Skip to main content

नही, इंडियन ....!

लेखक सुधीर मुतालीक यांनी मंगळवार, 06/08/2013 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
…. रझाने मला लॉबीसमोर हॉटेल च्या मेन गेट जवळ सोडलं आणि गाडी पार्क करायला गेला. त्याची ही सवय आहे. गाडी पार्क करून पुन्हा परत येतो. आतमध्ये लिफ्ट पर्यंत येतो आणि तिथे गुड नाईट म्हणुन परत जातो. त्यामुळे गाडीतून उतरून त्याची वाट बघत थांबलो. आजूबाजूला आज प्रचंड संख्येने गाड्या लागल्या होत्या. त्यात पुष्कळ गाड्या पोलिसांच्या आणि त्याहून थोड्या कमी काळ्याशार चकचकीत मर्सिडीज ! मर्क्स वर सात आठ वेगवेगळ्या देशांचे छोटे झेंडे लावलेले. मला अंदाज आला, आज काहीतरी मोठा कार्यक्रम हॉटेल मध्ये असणार. …. आज सकाळीच जाताजाता रझाला मी म्हटलं होतं की पाचशे रूम्सचे एवढं टोलेजंग हे हॉटेल आहे.

मलई पनीर / पनीर मलई

लेखक दिपक.कुवेत यांनी मंगळवार, 06/08/2013 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
Paneer साहित्यः १. अमुलचे पनीर क्युब्स - २०० ग्रॅम २. चिरलेले कांदे - २ मध्यम ३. काजु/बदाम - १ चमचा प्रत्येकि (एच्छिक) ४. पेरभर आलं ५. लसुण पाकळ्या - २ ६. हिरव्या मिरच्या - २ ७. हळद - पाव चमचा ८. साखर - १/२ चमचा ९. तमालपत्र - २, जिरं - १/२ चमचा १०. तेल - ४ पळ्या ११. भरडसर वाटलेली काळि मीरी - २ चिमुट १२. फ्रेश क्रिम - १/२ कप १२. चवीनुसार मीठ, सजावटिसाठि कोथिंबीर कॄती: १. अमुलचे पनीर क्युब्स थोडया वेळ गरम पाण्यात ठेवा म्हणजे मउ पडतील २.

काळा-गोरा

लेखक सार्थबोध यांनी मंगळवार, 06/08/2013 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
काळा-गोरा गोऱ्या रंगाचे फार कौतुक; काळा रंग तितकासा कधी कुणाला आवडत नाही, या आवड-निवडीला कंटाळून; वैतागून काळा रंग गोऱ्या रंगाला काय म्हणतो .......

प्रथम तुज पाहता.......!!!-३

लेखक स्पंदना यांनी मंगळवार, 06/08/2013 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथम तुज पाहता........!!! प्रथम तुज पाहता.......!!!-२ तिच्या समोर आता प्रश्न होता तो; हे खूळ त्या येड्या सुझीच्या डोक्यातुन बाहेर कसे काढायचे हा! अर्थात सुझी भेटली की दोनचार प्रश्नात हा प्रश्न आपण निकालात काढु शकु असा आत्मविश्वास तिला नक्कीच होता. पण सुझीपेक्षाही या दिसायला धडधाकट ग्रेगने सुझीत काय पाहिले हा होता. इतका टेकीला येइल असा तर तो नक्कीच दिसत नव्हता.

वेरूळः भाग ५ (कैलास लेणी ३) अंतिम

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 05/08/2013 23:40 या दिवशी प्रकाशित केले.
वेरूळः भाग ५ (कैलास लेणी ३) अंतिम वेरूळः भाग ४ (कैलास लेणी २) वेरूळः भाग १ (जैन लेणी) वेरूळः भाग २ (ब्राह्मणी लेणी) वेरुळः भाग ३ (कैलास लेणी १) ----------------------------------------------------------------------------------------------------------------- मागच्या भागात आपण वेरूळच्या मुख्य कैलास मंदिराला फेरी मारून रामायणाच्या शिल्पपटापर्यंत आलो होतो.

