Skip to main content

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-१)

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 23/08/2013 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-१) 

४ आकड्यांचा प्रवास...

लेखक नि-अ-पाटणकर यांनी शुक्रवार, 23/08/2013 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
४ आकड्यांचा प्रवास... ऱेल्वेचा प्रवास हा माझा तसा आवडता प्रवास. तशी कारण बरीच आहेत तिथे मिळणारी मोकळीक, झोपायला मिळणारा बर्थ वगैरे वगैरे. काही छोटे त्रास पण आहेत पण त्यात माझ्या कुंडलीचा दोष आहे रेल्वेचा नाही. काही गोष्टी नेहमी ठरलेल्या असतात, मी आज पर्यंत शेकडो वेळा प्रवास केला असेल पण कधीही सुरवातीपासून म्हणजे बुकिंग केलेल्या दिवसापासून मला कन्फर्म सीट मिळालेली नाही, अगदी २ - ३ महिने आधी बुकिंग केले तरीहि माझा नंबर वेटिंगमध्येच येतो. मग त्यादिवशी आधी तो चार्ट शोधा, चार्ट नाही सापडला तर तो TC शोधा, आपल्या बोगी पासून आपण १० डब्बे लांब आहे म्हणून पळापळ करा.

आपण खरेच पुरोगामी आहोत का?

लेखक विकास यांनी गुरुवार, 22/08/2013 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
​​​​​​नरेन्द्र दाभोलकरांच्या हत्येचे वृत्त हे मला त्याच्याशी वैयक्तीक ओळख नसली तरी व्यक्तीशः आणि एकंदरीतच सामाजीक स्तरावर अस्वस्थता आणणारे ठरले. जर समाजास (त्यात मी केवळ सामान्य माणूस धरत आहे, राजकारणी नाही) त्यातून खरेच अस्वस्थता आली असेल, तर तो महाराष्ट्रासाठी आशेचा किरण आहे. २०१० च्या जर्मन बेकरीवरील दहशतवादी घातपातापेक्षाही पुण्यासारख्या शहरात घडलेली ही एकच हत्या जास्त गंभीर आहे असे कुठेतरी वाटते. हल्ल्यास भ्याड म्हणावे का थंड डोक्याने आखलेला कट हे काळच सांगेल.

दुनियादारी ___ शतशब्दकथा

लेखक तुमचा अभिषेक यांनी गुरुवार, 22/08/2013 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
दारूचा चौथा ग्लास जळजळतच घशाखाली उतरला. सहा महिने तो त्या दोघांना फिरताना बघत होता.. मोबाईल बदलावेत तसे त्याच्या मैत्रीणी बदलायच्या.. यावेळी पठ्ठ्या लग्न करायला निघालेला.. तिच्याही आयुष्यातील तो पहिलाच मुलगा नव्हता.. वाडीतच दोन प्रकरणे होती तिची.. त्याला ‘सावध’ करणे गरजेचे होते.. शेवटी मित्र होता त्याचा... जिवलग असा.. बालपण, शाळा, कॉलेज, कट्टा.... कट्ट्यावरची कटींग चाय.. अन दोघांत ओढलेली एकच सिगारेट..!! क्षणात डोळ्यासमोर तरळले अन त्याच तिरमिरीत तो उठला.. पाचवा पेग अर्धाच सोडून..

तिचा एक दिवस

लेखक आतिवास यांनी गुरुवार, 22/08/2013 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
शारदा एकदम दचकून जागी झाली. आपण कुठे आहोत आणि हा कसला आवाज आहे असा तिचा गोंधळ क्षणभरच टिकला. पहाटे पाणी आल्याआल्या लगेच भरलं तरच मिळतं, नाहीतर त्याचा काही भरोसा नसतो, म्हणून रात्री झोपताना नळ चालू ठेवून झोपायची तिने स्वतःला सवय लावून घेतली आहे. तरीही तिचे हे रोजचे दचकून जागे होणे मात्र काही संपत नाही. खरे तर आज शारदा खूप दमली आहे. शेजारी प्रकाश - तिचा नवरा - घोरत पडला आहे. रात्रीच्या जोर जबरदस्तीनंतर त्याचे हे निवांत झोपणे आणि तिची दमणूक हेही आता नेहमीचे झाले आहे. पाणी भरण्यासाठी त्याला उठवण्याचा मनात आलेला विचार तिने लगेच झटकून टाकला.

