मिसळपावच्या दर्दी वाचकांना आवाहन.
वेगवेगळ्या ऋतूंमधली वेगवेगळी फुले, त्यांचे विविध रंग अन सुवास!
शिवाय त्या सुवासांबरोबर त्या सणांच्या अन सभारंभांच्या आठवणी...
आठवणींची कुपी उघडली की असे अनेक सुवास तरळत बाहेर येतात.
गुगल करून खूप शोधले, पण जशी हवी तशी, भारतातल्या फुलांची माहीती, अगदी महिन्यानुसार कुठेच मिळाली नाही. उगाच फुलवाल्यांच्या जाहिरातींनी भटकावले, किंवा अगम्य ईंग्लीश अथवा चायनीज नावे मिळाली.
मिसळपावचे माहितगार वाचक महिना- भारतात मिळणारी फुले/फळे अशी माहीती इथे जमा करू शकतील असे वाटले, म्हणून इथे आलो आहे.
चला तर, जमवू या...
पारिजातक... ऑगस्ट सप्टेंबर (गणपतीत मिळतात हे आठवते आहे.)
..............
वाचने
27848
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
दसर्याचा आणि दिवाळीतला झेंडू
दसर्याचा आणि दिवाळीतला झेंडू.
शरद, हेमंत, शिशिर या तीनही ऋतुत रात्री रातराणीचा सुगंध असतोच.
उन्हाळ्यात अनंत आणि मोगरा.
जुई
बहुतेक पावसाळ्यादरम्यान बहरते !!
उन्हाळ्यात मधुमालतीलापण खूप
उन्हाळ्यात मधुमालतीलापण खूप छान फुलं येतात. घमघमाट असतो संध्याकाळनंतर.
पावसाळ्यात फुलणारा सोनटक्का.
पावसाळ्यात फुलणारा सोनटक्का. याचा गंध मला वेडावुन टाकतो.
जिंजर लिली म्हणतात याला विंग्लीश मध्ये.
पावसाळा आणि सोन्यासारखी
पावसाळा आणि सोन्यासारखी लखलखीत सोनकी
अजून कोणी व्हॅलेंटाईन डेच्या
अजून कोणी व्हॅलेंटाईन डेच्या गुलाबांची आठवण कशी काढली नाही? :))
आकाशमोगरा/ गगन जाई/ बुचाची फुले
वेडावून टाकणार्या गंधाच्या पांढर्या शुभ्र नाजूक लांब देठाच्या फुलांची ही उंचच उंच झाडे दिवाळीच्या आधीपासून तीन-चार महिने बहरत राहतात, हल्ली फारशी दिसत नाहीत :-(
फर्ग्युसन कॉलेजला याची भरमसाठ
In reply to आकाशमोगरा/ गगन जाई/ बुचाची फुले by बहुगुणी
फर्ग्युसन कॉलेजला याची भरमसाठ झाडं आहेत. फिजिक्स डिपार्टमेंटच्या समोर एक भलं मोठं झाड होतं याचं, ते काही वर्षांपूर्वी वादळात पडलं. अजून आठवण येते तिथून कधी जावं लागलं तर.. :(
पुणे युनिव्हर्सिटीत पण
In reply to फर्ग्युसन कॉलेजला याची भरमसाठ by पिशी अबोली
पुणे युनिव्हर्सिटीत पण चिक्कार आहेत. जानेवारीत सकाळी लवकर फिरायला गेलं की मस्त धुन्द सुगन्ध येत राहतो. :)
पावसात फुलणारा सोनचाफा, तेरडा
पावसात फुलणारा सोनचाफा, तेरडा, आणि अनेक गवतातील फुले.. यातील तेरड्याला आरतीच्या तबकाला लावून तबक सुंदर सजवता येते. त्यामुळे गणपतीच्या सणाची आठवण आहे याची.
कोंकणीतील 'वागचापको' किंवा 'वागाची नाकटां' ज्याला मराठीत बहुधा 'हळदीकुंकवाची फुले' म्हणतात, तीपण पावसात फुलतात..
पाऊस बहुतेक संपताना केवडा फुलतो..त्या झाडीत जाऊन केवडा आणणे हे कष्टकर्मच आहे..
केवडा नाव वाचून एकदम केवडा अन
In reply to पावसात फुलणारा सोनचाफा, तेरडा by पिशी अबोली
केवडा नाव वाचून एकदम केवडा अन सुर्या अन मुकुंद जोश्या आणि सगळीच्या सगळी शाळा आठवली.
'वागचापको' किंवा 'वागाची नाकटां'
In reply to पावसात फुलणारा सोनचाफा, तेरडा by पिशी अबोली
म्हणजे कळलावी का?
