Skip to main content

रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (चार)

लेखक संजय क्षीरसागर यांनी शनिवार, 10/08/2013 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
महाराज अधिक देखणे तरी निरंतर पाहणे योगिराज विनवणें मन आले ॐ मयी । (श्री ज्ञानेश्वर महाराज) फक्त समोर पाहण्यानं तुम्ही मनाच्या चकव्यातनं बाहेर पडू शकता! ____________________________________ ज्ञानेश्वर महाराजांच्या चित्तदशेशी एकात्मता साधून, अत्यंत शांतपणे; त्यांनी वर्णन केलेली ही काव्यात्मक प्रक्रिया समजावून घेऊ. मनाची तीन प्रमुख अंग आहेत : दृक, वाक आणि श्राव्य. या अभंगात महाराज दृक प्रक्रियेविषयी सांगतायत.

वॅलेंटाईन डे ! ___ शतशब्दकथा

लेखक तुमचा अभिषेक यांनी शुक्रवार, 09/08/2013 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
सालाबादाप्रमाणे येणारा प्रेमदिवस.. उधळायला संस्कृतीरक्षकांची जय्यत तयारी होतीच.. निषेधाचे बॅनर शहरभर लागले होते.. कट्ट्यावरच्या राहुल’चीही तयारी झाली होती.. चॉकलेट परफ्यूम ग्रीटींग अन फुले... आणखी काय लागते..! गेल्या तीन वर्षांचा त्याचा रेकॉर्ड होता, एकही वॅलेंटाईन डे फेल गेला नव्हता.. यावेळी मात्र अंदाज फसला.. त्याला हसूनच नकार देत ती पुढच्याकडे वळली.. टाय विस्कटतच त्याने पुष्पगुच्छ जमिनीवर आदळला.. अर्थातच, अपमान अन पराभवाची निशाणी कोणाला आवडते ! ते निघून गेले अन एवढा वेळ जवळच उभी.. नुसतेच बघत असलेली ‘ती’ ... लगबगीने पुढे आली.. पडलेली फुले उचलून हृदयाशी कवटाळली..

शोध

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 09/08/2013 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
शोध..... टकटक दार वाजले, काऊदादांनी उघडले बाहेर उभी चिऊताई, तिची फ़ारच घाई काऊदादा काऊदादा हे नाणे घे पिल्लाला खायला भरपूर दाणे दे रागावला काऊ म्हणे इतकी महागाई अन नाण्यात बाजार करते ही खुळाबाई चल हो चालती वेळ नको खाऊ भरपूर पैसे आण ओरडला काऊ पिलू आहे भुके, मी करू तरी काय? नाण्यात काही मिळेना, कारण तरी काय? मला काय पुसतेस, खर्च कोण देणार? वीज पाणी गाडी नोकर भाडे घरदार बाकी सारे तू वाण्याला्च विचार तेथूनच आणतो मी पैसे देऊन फ़ार चिमणी गेली वाण्याकडे, वाणीदादा करू काय? नाण्यात काही मिळेना, याचे कारण तरी काय? मला काय पुसतेस, खर्च कोण देणार? वीज पाणी गाडी नोकर भाडे घरदार बाकी सारे तू घाऊकशेठला

पुस्तके सुचवा ना !

लेखक आशु जोग यांनी गुरुवार, 08/08/2013 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
वाचलीच पाहीजेत अशी काही पुस्तके सुचवा ना ! पुस्तकांच्या नावाबरोबरच त्याची अधिक माहिती मिळाली तर उत्तम. मीही जराशी यादी देत आहे. पुण्याची अपुर्वाई - अनिल अवचट
... बाबाने पुण्याचे केलेले पर्यटन, पुस्तक वाचताना आपणही बाबाबरोबर पुणे पहात हिंडत आहोत असे वाटते. राजा शिवछत्रपती - ब. मो. पुरंदरे
... शिवाजी महाराजांचे चरीत्र आहे. शतदा प्रेम करावे - अरुण दाते

घाबरगुंडी

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 08/08/2013 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
साले सगळे घाबरतात! साले सगळे घाबरवतात! समोरून नेता आला तावातावात बोलू लागला हा आपला तो तुपला ऐकलं नाहीस तर तू धुपला तुमची भाषा धोक्यात आहे तुमचा धर्म धोक्यात आहे माझी उडाली घाबरगुंडी मी मग तडक गेलो त्यांना मत देऊन आलो उगाच कशाला? माझा धर्म, माझी भाषा संपली तर! समोरून दुसरा आला तावातावात बोलू लागला अमुक पॅटर्न तमुक फॉर्मॅट आमचंच आतून सारं ग्याटमॅट आमच्याविना आहे काय? करियर धोक्यात आलं हाय माझी उडाली घाबरगुंडी मी मग तडक गेलो त्या क्लासमध्ये दाखल झालो उगाच कशाला?
काव्यरस

