Skip to main content

रात्रीस उखाणा सुचला

लेखक प्रसाद साळवी यांनी गुरुवार, 25/07/2013 22:51 या दिवशी प्रकाशित केले.

मी शब्द तुला सुचलेला, उधळून लावीतो कविता
मी सूर उसवले दोन्ही, तिसर्‍याच्या उदयाकरता

बघणार्‍या नजरांमधले वाटेत थांबले अंतर
नजरेच्या क्षितिजाआडून सतरंगी जंतरमंतर

वाजवता रंग उद्याचे, शत-गंध मोकळे होती
ओघळत्या सेकंदांचे अडवून ठेवले मोती

देऊळ-खांबा पक्षी क्षत-पंख पुसे इवलासा
रदबदली अंधाराशी, हा निव्वळ फोल दिलासा

वितळत्या भूतकाळातून निसरडी पाऊले आली
घमघमत्या आज-उद्याशी आडवी-तिडवी रमली

कधी स्तब्ध उभ्या असलेल्या, डोंगरमाथ्याआडून
मुक्त स्वरांनी सरिता नाचते जाणीवा विसरून

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2671
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

शृंगार बिंगार तर सोडा, ओळीच्या शेवटाचे अक्षर शेम हाय एवड्च क्वालीफिकेशण मला तर दिसलं. :(
बाकी अजुन काय कोणाला आढ्ळल्यास समजावून सांगण्याची कृपा करावी ही नम्र विनंती.
गुर्जींना पण भर्पूर प्रेम रस कूठे दिसला कुणास ठाऊक. बहुधा ते स्वतःच प्रेमस्वरुप झाले असावेत. ;)


In reply to by अभ्या..

@बहुधा ते स्वतःच प्रेमस्वरुप https://www.easyfreesmileys.com/smileys/free-evil-grin-smileys-846.gifझाले असावेत. smiley>>> =))