जे के रोलिंग - कोकिळेचा आर्त पुकार

लेखक आदूबाळ यांनी सोमवार, 05/08/2013 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
बर्फाळ, गोठवणारी रात्र. काकडलेलं लंडन शहर झोपलेलं. याच रात्री एक सुप्रसिद्ध सुपरमॉडेल आपल्या घराच्या गच्चीतून पडते. (दिव्या भारतीची आठवण झाली की नाही!) पोलिस आत्महत्येचा निकाल देतात. पण तिच्या भावाला काही हे पटत नाही. तो सत्याचा शोध घेण्याचा निश्चय करतो.  कारमोरन स्ट्राईक ब्रिटनच्या लष्करी पोलिसांच्या सेवेत असतो. अफगाणिस्तानात सेवा करत असताना एका दहशतवादी हल्ल्यात त्याचा पाय तुटतो. त्यामुळे तो लष्करातून मुदतपूर्व निवृत्ती घेऊन लंडनमध्ये खासगी डिटेक्टिव्हचा व्यवसाय सुरू करतो. पण त्याचा व्यवसाय नीट चालत नाही. वाग्दत्त वधूबरोबर भांडणं होतात आणि ती त्याला घराबाहेर काढते.

सद्गदीत

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 05/08/2013 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
हलकेच खुणावे मज कोणी अंतरी सुरस श्रावण गाणी मन सुप्त कहाणी एकेरी व्यापल्या साचल्या आठवणी प्राजक्त क्षणांची ही वाणी ओळखी सख्यांची आळवणी उमले दरवळ कर्पुरी उरी नि:संग नितळ जणु की पाणी आकार निराकारात खुळा भिरभिर घरभर ही चाचपणी आनंद कधी विरहात भरे सद्गदीत द्वय हृदय पापणी ……………… अज्ञात
काव्यरस

राजस्थानी मिश्र डाल आणि बेसन पुरी

लेखक प्रभाकर पेठकर यांनी सोमवार, 05/08/2013 16:44 या दिवशी प्रकाशित केले.

Rajasthani-Dal-Puri मिश्र डाळीसाठी साहित्यः चणा डाळ १/४ वाटी अख्खे मसूर १/४ वाटी उडीद डाळ १/४ वाटी तूर डाळ १/४ वाटी मुग डाळ १/४ वाटी हळद १/२ लहान चमचा (टी स्पून) तिखट १ लहान चमचा जीरं १ लहान चमचा आलं १" टोमॅटो १ मध्यम कोथिंबीर मुठभर मीठ चवीनुसार. साजूक तुप

गुरुजींचे भावं विश्व! भाग-२

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 05/08/2013 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ http://misalpav.com/node/25298 >>> पुढे... त्या-मला ना...आमच्या मासिकासाठी तुमची मुलाखत हवी आहे? इथेच द्याल का? हा कर्यक्रम संपल्यावर... सुशी ओरडणार नै कै मला...(ही त्यांची- सुशी..म्हण्जे आमच्या यजमानांच्या सुविद्य पत्नी असतात..असं नंतरहून आंम्हाला..त्यांचा(ही) सह भाग मुलाखतीत झाल्यानंतर कळतं.. ================================= त्या-(मुलाखतकार मोड ऑन) नमस्कार...धर्मसमाज मासिकातर्फे तुमचं स्वागत! आंम्ही-(सर्व मोड ऑफ करून!!!) धन्यवाद त्या-तुमचं नाव काय? आंम्ही-आत्माराम सदाशिव बापट.

ये क्या जगाह है दोस्तो

लेखक शरद यांनी सोमवार, 05/08/2013 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
ये क्या जगह है दोस्तो श्री.गोरा सौमित्र यांच्या " प्रलयानंतरची प्रार्थना" या लेखा (ते कथा म्हणत असले तरी मी गद्यकाव्यच म्हणतो) वरचे प्रतिसाद वाचल्यावर मला आठवण झाली ती ये क्या जगह है दोस्तो, ये कोनसा दयार है ? हद्दे निगाहतक जहॉं गुबारही गुबार है ! मित्र हो, आपण मिपावर लिहितो तेव्हा आपण एमेचा पेपर सोडवत नसतो, सेमिनारमध्ये वाचावयाचा निबंधही लिहित नसतो, नाही सत्यकथेत प्रकाशित व्हावी अशी कविता. आपली छायाचित्रे नॅशनल जीओग्राफित प्रसिद्ध होण्याच्या योग्यतेची नाहीत हे आपल्याला माहीत असते. निदान माझी तरी अशी समजुत आहे.