Skip to main content

गुन्हा ?

लेखक मंदार कात्रे यांनी गुरुवार, 19/12/2013 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.firstpost.com/india/no-muslims-ad-in-99-acres-starts-fresh-d… वरील बातमी च्या संदर्भाने विचार करताना असा प्रश्न उद्भवला , की सगळीकडे मोहल्ले ,आहेत त्या मोहल्ल्या मध्ये इतर धर्मियांना रहाणे सोडाच ,पण एखाद्या कामासाठी आत जाणेही मुश्किल वाटते .

पोलिसांचा ढिसाळपणा

लेखक मंदार कात्रे यांनी गुरुवार, 19/12/2013 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये एका मुलीच्या विनयभंगाचा प्रयत्न झाला . गेल्या वर्षी दिल्लीत एवढे कांड होवूनही पोलिसांनी या प्रकरणात जो ढिसाळपणा दाखवला ,तो पाहता कोणाही जागरूक नागरिकाला संताप आणणारा आहे ! सन्दर्भ- http://prahaar.in/maharashtra/konkan/164988 मत्स्यगंधा एक्स्प्रेसने प्रवास करणा-या एका तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न या तरुणीने दाखवलेल्या निर्भयपणामुळे हाणून पडला. ठाणे- मत्स्यगंधा एक्स्प्रेसने प्रवास करणा-या एका तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न या तरुणीने दाखवलेल्या निर्भयपणामुळे हाणून पडला.

कथा :- मी जिंकलो, मी हरलो (२)

लेखक प्रमोद देर्देकर यांनी गुरुवार, 19/12/2013 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
कथा :- मी जिंकलो, मी हरलो (१)
अनामिका
ताईने मला अचानक का बोलावून घेतले ते समजले नाही. नाही म्हणायला भावोजींनी तिच्या आजाराची कल्पना आम्हाला दिलीच होती. मी आई बाबांबरोबर वेळ मिळेल तशी वरचे वर येत होते. पण काल मला तिने फोनवरून तातडीने बोलावून घेतले. जरा काळजीत वाटली . मी आले तेव्हा भावोजी तनयाला आणायाला शाळेत गेले होते. शेजारच्या घोलेकाकूंनी दरवाजा उघडला. " ये गं वेळेवर आलीस " " काकू, कशा आहात तुम्ही? आणि ताई कशी आहे?" " माझं बरं आहे. आताच आमचा चहा झाला, आता तू आलीयेस तर मी निघते.

श्री -भाग 2

लेखक मीता यांनी गुरुवार, 19/12/2013 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
आई रागावली कि रूम मध्ये जाऊन दार लावून बेड वर अंग टाकून द्यायचं आणि आपल्याचं डोक्यावर थापटत बसायचं ..मीता च नेहेमीचच होत हे .. अशीच एकदा रूम मध्ये असताना फोन वाजला . श्री चा तिला आलेला पहिला फोन . श्री - नमस्कार .मी श्री बोलतोय .मीता आहे का ? मीता - हो बोलतेय . श्री - मी तुम्ही काढलेलं चित्रं पाहिलं ओर्कुट वर आणि मला ते आवडलं .तुमचा फोन नंबर मिळाला समीर कडून . ते चित्र विकत घ्यायची माझी इच्छा आहे . मीता- तुम्हाला चित्र आवडलं त्याबद्दल Thanks .पण मला चित्र विकायचं नाहीये . असं म्हणून मीतानी फोन ठेवून दिला . "काय कटकट आहे ..सुखानी रडू पण देत नाही " मीता स्वतः: शी बोलली.

स्मरणीय " संध्या" - एका कट्ट्याची कहाणी

लेखक चौकटराजा यांनी गुरुवार, 19/12/2013 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर आपण सारे मुख्यत" दोन गोष्टीसाठी येतो .व्यक्त होण्यासाठी व व्यक्त झालेल्याना प्रतिसाद देण्यासाठी. प्रिट मिडीयाचे मालक, संपादक निरनिराळ्या ईझम्सचे रंग फासून वावरत असतात. सुदैवाने मिपा सारखे माध्यम असा कोणताही एकच रंग घेऊन वावरत नाही. मिपा हे व्यक्तीगत आयुष्यातली कसे भिनत जाते याचे प्रत्यंतर आम्हा काहीना येणार होते. १७ डिसेंबर २०१३ ची संध्याकाळ काही पुणेकरांसाठी एक अचानक जमलेला कट्टा या स्वरूपात अवतरली. अत्यंत अल्प काळात आपल्या दर्जेदार लेखनाने मिपाप्रिय ठरलेले श्री इस्पिक एक्का हे पुण्यात आले आहेत असे ब्याटम्यान याना कळले.