काय पण नाव तरी तेच्यायला
In reply to 'वागचापको' किंवा 'वागाची नाकटां' by सूड
काय पण नाव तरी तेच्यायला =)) घाणेरी, दातपाडी, इ. च्या पंगतीत फिट्ट बसेल एकदम.
असावी..हे नाव ऐकल्यासारखं
In reply to 'वागचापको' किंवा 'वागाची नाकटां' by सूड
असावी..हे नाव ऐकल्यासारखं वाटतंय..लाल-पिवळी फुलं असतात.. :)
हे फूल म्हणतोय मी!!
In reply to असावी..हे नाव ऐकल्यासारखं by पिशी अबोली
नागकांडी
In reply to पावसात फुलणारा सोनचाफा, तेरडा by पिशी अबोली
कळलावी म्हणजे नागलखडी किंवा नागकांडी. यालाच नागकिटा, नागकडा, नागखडी/डा असेही म्हणतात. ही वनस्पती विषारी असते (विशेषतः तिचे मूळ) म्हणून आणि तिची फुले (पानेही) पिवळीजर्द-थोडी लाल छटा असलेली- असतात म्हणून तिच्या नावात नाग असतो. इंग्लिशमध्ये ग्लोरी लिली, ग्लोरिओसा सुपर्बा.
कळलावी हे नाव तुरळक प्रमाणातच प्रचारात होते. पण साधारणतः पंचवीस-तीस वर्षांपूर्वी पदभ्रमण-दुर्गभ्रमणासाठी तरुणांचे गट जंगलात फिरू लागले आणि या वनस्पतीतल्या अल्कलॉइड्सचा बाळंतपणाच्या कळा येण्यासाठी कुठल्यातरी आदिवासीपाड्याच्या रिमोट जंगलकोपर्यात कधीकाळी केला जात असलेला उपयोग आणि त्यामुळे तिथे वापरले गेलेले कळलावी हे नाव त्यातल्या बाळंतपणाच्या संदर्भामुळे थोडे आकर्षक आणि सनसनाटी वाटून तेच भटकंतीच्या मराठी संदर्भपुस्तकांमधून दिसू लागले आणि बघता बघता लोकप्रिय झाले. वनस्पतितज्ज्ञ हे देशी नावांबद्दल फारसे आग्रही नसतात कारण वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी नावे प्रचलित असतात. त्यामुले स्टँडर्ड म्हणून इंग्लिश नॉमेन्क्लेचर वापरणे योग्यच आहे. पण नागकांडी-नागखडी सारखी सुंदर नावे प्रचारात असताना कळलावी सारखे नाव रूढ व्हावे ह्याचे एक मराठीभाषाप्रेमी म्हणून दु:ख होते.
वाघनखी नावाचीही एक वनस्पती असते.
च्या मारी..तुम्ही नक्की काय
In reply to नागकांडी by राही
च्या मारी..तुम्ही नक्की काय करता म्हणे हो??? नै म्हंजे तुम्हाला कशातलं माहिती नाही असा प्रश्न विचारायचा होता.
+१११११११११११
In reply to च्या मारी..तुम्ही नक्की काय by बॅटमॅन
प्रचंड सहमत..
करता काय तुम्ही राही ताई/दादा/काका/आजोबा?????
अहाहा!
फोटो आणि आठवणी! अगदी सुवास मनात दरवळला! धन्यवाद!
मला
म्हवाच्या फुलांचा दरवळ आवड्तो :-)
निशिगंध..
त्याचा हलका सुगंध छान वाटतो.. पांढर्याशुभ्र निशिगंधाचा एक गुच्छ खोलीत असेल तर लगेच लक्षात येत नाही त्याच्या काहीशा साध्याशा विशेष आकर्षक नसलेल्या रुपामुळे.. पण तो दरवळ हलकेच जाणवत राहतो.
कोणी जालावरून प्रतिमा टाकल्यास आधीच धन्यवाद.देऊन ठेवतो...
मोगरा
उन्हाळ्यात रात्री फुलाणारा मोगरा....
उन्हाळ्यात जास्त पण इतरही वेळेस बहरणारा चाफा...
पावसाळ्यात फुलणारी जाई, जुई, नेवाळी, चमेली...
नवरात्राच्या वेळी बहर येणारी शेवंती...
बकुळ कधी बहरतो माहित नाही...
ईतरही कित्ती कित्ती फुले आहेत ज्यांना सुगंधी म्हणता येणार नाही पण त्यांचा स्वत:चा एक वेगळा गंध असतो, श्रावणात सोळा प्रकारच्या फुलांमध्ये ही हमखास असतात ( पण सुगंधी नसल्यामुळे नावे दिली नाहीत ).
