Skip to main content

उत्तर-पूर्व भारत: निसर्गप्रेमींसाठी पर्वणी

लेखक तिमा यांनी बुधवार, 20/11/2013 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
चारधामच्या अनुभवाने पोळल्यानंतर आता हिमालयात कुठे फिरायला जावे याचा विचार करत होतो. कारण एकदा का तुम्ही हिमालयात जाउन आलात की तो तुम्हाला बोलावतच रहातो. आणि तुम्हीही कुठल्यातरी अनामिक ओढीने त्याला प्रतिसाद देऊ लागता. नॉर्थ-ईस्ट कधीचे डोक्यांत होते. अचानक संधी चालून आली आणि एका टूर तर्फे आम्ही तिथले बुकिंग करुन टाकले. मुम्बई-गुवाहाती-काझीरंगा-बोमदिला-तवांग्-दिरांग् (सर्व अरुणाचल)- गुवाहाती-शिलाँग्-चेरापुंजी-शिलाँग्-गुवाहाती-मुंबई असा ११ दिवसांचा कार्यक्रम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होता. गुवाहातीला पोचल्यावर आमच्या दिमतीला इनोव्हा होत्या. प्रथम आम्ही काझीरंगा अभयारण्याला गेलो.

केईनोरहासेन

लेखक निनाद यांनी बुधवार, 20/11/2013 06:27 या दिवशी प्रकाशित केले.
केईनोरहासेन लुडो नावाचा एक पेज थ्री पत्रकार आहे. हा दास ब्लाट नावाच्या वृत्तपत्रासाठी त्याच्या फोटोग्राफर सोबत काम करतो. याचे प्रमुख काम म्हणजे प्रसिद्ध व्यक्तींवर हेरगिरी करायची आणि त्यांचे बिंग किंवा कुलंगडी बाहेर काढायची. कुठे मंत्र्याच्या मैत्रिण प्रेग्नंटच असल्याचे फोटो छाप वगैरे उद्योग चालत असतात. त्यासाठी तो आपल्या उर्मट आणि उन्मत्त स्वभावाचा आणि तेज बुद्धीचा चांगला उपयोग करून घेत असतो. पण यासोबतच तो व्यवसायाचा वापर मनमुराद सेक्स मिळवण्यासाठीही करतो. झकास सिक्स पॅक शरीर लाभलेले असल्याने बायकाही त्याच्याकडे आकर्षित होत असतात.

कारवार- दांडेली भाग-२

लेखक पुतळाचैतन्याचा यांनी मंगळवार, 19/11/2013 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या भागाच्या प्रतिसादानुसार जास्त वर्णन करायचा प्रयत्न केला आहे. कारवार च्या समुद्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी चालते.

आनंद - कार्लसन डाव ८

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 19/11/2013 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटल्या पाच डावात आनंद काय चमत्कार करणार? पहिली मूव मॅग्नुसची मूव काय असेल? कॅन आनंद क्रॅक कोड मॅग्नुस? चला बघूयात गेम ८.

डोंबिवली दिवाळी कट्टा वृत्तांत

लेखक नानबा यांनी मंगळवार, 19/11/2013 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
आज होणार, उद्या होणार, होणार की नाही अशा अनेक विषयांमुळे बराच चर्चिलेला डोंबिवली दिवाळी कट्टा अखेर झालाच. वृत्तांत वाचून कट्ट्याचा आनंद घेऊ इच्छीणा-या आणि काही कारणास्तव येण्याचे मनात असूनसुद्धा येऊ न शकलेल्या तमाम मिपाकरांसाठी हा वृत्तांत.. अखेरच्या क्षणापर्यंत कट्टेकरी मंडळींची पक्की संख्या तळ्यात मळ्यात होती. माननीय चोळेगावकर श्री. स्पा यांनी आधीच नकार कळवला होता, तर रविवार रात्रीची वेळ असल्यामुळे डोंबिवली बाहेरील अनेकांनी येणं टाळलं. साधारण ५ जणांचा होकार आल्यामुळे दुपारीच नंदी पॅलेसमध्ये फ़ोन करून टेबल रिझर्व्ह करून ठेवलं होतं.

कारवार - दाण्डेली सहल भाग-१

लेखक पुतळाचैतन्याचा यांनी सोमवार, 18/11/2013 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
तसा मिपावर लेख लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न…!!! फार वर्षा पासून आरामशीर नोकरी हवी होती जिथे माझी विकांताला फिरण्याची हाउस पूर्ण करता येईल आणि ती मिळाल्यावर आता गाडी जोरात सोडली. बंगलोर हून निघून सकाळी हुबळी गाठली आणि सहलीला खर्या अर्थाने सुरवात झाली. हुबळी-गोकर्ण- मुरुडेश्वर-एडगुंजी - कारवार-दांडेली अशी २ दिवसात आटोपशीर वाटणारी सहल अपेक्षे पेक्षा फार सुंदर झाली. हुबळी ते गोकर्ण हा रस्ता यल्लापुर नामक एका गावातून जातो. त्या गावात प्रसिद्ध असणारे डोसे (दोसे) हाणायचा कार्यक्रम झाल्यावर गाडी सुसाट सोडली. हुबळी ते गोकर्ण या मुख्य रस्त्यात सहज नजरेस न पडणारा एक झुलता पूल लागला.

मॉरिशस सफरनामा (२)

लेखक सोत्रि यांनी सोमवार, 18/11/2013 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
>> मॉरिशस सफरीची सुरुवात तर एकदम ‘फर्स्ट क्लास’ झाली होती... बिझनेस क्लासमधल्या आरामदायी सीट्सवर विराजमान झाल्यावर सहज बायकोला म्हणालो की एअर मॉरिशसचा एक मेल आला होता ऑफिशियल अपग्रेडसाठी. त्यासाठी 19,650 रुपयांपासून पुढे बोली लावायची होती आपल्या किमतीची.

चित्रपटांचे शेवट/ट्विस्ट कितपत पटतात?

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 18/11/2013 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
धाग्यास कारण कि अगदि अलीकडेच "एक दुजे के लिये" (परत) बघत बसलो होतो. त्यात शेवटि सपना-वासु मरुन पिक्चर संपतो. पुर्वी असंहि एकलेलं कि हा चित्रपट बघितल्यावर म्हणे बर्‍याच पेमी युगुलांनी आत्महत्या केली होती. तसचं "हम आपके है कौन" चं सगळं सुरळित/चांगलं चालू असताना रेणुका शहाणेला जिन्यावरुन पाडुन मारायची काय गरज होती का? गोडिगोडित चित्रपट संपवता आला असता कि! बिचार्‍या त्या टफिला ती गेल्यावर कित्ति कित्ति वाईट्ट वाटलं. ह्रुतिकला अगदि त्याच्या पहिल्याच चित्रपटात मारुन मग परत जिवंत केलं. तर तुमचं मत काय? हे असे शेवट्/ट्विस्ट कितपत योग्य?