निष्पक्षपाती, धर्मनिरपेक्ष, पुरोगामी वगैरे

लेखक आनन्दा यांनी गुरुवार, 19/12/2013 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
आज बाजारात असलेली बहुतांश वृत्तपत्रे स्वतःला धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी म्हणवून घेतात. अर्थात त्यांना कोणत्या पक्षाचा कैवार आहे हे काही लपून राहत नाही. परंतु सामना प्रमाणे आपण मुखपत्र आहोत असे जाहीरपणे मान्य करण्याची कोणाची इच्छा असत नाही. सध्या भारतात चालू असणार्‍या नाट्यपूर्ण (?) घडामोडींमुळे या सर्व वृत्तपत्रांची विचित्र कोंडी झालेली दिसून येते. आपल्या पक्षाचा कैवार घ्यावा तर मग आपण बहुतांश असणार्‍या वाचकवर्गापासून दूर जातो, म्हणजे ते लोक आपले वृत्तपत्र वाचणे बंग करणार, म्हण्जे प्रत्यक्ष फटका आपल्या विचारसरणीच्या पक्षाला बसणार.

संशयास्पदरीत्या चहा प्यायल्याबद्दल अटक...............

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 19/12/2013 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हापुर पोलीसानी एका ४९ वयीन इसमास संशयास्पद रीत्या चहा पिण्याअबद्दल अटक केली. त्याबद्दल न्यायालयाने त्याना फटकारले आनि संशयास्पदरीत्या चहा कसा पितात ते दाखवुन द्या असेही सांगितले. मटा मधील बातमीचा भाग कॉपी करतोय
" संशयास्पदरित्या चहाचे घुटके घेतल्याचे कारण देत ४९ वर्षीय इसमाला अटक केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर पोलिसांना चांगलेच फटकारले आहे. 'चहा कसा प्यावा याबद्दल कोणताही कायदा काहीही सांगत नाही. प्रत्येकाची चहा पिण्याची वेगळी स्टाईल असू शकते.

येसर आमटी

लेखक मितान यांनी बुधवार, 18/12/2013 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच दिवसांपासून ही पाककृती लिहायची राहून गेली होती. मागे महालक्ष्म्यांच्या लेखात उल्लेख केलेल्या येसर आमटीची ही पाकृ. मराठवाड्यातली पारंपारिक आमटी. बर्‍याच लग्न कार्यात पाहुण्यांना जाताना शिदोरी म्हणून मसाला नि मेतकूट देतात. मराठवाड्यात येसर नि मेतकूट देतात. खूप भाज्यांची रेलचेल मराठवाड्यातल्या जेवणात अजूनही नसते. ग्रामीण भागात तर असेल ती पालेभाजी, घट्ट वरण आणि भाकरी हे जेवणच कॉमन आहे. अशा भागात चवबदल, चमचमीत झणझणीत काही खायचं असेल तर येसर करतात. लग्नकार्यात घरी पाहुण्यांची खूप गर्दी असे. आठ आठ दिवस आधी नि नंतर वर्‍हाडी मंडळी कामाला जुंपलेली असत.

लेखकु

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी बुधवार, 18/12/2013 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
कविता माझी वाच, कथा माझी वाच लेख नक्की वाच, लेखकु म्हणे आपुली जी रिक्षा, दुसर्‍याची ती भिक्षा जनतेस का शिक्षा, या संकेतस्थळी ध्यान असता सुंदर, लेखनास मान निरंतर टीका वाटे जंतरमंतर, लेखकासि आव पिडीताचा, सात्विक संतापाचा वळवी ओघ सहानुभूतीचा, लेखकु तो वाढुनी ठेवता ताट, स्तुती करतो भाट इतरांची लावू वाट, दिसता क्षणी ओलावले डोळे, भारावले मन शब्द की ग्लिसरीन, वाचकु म्हणे दर तेरावा प्रतिसाद, देई धन्यवाद वर आणण्याचा नाद, लेखनाला इकडेतिकडे देतो कान, पाहुनी इतरांचा सन्मान काढी फेसबुकी पान, स्वत:चे नित्य गुळ लावित, झाला अखेर प्रस्थापित सदैव तरी दिवाभीत, लेखकु हा || --------------------------

'योगायोग'

लेखक drsunilahirrao यांनी बुधवार, 18/12/2013 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
' योगायोग ' योगायोग By डॉ.सुनील अहिरराव मी' त्याला पहिल्यांदा भेटलो ते डॉ. प्रशांत च्या क्लिनिकमध्ये. बाहेर दोन चार पेशंटस् आणि तो केबिनमध्ये खुर्चीत बसलेला. एक गुडघा टेबलाच्या कोपऱ्याला टेकवून . हातात वर्तमानपत्र. खूप एकाग्रतेने काही वाचत असावा. चेहऱ्यावर एक गूढ गंभीर भाव. नजर वर्तमानपत्राच्या पानांवर , पण कदाचित त्या पलीकडे जाणारी.. त्याला डिस्टर्ब करावसं वाटेना. पण आत गेलो तरी त्याला माझ्या अस्तित्वाची जणू जाणीवच नव्हती. "नमस्ते डॉक्टर " त्याने माझ्याकडे अनोळखी नजरेने पाहिले. कदाचित पूर्वीच्या कसल्यातरी गूढात तो अजून बुडालेला. कदाचित त्याला टोकलेले आवडले नसावे.