Skip to main content

पुरोगामीत्वाचा शोध

लेखक arunjoshi123 यांनी रविवार, 25/08/2013 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
काळ: उत्क्रांतीचा सिद्धांत मानला तर पुरोगामीत्व माणसाचा नैसर्गिक गुणधर्म असायला हवा. जसा जसा काळ पुढे लोटेल तसे तसे उत्क्रांतीच्या वरदानांनी मानवाचे जीवन एका आदर्श स्थितीकडे आपोआप लोटले जाईल. परंतु उत्क्रांतीच्या परिणामांनी होणारा एखादा छोटासाही बदल दॄश्य स्वरुपात प्रगट होण्यासाठी लागणारा काळ हा मोजक्या पिढ्यांच्या माळेच्या जीवनकाळाच्या तुलनेत हजारो पट असतो. त्याकरिता काय पुरोगामी आहे आणि काय प्रतिगामी आहे हे ठरवताना उत्क्रांतीजन्य बाबींना बाजूला ठेवले पाहिजे अन्यथा ते निसर्गावर केलेले भाष्य असेल. उदाहरणार्थ, आपले पूर्वज रानटी होते हे टीकात्मक सुराने नाही म्हटले पाहिजे.

मनकवडी

लेखक अज्ञातकुल यांनी रविवार, 25/08/2013 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
कसा आहेस ?…… प्रश्न एसेमेस मसस्स्स….स्त !!………. उत्तर एसेमेस … लिहिलेला "मस्त" हा मुका शब्द गाभ्यातला कातर स्वर लपवू शकला नाही उत्तरकर्त्याचं आत्मभान, स्वाभिमान, उसनं अवसान ओसांडून वहात होतं त्याच्या अंतर्मनाच्या सांत्वनासाठी… मन, स्वत:शी आणि त्याच्याशी एकरूप झालेल्या द्वैताशी प्रतारणा करू शकत नाही व्यक्त अणि अव्यक्त यांतून परिस्थितीनुरूप एकाच भावनेचे भ्रामक अथवा अर्धसत्य अविष्कार घडत असतात त्यातल्या सत्य वाहनाला "टेलीपथी" म्हणतात असे सूक्ष्म संदेश नेमके वाचू शकणारी माणसं "मनकवडी" असतात ……………………. अज्ञात
काव्यरस

मद्रास कॅफे: भारताच्या विएतनामची अस्वस्थ करणारी कहाणी

लेखक पिंपातला उंदीर यांनी रविवार, 25/08/2013 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक सर्व शक्तिमान देशांच्या अहंकाराची थडग चिमुकल्या आणि लौकिकर्थाने कमजोर देशांमध्ये सापडतात. औरंगझेब आणि त्याच्या उद्दाम सरदारांची ज्याप्रमाणे महाराष्ट्रात सापडतात तशी.. सर्व शक्तिमान अमेरिकेला तर या नियमाने अनेक वेळा तडाखा दिला आहे. मग ते विएतनाम युद्ध असो किंवा इराक युद्ध असो. रशिया सारख्या प्रचंड लष्करी बळ असणार्‍या देशाचे पण अफगाणिस्तान मध्ये वस्त्र हरण झाले आणि त्याना तिथून माघार घ्यावी लागली. कीबहुना या अफगाण युद्धाने रशियन कमजोर अर्थव्यवस्थेवर इतका ताण पडला की तत्कालीन सोविएत यूनियन चे विघटन होण्याला जी अनेक कारण कारणीभूत ठरली त्यात या अफगाण युद्धाचा क्रम बराच वरचा आहे.

तु फक्त एकदा हो म्हण...

लेखक K Sangeeta यांनी रविवार, 25/08/2013 00:48 या दिवशी प्रकाशित केले.
तु फक्त एकदा हो म्हण... तु फक्त एकदा हो म्हण तुझी व्हायला तयार आहे.. तु फक्त एकदा हो म्हण सगळं जग विसरायला तयार आहे.. तु फक्त एकदा हो म्हण, सगळं समर्पित करायला तयार आहे.. तु फक्त एकदा हो म्हण तुझ्यात आकंठ बुडायला तयार आहे.. तु फक्त एकदा हो म्हण पूर्णपणे तुझ्यात सामावयाला तयार आहे.. तु फक्त एकदा हो म्हण.. आपल्या मैत्रीला सुंदर प्रेमाचं रुप द्यायला तयार आहे.. तु फक्त एकदा हो म्हण.... तु फक्त एकदा हो म्हण.....

पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (३)

लेखक शिवोऽहम् यांनी रविवार, 25/08/2013 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (२) +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ नशेचा परिणाम म्हणावा की व्यक्तिमत्वात असलेला विद्रोह आणि चळवळेपणा?

माझा पहिला ट्रेक : चकदेव

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी शनिवार, 24/08/2013 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
रत्नागिरी जिल्यातील खेड हे माझे गाव. लहानपण याच गावात गेले. खेड च्या आसपास काही ट्रेकिंग locations आहेत. रसाळगड,सुमारगड,महीपतगड,चकदेव,पर्बत,नागेश्वर,चिपळूण जवळचा भैरवगड. राजांचा रायगड.कोयना back water. इत्यादी. कारखान्यातील काही सहकार्यांबरोबर एकदा कोयनेच्या back water च्या परिसरात भटकंती आणि वस्ती केली होती. साधारण १९८८ मध्ये. तेव्हा असा काही छंद असतो हे प्रथम माहित झाले. त्या नंतर गो.नि दां च्या पुस्तकांमधून या विषयाची माहिती झाली. १९९० च्या दरम्यान गावतील काही मित्रांकडे स्वयंचलीत दुचाक्या आल्या होत्या.

सु शी ची दुनियादारी

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी शनिवार, 24/08/2013 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
दुनियादारी सुहास शिरवळकर यांच्या "साहित्यकृती" वर आधारित मराठी चित्रपट हि हेड लाईन वाचली आणि मनात १ शेर रुंजी घालू लागला. हजारो साल "नर्गिस अपनी बेनुरी पे रोती है बडी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा || इथे "दुनियादारी " हि साहित्यकृती हि नर्गिस आणि झी सिनेमा आणि संजय जाधव हे दीदावर मराठी साहित्यिकांनी "सु शी" ना कधीच साहित्यिक मानले नाही सुशींचे हे दुख: कधी कधी त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत असे. काल जेव्हा "दुनियादारी " पाहत होतो तेव्हा सारखी त्यांची आठवण होत होती.(पहिला दिवस ,दुसरा खेळ) जेव्हा चित्रपट गृहाच्या बाहेर पडलो तेव्हा कान देऊन प्रतिक्रिया ऐकत होतो एक मिसरूड नुकतेच फु

पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (२)

लेखक शिवोऽहम् यांनी शनिवार, 24/08/2013 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (१) ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ सरतेशेवटी मुंबईतल्या संधी खुणावू लागल्या. पण 'भारत एक खोज' मधल्या इवल्या इवल्या भुमिकांशिवाय काही हाती लागले नाही. ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ त्याला वाटायचं अभिनय म्हणजे भुमिकेच्या अंतरंगात शिरणं. पण ते व्हायचं कसं?

पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : १० : अमेरिकेवर वर्चस्व आणि भारतीय प्रस्तरकला (१९,००० ते १०,००० वर्षांपूर्वीपर्यंत)

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 24/08/2013 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
===================================================================== पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

शतशब्द कथा _________मस्ती

लेखक अभ्या.. यांनी शनिवार, 24/08/2013 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
फ्लाईट टेकऑफ़ होताच... हवाईसुंदरी: काय हवेय? पोपट: काही नाही, बटन चेक करत होतो. हवाईसुंदरी: ओके, तुम्हाला काही हवे असल्यास मला बोलवा. पोपट: परत एकदा बोलवू काय? शेजारचा गाढव: का त्रास देतोस तिला? पोपट:अरे मस्ती हाय रे माझ्यात. हवाईसुंदरी: आता काय हवेय? पोपट: माझ्याशी मय्यतरी करणार काय? हवाईसुंदरी: परत अशी नाटके केलीस तर खाली फेकून देईन. पोपट: गाढवा ही नुसत्या पोकळ धमक्या देते.तू बोलव परत तिला. काय करती बघू. गाढवच ते.....................बोलावते. . हवाईसुंदरी: उठा दरवाज्याकडे चला. . . हवाईसुंदरीच्या मस्त लाथेसोबत पोपट आणि गाढव विमानाबाहेर........ . आता.........