना शाळेत घेऊन जाती बघुन त्याच्या डोळ्यांत आश्रु येती आई वडिल आणिक नाती-गोती पैशापुढे सर्वच विसरुन जाती कोणी जाणा हो त्यांच्या भावनेला नका छळू त्या कोवळ्या मनाला भुकेले ते मातेच्या वात्सल्याला द्यावे प

पनीर कटलेट

लेखक जागु यांनी गुरुवार, 25/07/2013 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः २०० ग्रॅम पनिर कुस्करून २ मध्यम आकाराचे कांदे चिरुन १ गाजर किसून १ वाटी बारीक चिरलेला कोबी २ बटाटे उकडून मॅश करुन १ चमचा आल लसुण पेस्ट १ चमचा मिरची-कोथिंबीर पेस्ट २ मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर गरजे नुसार मिठ पाव ते अर्धा वाटी तेल चाट मसाला

" चिऊ चिऊ चिडकी - " (बालगीत)

लेखक विदेश यांनी गुरुवार, 25/07/2013 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
बाळ दिसला हळूच हसला "ये ये" म्हणाला खाऊ घे म्हणाला - चिऊ चिऊ चिडकी बंद खिडकी चोच आपट काचेवर टकटक - बाळाने उघडली चिऊ चिऊ आली लाडूचा खाऊ चोचीने घेऊ - बाळाने मुठीत लाडू लपवला बाळ हळूच खुदकन हसला - चिऊ चिऊ चिडली खाऊसाठी रडली खिडकी बाहेर "चिऊचिऊ" ओरडली ! .
काव्यरस

" आरती कंत्राटदाराची - "

लेखक विदेश यांनी गुरुवार, 25/07/2013 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
' जीव जाई, जीव जाई, कंत्राटदारा थैली झटकुन खड्डेदुरुस्ती करा || साटे लोटे तुमचे जमले असेल आगाऊ रक्कम घेतली असेल लाज शर्म थोडी शिल्लक असेल नैतिकता काही ध्यानीमनी धरा || पावसाळ्यात नेमके खड्डे पडावे सगेसोयरे तुमचे त्यात धडपडावे विरोधी प्रतिनिधीनी गृही ओरडावे खाल्लेल्या पैशावर उपकार करा || अपचन अजीर्ण होऊ देऊ नका डोळ्यावर कुणाच्या तुम्ही येऊ नका आयकरवाले पहा घालतील डाका घरच्या लक्ष्मीची आठवण करा || .
काव्यरस

प्रथम तुजं पाहता........!!!

लेखक स्पंदना यांनी गुरुवार, 25/07/2013 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
एका ऑस्ट्रेलिअन शॉर्ट स्टोरीवर आधारित. मुळ कथा Hate at First Sight , Kathy Lette [मानवी मनाच्या अनेक कंगोर्‍यापैकी हा एक कंगोरा! सहसा न चर्चीलेला, पण का कुणास ठाउक; ऑस्ट्रेलिअन लिटरेचर मध्ये मी अश्या दोन चार कथा वाचल्या. आपल्या "ताई" या संज्ञेला तडा देणार्‍या या कथा वाचुन त्यावर आधारित काही लिहावं अस वाटल खरं,पण खरच आपल्या संस्कृतीत असुनही नसलेला असा हा कंगोरा आहे. मी ही या कंगोर्‍याची सांगड आपल्या भाषेत मांडु नाही शकले.