चिमुकला तान्हा ठेऊन घरी
आई त्याची जाते कामावरी
असते गरज आणिक मजबुरी
करते मग ती लोभाची चाकरी
कोणी ठेविती त्याच्यासाठी दाई
परी आईची माया कोण देई
जीवापाड सांभाळ करू पाही
तरी आईची सर येणार नाही
पूर्ण वेळ ऑफिसात जातो
घरी येण्यास रोज ऊशिर होतो
वाट बघून बाळ झोपी जातो
झोपेतच तो आई आई म्हणतो
बाळ वाढले पाळ्णा घरात
आईबाबांच्या आठणी ऊरात
आसवांचा पुर लोट्ला जोरात
रडे तेंव्हा तो भावनेच्या भरात
आई मित्रांना शाळेत घेऊन जाती
बघुन त्याच्या डोळ्यांत आश्रु येती
आई वडिल आणिक नाती-गोती
पैशापुढे सर्वच विसरुन जाती
कोणी जाणा हो त्यांच्या भावनेला
नका छळू त्या कोवळ्या मनाला
भुकेले ते मातेच्या वात्सल्याला
द्यावे प्रेम आपुल्या तान्हुल्याला
..................बी.डी.वायळ
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2115
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
पटलं नाही.
नसता गरज अथ्वा मजबुरी । असे
In reply to पटलं नाही. by प्रभाकर पेठकर
अंह..!
In reply to नसता गरज अथ्वा मजबुरी । असे by Bhagwanta Wayal
नसता गरज अथ्वा मजबुरी । असे
In reply to पटलं नाही. by प्रभाकर पेठकर
नसता गरज अथ्वा मजबुरी । असे
In reply to पटलं नाही. by प्रभाकर पेठकर
काय राव
उचला या--'तळू' ला =))
शारंगधर सुखकारक वटी
अगं अगं लिली... तू परत शी
In reply to शारंगधर सुखकारक वटी by लीलाधर
छान