श्रावणात कितीतरी (२४?)
श्रावणात कितीतरी (२४?) प्रकारची पत्री वाहतात त्यातली पानंही सुगंधी असतात. दवणा, मरवा यांचा तर सुंदरच असतो गंध.
आघाड्याची पानं, दुर्वा पत्री
In reply to श्रावणात कितीतरी (२४?) by कवितानागेश
आघाड्याची पानं, दुर्वा पत्री म्हणून गौरीगणपतीच्या पुजेसाठी आणली जातात. तरी आणखी एका फुलाचे नाव आठवत नाहीये.
जास्वंद
बारमाहि असणारा लाल ,पांढरा जास्वंद ,त्याला सुंगध नाही पण मन मोहवतो सकाळी
आणखी काही
मोगरा वर्गातली किंवा मोगर्याशी साधर्म्य असलेली अनेक फुले. मोगरा, बटमोगरा, हजारीमोगरा, जाई, जुई, चमेली, सायली, नेवाळी, मोतिया, कुंती-कामिनी, कुंद, कुसर, मदनबाण, मल्लिगे वगैरे. चाफ्याचे सर्व प्रकार. अगदी खुरचाफ्यालाही मंद वास असतो. सोनचाफा, कवठी चाफा, हिरवा चाफा, नागचाफा, भुईचाफा (ह्याचा कंद जमिनीत असतो आणि लिलीसारखे दांड्यातून फूल येते.) सोनटक्का, कृष्णकमळ, अनंत/तगर, सुरंगी (फक्त चैत्रात फुलते). कैलासपतीच्या फुलालाही मंद वास असतो पण फळे मात्र दुर्गंधदायक. शेवंती-गोंड्यालाही आपापला गंध असतो. बाकी केवडा, बकुळ, तुळस, सब्जा, दवणा, पाचू, माली ह्यांचा वरती उल्लेख झालाच आहे
उन्हाळ्याच्या सुरुवातीस
उन्हाळ्याच्या सुरुवातीस करवंदांच्या जाळीवर फुललेली फुलं पण थेट मोगरा , जाई जुई यांच्याशी स्पर्धा करतात .
घेवड्याच्या वेलीवरच्या फुलाना पण एक वेगळाच सुगंध असतो .
उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला
उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला असलेले भलेमोठे वृक्ष पण फुल्लानी बहरतात
नाव माहित नाही , पण त्यांच्या सुगंध वेडावणारा असतो .
दाढीच्या ब्रश सारखी मौ मौ फुलं येतात. पिवळा आणि गुलाबी असे दोन रंग असतात .
गुलमोहर?
In reply to उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला by स्पा
गुलमोहर म्हणताय का?
तोही लाल आणि पिवळा ह्या प्रकारात असतो आणि उन्हाळ्यात फुलतो.
गुलमोहराची फुलं तर खायची
In reply to गुलमोहर? by सुनील
गुलमोहराची फुलं तर खायची असतात. मस्त आम्बट गोड लागतात. :)
त्यातही ती "राजा" पाकळी, काय
In reply to गुलमोहराची फुलं तर खायची by कवितानागेश
त्यातही ती "राजा" पाकळी, काय मस्त चव लागते , लैच मज्जा :)
गुलमोहराची फुलं का त्याच्या
In reply to गुलमोहराची फुलं तर खायची by कवितानागेश
गुलमोहराची फुलं का त्याच्या गुच्छातला कोंबडा..?
मी लाल पाकळ्या आणि 'कोंबडा'
In reply to गुलमोहराची फुलं का त्याच्या by मोदक
मी लाल पाकळ्या आणि 'कोंबडा' दोन्ही खायचे.
अवांतरः मी माज करत नाही =))
गुलाबी असणारा तो पर्जन्यवृक्ष
In reply to उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला by स्पा
गुलाबी असणारा तो पर्जन्यवृक्ष. पिवळसर हिरवट असणारा तो शिरीष. दोघं जवळपास सारखेच दिसतात. पण फुलांच्या स्ट्रक्चरमधे थोडा फरक असतो आणि वासपण किंचित वेगळा असतो.
शिरीषकुसुमम् म्हणजे कालिदासाची नायिकांसाठीची फेवरिट उपमा... :)
मी लहानपणी या दोन्ही फुलांना दाढीचा ब्रश म्हणूनच ओळखायचे.. :)
+
In reply to गुलाबी असणारा तो पर्जन्यवृक्ष by पिशी अबोली
हा हेच ते वृक्ष :)
त्या फुलाना शिरीष असे नाव आहे
In reply to उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला by स्पा
त्या फुलाना शिरीष असे नाव आहे.