शत'शब्द शोधिताना...!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 07/08/2013 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
शतशब्द कथा हा प्रकार सध्या वेगात प्रचलीत होत आहे.मी ही प्रयत्न करायला गेलो.पण छ्छे! मग माझं मन म्हणालं मला--आत्मू..तुझा प्रांत नाही रे हा.आपला वकूब ओळख मेल्या! पण तरिही ते ऐकेल तर माझं मन कसलं? सलग दोन रात्री मेंदूबरोबर हुतुतू खेळून सुद्धा,हाती काही लागलं नाही.मग मन म्हणालं,तू सावरकरनिष्ठ ना? मग त्यांचे काव्य वाच,स्फूर्ती येइल.अरे अगीचे भस्म आणी राखेचाही अंगार करणारा माणूस तो! त्याच्या शब्द स्पर्शाने तुझा मेंदू चेतणार नाही काय? आणी खरच मेंदू चेतला,पण कुठे?

सावल्या ___ शतशब्दकथा

लेखक तुमचा अभिषेक यांनी बुधवार, 07/08/2013 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
ते एक सुकलेले शेत होते एवढंच काय त्याला गाडीच्या बाहेर फेकले जाताना जाणवले.. चांदण्यांच्या प्रकाशात लुकलुकणारे चार सहा आठ डोळे आणि एक बारीकसा टॉर्चचा झोत.. त्यात दिसणार्‍या, अंगावर झेपावणार्‍या... जंगली श्वापदासारख्या उघड्या देहावर तुटून पडणार्‍या... काळ्याकुट्ट सावल्या..! त्यांचा स्पर्श, अंगाचा दर्प.. बीभत्स अन किळसवाणा.. त्याला दूर दूर फेकून द्यावेसे वाटूनही काही न करू शकणे.. एक असहाय्यता.. एक अगतिकता..... क्षणाला या सर्वांनी परीसीमा गाठली अन धापा टाकतच तो उठला.. उर नुसता धपापत होता..

बाल्य - वार्धक्य

लेखक सार्थबोध यांनी बुधवार, 07/08/2013 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
असहाय्य आधी, दशाही तीच आता बालपण ते नि, पदरी वार्धक्य आता ll १ ll न समज; स्मृती, दिस असाच सरावा बालपणी तेच अन्, प्रकार तोच आता ll २ ll नव्हते मुखी दात, दंतपंक्ती लुप्त आता बालपणी तसे, फिरुनी वार्धक्यी आता ll ३ ll पाय तेंव्हा लुकलुकते, थरथर ही आता तोल तेंव्हा नव्हता, तोल नाही आता ll ४ ll अन्नास होतो परावलंबी, पाहतो वाट आता तेंव्हा माय भरवी, लेकरे देतात आता ll ५ ll लोळणे मल-मूत्रात, त्राण नाही आता रडणे तेंव्हाचे, कण्हत असतो आता ll ६ ll कथा देवाच्या ऎकी, अनुभव हाती आता केंव्हा एकदा भेट?, व्हावी सुटका आता ! ll ७ ll - सार्थबोध

राजस्थानी मावा कचोरी

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 07/08/2013 03:49 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ वाटी मैदा १/४ वाटी ताजा खवा / मावा २ टेस्पून साजूक तूप ३-४ टेस्पून काजू+बदाम+पिस्त्याची पावडर १ वाटी साखर + २ टेस्पून खव्यात मिसळण्यासाठी (साखरेचे प्रमाण आवडीनुसार कमी - जास्त करणे) १ टीपून बदामाचे काप १ टीस्पून पिस्त्याचे काप १/४ टीस्पून केशर १/२ टीस्पून वेलचीपूड चांदीचा वर्ख सजावटीसाठी (ऐच्छिक) . पाकृ: मैद्यात तुपाचे मोहन घा

सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग ३: अंतिम)

लेखक चित्रगुप्त यांनी बुधवार, 07/08/2013 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १) सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग २) ७. अर्जुन उवाच : कृष्णाला शोधायला मी रथ हाकारून नगराकडे निघालो. जिकडे तिकडे शोकमग्न स्त्रियांचे जथे हिंडत होते. त्या सर्व स्त्रियांना एकत्र व्हायला मी सांगत गेलो. एके ठिकाणी बर्‍याचश्या बैलगाड्या दिसल्या. माझा रथ तिथे पोचताच तिथून काही स्त्रियांनी पोबारा केला. "अभीर स्त्रिया आहेत त्या" कुणीतरी म्हणाले. जवळ जाऊन बघतो, तो गाड्यांमधे मूल्यवान वस्त्राभूषणे, सोन्या-चांदीची भांडी वगैरे भरलेले होते.