लाजिरवाणि बाब : रुपयाला घर घर

लेखक पेस्तन काका यांनी गुरुवार, 22/08/2013 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच असून आज बाजार उघडताच रुपया ६५ च्याही खाली आला. ही रुपयाची आजवरची सर्वात मोठी घसरण असून लाजिरवाणी बाब म्हणजे भारताचे चलन आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे कमकुवत चलन ठरले आहे.बुधवारी बाजार बंद झाला तेव्हा डॉलरपुढे रुपया ६४ रुपये ११ पैशांवर स्थिरावला होता.दरम्यान, अर्थमंत्रालय तसेच भारतीय रिजर्व बँकेकडूनही रुपयाची घसरण थांबवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत असे समजते पण दिसत काहि नहिये.

.....आणि बाकी शून्यात ...........!!

लेखक psajid यांनी गुरुवार, 22/08/2013 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे एकेक विचार जपलेत मनांत, तूच दिलेले श्वास आज पिंजऱ्यात......!! आज पिंजऱ्यात जन्मा जन्माची साथ, तन बंबाळ जखमांनी अन वाट पायात......!! वाट पायांत अन आग दही दिशात, होरफळत चाललो मी तुझ्या एका वचनात......!! तुझ्या त्या वचनात प्रेम बलिदानात, हृदय घायाळ पण हसं डोळ्यात.......!! हसं डोळ्यात वाराही शांत, थकून गेलो मी शेवटच्या सहवासात........!! तुझ्या शेवटच्या सहवासात अनोळखी क्षणात, पानगळीच जगणं आणि बाकी शून्यात ...........!! .....आणि बाकी शून्यात ...........!!

असणे नसणे

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 22/08/2013 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
जगण्यात उगिच सजते असणे अक्षरांत झिंगवते नसणे असणे नसणे ओसांडे मन हसण्यात सदा किण किण श्रावण आभास सदा पथदूर कुठे शोधासा कठिण पडते कोडे मेघावळ पिंजुन एकांती धड धड करते काळिज वेडे आकाश; खोल पोकळ वासा आवेग; न ठावे थांग जसा पवनासाहि ना कळलेले हे वाहतो सवे निशिगंध कसा ………………… अज्ञात
काव्यरस

शोध माझ्यातला

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 22/08/2013 05:47 या दिवशी प्रकाशित केले.
शोध माझ्यातला मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले समजण्या मला काय गवसले अन काय हरवले माझ्यातले मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले शुद्ध हवा घेतली का कधी? निर्मळ पाणी चाखले का कधी? खळाळता निर्झर कधी का पाहीला? घाम त्वचेतून कधी का वाहीला? लहान मुलांवर वा कोणत्या प्राण्यावर? निर्व्याज प्रेम कधी केले का कुणावर? मदत का कधी कुठे केली? न ठेवता आशा परतीची? घनदाट जंगलातून चाललो कधी अनवाणी? धावता पडता रडता आले का डोळ्यातून पाणी? पाहून दु:ख गरीबाचे दाटला का कंठ कधी?
काव्यरस

बादशाही...!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 22/08/2013 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज सांजच्याला अड्ड्यावरनं घरला निघालो,आणी गाडी सवईनी पानाच्या आमच्या आवाडत्या ठेल्यावर गेली. "बोलो साब...कितना...?" मी-"तीन बनाओ,तीनो पार्सल करो. असं म्हणालो आणी जरा कानावरचा हेडफोन दूर करुन आजूबाजुला न्याहाळायला लागलो. आमच्या सदाशिवपेठेतली ही गल्ली पूर्वी सदाशिवपेठेचा केवळ एक भाग होती आणी भरत नाट्य मंदिराचा चौक ते टिळक स्मारक मंदिराचा चौक यांना जोडणारी गल्ली.."इतकिच" नाट्यमय तिची ओळख होती.पण गेल्या १५ वर्षात या गल्लीला एक नविन ओळख मिळाली... मटण-गल्ली! हो....!