( काही लो क्याला लॅबर्नम असेही म्हणतात. पण ल्याबर्नम ला जर्द पिवळी कडुनिंबासारखी फुले येतात)
अहाहा..
सगळ्या फुलांचा मंद दरवळ पसरला...
छान धागा!
स्वाती
हे घ्या
https://www.flowersofindia.net/ हे घ्या आणि पाहिजे ते फुल शोधा
दवण्याचा गंध मला फार आवडतो...
दवण्याचा गंध मला फार आवडतो... किंचीत गुढता भारली असावी असाच काहीसा वाटतो तो गंध. पाचुचा गंध काही केल्या आता आठवत नाहीये... बाकी सोनटक्क्याची नाजुक फुल आणि तसाच त्याचा नाजुक सुगंध.
सुरंगीच्या गजर्याचा गंध तर अफलातुन असतो... :)
पाचू?
In reply to दवण्याचा गंध मला फार आवडतो... by मदनबाण
हे फूलाचं नाव आहे? फोटु मिळंल काय?
हे फूलाचं नाव आहे? फोटु मिळंल
In reply to पाचू? by सूड
हे फूलाचं नाव आहे? फोटु मिळंल काय?

(फोटो जालावरुन घेण्यात आलेला आहे.)
दवणा
पाचू
In reply to पाचू? by सूड
पाचूचे तुरे असतात. पानांसकट डोक्यात घालतात.
https://www.maayboli.com/node/22479 इथे जागूने त्याबद्दल लिहिले आहे. फोटो आहेतच!
मला आवडतात मे महिन्यात थोडेच दिवस येणारी बकुळीची (ओवळीची) फुले आणि सुरंगी. मोगर्यासारखीच थोड्या दिवसांत सगळ्या वर्षाचं फुलून घेणारी!
पावसाळी रानफुले
कुडा
सुरंगी
कवळा
मुसळी
चित्र उपलब्ध नाही
पुंगळी
संकासूर
पेव
चित्र उपलब्ध नाही
सर्व पावसाळी रानफुले.
झैरात सुरू :
कुडा सुरंगी कवळा मुसळी पुंगळी संकासूर
पेव फुलांचे फुलता उमले भूवर सौख्यांकुर
झैरात संपली.
फोटो अप्रतिमच..सगळे सुगंध
In reply to पावसाळी रानफुले by मेघवेडा
फोटो अप्रतिमच..सगळे सुगंध दरवळले... कवळ्याची फुलं आवडतात, नाव माहीत नव्हतं... :)
फक्त सुरंगी पावसात फुलत नाही...
मस्त चाललाय धागा पुढे !
मस्त चाललाय धागा पुढे !
या सगळ्यात बकुळीच्या फुलांची आठवण कशी नाही झाली कोणाला. फुले ताजी असतानाचा दरवळ सुकल्यावरही अनेक आठवडे कायम राहतो... माझा आवडता सुगंध !
काल पानशेत परिसरात भटकंती करत
काल पानशेत परिसरात भटकंती करत असताना टिपलेले हे पावसाळी फुलांचे फोटो! पावसा इतकेच फ्रेश! :)
=======================================================
=======================================================
=======================================================
========================================================
उत्तम धागा
धागा आवडला नवीन माहिती मिळाली.
वाहव्वा! फुले आनंदाच्या लगडी!
वाहव्वा! फुले आनंदाच्या लगडी!
प्राजक्त / पारिजातक चा अजून उल्लेख नाही?
प्राजक्त / पारिजातक चा अजून उल्लेख नाही?
संपूर्ण झाड औषधी गुणधर्म असलेले ...
फूल, पान, साल , एवढेच नाही तर त्याचे सान्नीध्यही औषधी
जरा आणि मरणास दूर ठेवणारा असे म्हटले जाते.
आणि फुलांचा गन्ध आणि अंगणातील गोल सडा तर ... वा........
किणकिनाट
+१
In reply to प्राजक्त / पारिजातक चा अजून उल्लेख नाही? by किणकिनाट
+१
सकाळी झाडाखाली पडणारा फुलांचा सडा डोळ्यासमोर आला !
-
एकदम सुगंधीत झालेला धागा आवडला :)
अमोल केळकर
दसरा जवळ आला. झेंडू/गोंडा आता
दसरा जवळ आला. झेंडू/गोंडा आता एकदम फॉर्मात येतील... :)
आणि फुलांचा नसला, तरी आत्ता तयार झालेल्या शेतांचा आणि वाढलेल्या गवताचा वासही मस्त वाटतोय..