आवाहन, दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाविषयी.
सर्व मिपाकरांना नमस्कार
दिवाळी अंकाची सूचना तर मिळाली आहेच. एव्हाना लेखनाची तयारी पण सुरु असेल.
आता हे आवाहन आहे दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाविषयी.
मिपासदस्यांना यातही सहभागी करुन घ्यायचा विचार आहे.
दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ म्हणले की आपल्याला मुद्रीत दिवाळी अंकाची देखणी मुखपृष्ठं आठवतील. किस्रीम, जत्रा, आवाज सारखे दिवाळी अंक कव्हरमुळे लक्षात राहायचे. आपल्या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ पण असेच संस्मरणीय अन संग्राह्य व्हावे हि इच्छा आहे. तेंव्हा मिपाच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाविषयी काही कल्पना असतील तर त्या सुचवाव्यात. ज्या सदस्यांना ग्राफीक्सचे ज्ञान आहे त्यानी पूर्ण तयार मुखपृष्ठ दिले तरी चालेल.
मिसळपाव