आज बाजारात असलेली बहुतांश वृत्तपत्रे स्वतःला धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी म्हणवून घेतात. अर्थात त्यांना कोणत्या पक्षाचा कैवार आहे हे काही लपून राहत नाही. परंतु सामना प्रमाणे आपण मुखपत्र आहोत असे जाहीरपणे मान्य करण्याची कोणाची इच्छा असत नाही.
सध्या भारतात चालू असणार्या नाट्यपूर्ण (?) घडामोडींमुळे या सर्व वृत्तपत्रांची विचित्र कोंडी झालेली दिसून येते. आपल्या पक्षाचा कैवार घ्यावा तर मग आपण बहुतांश असणार्या वाचकवर्गापासून दूर जातो, म्हणजे ते लोक आपले वृत्तपत्र वाचणे बंग करणार, म्हण्जे प्रत्यक्ष फटका आपल्या विचारसरणीच्या पक्षाला बसणार. लोकमताचा कैवार घेणारे लेख लिहावे तर मग आणखीनच कठीण.
अर्थात या सर्वांतून त्यांचे प्रखर बुद्धिमान संपादक मार्ग काढत असतातच. सकाळ, मटामधील लेख त्या दॄष्टीने अत्यंत वाचनीय असतात. मला स्वतःला हे लोक एव्हढे "समतोल" लेख कसे लिहु शकतात असा नेहमीच प्रश्न पडतो.
उदाहरणार्थ - दिल्ली च्या निवडणूकीनंतर या सर्वांना सर्वात मोठा धोका आहे तो आप पासून. त्यामुळे सध्या मोदींवरून लक्ष आप वर वळवण्यात हे लोक मग्न आहेत. याचे २ फायदे आहेत.
१. मोदींना मिळणारी प्रसिद्धी आपोआप कमी होते.
२. आप हे तुलनेने सोपे टारगेट आहे. त्यांची पाटी कोरी असल्यामुळे त्यांचे समर्थन करण्यासाठी आकडे मदतीला येत नाहीत.
आज मटा मधे आप बद्दल आलेले लेख वाचले
१. आप चा एन जी ओ पासून चा प्रवास, (ज्यामध्ये कोंग्रेस वर एकही वार नाही.) आप पुढील आव्हाने (आप पाच वर्षांनंतर शिल्लकही राहणार नाही याचे भाकीत)
२. राहुल गांधींचा "आम आदमी" चेहरा
३. अग्रलेख - भाजप - कोंग्रेस आणि अण्णांचे कौतुक (आप चे खच्चीकरण)
व्यक्तिशः मी आप चा समर्थक नाही, पण आजचे लेख पाहून पुढचे ६ महिने वारे कोणत्या दिशेने वाहणार आहेत याचा छान अंदाज आला.
आता काही प्रश्न -
१. हे लेखक आपल्या विचारांशी प्रामाणिक असतात की पगाराशी?
२. एव्हधे शब्दांचे खेळ करून त्यांना नेमके काय साध्य करायचे असते, आणि ते किती प्रमाणात साध्य होत असेल?
३. मिपा वर आताच वाचलेल्या एका लेखाप्रमाणे तेही झापडबंद विचार करत असतात?
ही यादी वाढत जाणारी आहे. हे सर्व कसे चालत असेल, याबबतीत कोणाचे काही प्रश्न/ अनुभव/ ठोकताळे आणि उदाहरणे यांचे स्वागत आहे
वाचने
3303
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
१. हे लेखक आपल्या विचारांशी
चांगला लेख
शेवटचे वाचनीय अग्रलेख किंवा
In reply to चांगला लेख by पैसा
वादासाठी वाद?
In reply to शेवटचे वाचनीय अग्रलेख किंवा by बॅटमॅन
एक तरी चांगला मराठी संपादक
In reply to वादासाठी वाद? by पैसा
बिरुटे र्हायलं का? का
In reply to एक तरी चांगला मराठी संपादक by सुहास..
मी वादासाठी वाद घालतोय हा
In reply to वादासाठी वाद? by पैसा
सांभाळा!
In reply to मी वादासाठी वाद घालतोय हा by बॅटमॅन
व्हॉटेव्हर...फक्त "पूर्वीचं
In reply to सांभाळा! by पैसा
+१११
In reply to मी वादासाठी वाद घालतोय हा by बॅटमॅन
तळवळकर
In reply to चांगला लेख by पैसा
पेड न्युज
शंकराचार्य केस
आणि हेच परत खटला दाखल केला की
In reply to शंकराचार्य केस by विकास
+१
In reply to आणि हेच परत खटला दाखल केला की by मारकुटे