Skip to main content

महाभारत कथा: युद्धापूर्वी मंत्रीमंडळाची शेवटची बैठक

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 30/03/2014 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
(उपस्थित सदस्य: सम्राट दुर्योधन, भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर, दु:शासन, शकुनी, कर्ण आणि सभेत कधी कधी येणारा विकर्ण या शिवाय मुख्य शस्त्राधिकारी व गुप्तचर अधिकारी ) विकर्ण: महाराज, युद्धाचा निर्णय झाला आहे, पण आपण युद्धासाठी खरोखरच तैयार आहोत का?

के-२ : द सॅव्हेज माऊंटन - ३

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 30/03/2014 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
जॉन स्मॉलीच आणि अ‍ॅलन पेनींग्टनच्या मृत्यूने हादरलेल्या अमेरिकन तुकडीने मोहीम आवरती घेतली आणि बेस कँप सोडला. त्यांच्यापाठोपाठ मिचेल पार्मेंटिअरने स्कार्डूची वाट पकडली. बेस कँपवर असलेल्या पाकीस्तानी अधिका-यांनी मारी अब्रेगो आणि जोसेमा कासिमीरो यांना विनापरवाना अ‍ॅब्रझी स्परने चढाई केल्याबद्दल ताब्यात घेतलं होतं ! अर्थात यामागील हेतू बेस कँपवरुन इस्लामाबादला सटकण्याचा आणि गिर्यारोहकांकडून पैसे उकळण्याचा होता हे उघड होतं. अ‍ॅलन रोझच्या ब्रिटीश मोहीमेतील गिर्यारोहकांची प्रगती फारच धीम्या गतीने सुरू होती.

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १२ : न संपणारी स्थापत्यमालिका

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 29/03/2014 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६...

गुळांबा

लेखक अनन्न्या यांनी शनिवार, 29/03/2014 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः कैरीचा कीस दोन वाट्या, गूळ चार वाट्या, वेलची पावडर, लवंगा दोन तीन. कृती: कैय्रा धुऊन साले काढून घ्यावीत. साले काढलेल्या कैय्रा किसाव्यात. किसाच्या दुप्पट गूळ घेऊन तो किसलेल्या कैरीत मिसळावा. दोन तास मिश्रण झाकून ठेवावे. दोन तासानंतर गूळ विरघळला की लवंगा घालून मिश्रण गॅसवर कढवायला ठेवावे. मिश्रणाचा थेंब डीशमध्ये टाकून पहावा. थेंब पसरत नसेल तर गुळांबा तयार झाला असे समजावे. तयार गुळांब्यात वेलची पावडर मिसळावी. या गुळांब्याला वेळ कमी लागतो. गूळाचे प्रमाण कैरीच्या आंबटपणानुसार कमी जास्त करावे. त्यासाठी गूळ एकत्र करून ठेवलेल्या मिश्रणाची गॅसवर ठेवण्यापूर्वी चव पहावी.

के-२ : द सॅव्हेज माऊंटन - २

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 29/03/2014 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
१९८६ १९८६ च्या चढाईच्या मोसमात के २ वर चढाईच्या दृष्टीने अनेक गिर्यारोहकांनी पाकीस्तान गाठलं होतं. वेगवेगळ्या वाटांनी के २ च्या माथ्यावर चढाई करण्यासाठी पाकीस्तान सरकारने अनेक मोहीमांना परवाने दिलेले होते. अ‍ॅलन रोझच्या ब्रिटीश मोहीमेचा त्यात समावेश होता. रोझ एक उत्कृष्ट गिर्यारोहक होता. १९८० साली मायकेल वॉर्ड आणि सुप्रसिध्द गिर्यारोहक क्रिस बॉनींग्टन यांच्यासह त्याने चीनमधील अनेक शिखरांवर चढाई केली होती. १९८० मध्ये थंडीच्या मोसमात रोझच्या नेतृत्वात ब्रिटीश तुकडीने पश्चिम धारेवरून एव्हरेस्टवर चढाईची मोहीम आखली होती. मात्र एव्हरेस्टचा माथा गाठण्यात त्यांना यश आलं नाही.

कथा मुगोड्या (मुंग वड्या) टाकण्याची

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 29/03/2014 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
मार्च महिना सुरु झाल्या बरोबरच सौ.चे उपद्व्याप सुरु होतात. आलू चिप्स, बटाटे-साबूदाण्याचे पापड आणि मुगोड्या इत्यादी प्रकार करण्याची तैयारी आणि त्या साठी आमच्या सारख्या हक्काच्या गुलामांचा वापर ही होणारच. तसे म्हणाल तर या वर्षी हिवाळा थोडा जास्त वेळ राहिला. तरी ही होळी नंतर आकाशमधून मधून स्वच्छ राहते. होळी नंतर ४ दिवसांची सुट्टी घेतली, थोड आराम करावा म्हणून. पण घरी नवरा सुट्टीवर असेल तर त्याला कसे कामात गुंतवून ठेवावे जेणेकरून सुट्टी घेण्याच्या फंदात पडणार नाही. झाले ही तसेच. या सुट्टीत सर्वात आधी केलेला पदार्थ म्हणजे मुगोड्या. बाजारात जाऊन मुगाची डाळ विकत आणली सौ.ने निवडून भिजत घातली.

नाते

लेखक अमेय६३७७ यांनी शनिवार, 29/03/2014 07:16 या दिवशी प्रकाशित केले.
ना ओढ असे देहांची वा स्पर्शाची मर्यादा सहवासाने उजळावे वाटे तरीही कितीदा ना प्रीती - ना ही मैत्री हे तुजला मजला ठावे जे मिळते यातुन, पुरते का द्यावी खोटी नावे हे देण्या अन् घेण्याचे फुललेले मोहक अंगण का बहराला मारावे नसलेले घालुन कुंपण याआधी कैसे होते यापुढती कैसे जाऊ सध्या ठरवू इतके की सध्याला बिलगुन राहू क्षण अपार श्रीमंतीचे ये जपून हृदयीं ठेवू नाजुकसे नाते अपुले वळणाशी अलगद नेऊ -- अमेय

"राजकारण जातीकडून वर्गाकडे" प्रकाश पवारांचे विश्लेषण, वास्तव की निश्कर्ष घाईचे ?

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 28/03/2014 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. प्रकाश पवार हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि नविन पिढीतील ताज्या दमाचे मराठी राजकीय निरीक्षक, अभ्यासक आणि विश्लेषक असून; त्यांच्या अभ्यासपूर्ण, संयत, समतोल विश्लेषणांकरीता परिचीत आहेत. त्यांचे लेखन मला स्वतःला दखल घेण्याजोगे वाटत आले आहे. डॉ. प्रकाश पवारांचा दैनिक सकाळ मध्ये "राजकारण जातीकडून वर्गाकडे" नावाने लेख आला आहे. त्यात ते म्हणतात
निवडणुकीच्या विश्‍लेषणात आणि अंदाज व्यक्त करताना अद्यापही आपल्याकडे जातीची समीकरणेच मध्यवर्ती मानली जातात.

कान्हा नॅशनल पार्क - रामटेक (भाग ६) समाप्त

लेखक पिलीयन रायडर यांनी शुक्रवार, 28/03/2014 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
कान्हा नॅशनल पार्क - कसे जावे (भाग १) कान्हा नॅशनल पार्क - कुठे रहावे (भाग २) कान्हा नॅशनल पार्क - काय पहावे (भाग ३) कान्हा नॅशनल पार्क - वाघ....... (भाग ४) कान्हा नॅशनल पार्क - भोरमदेव (भाग ५) भोरमदेव झाल्यानंतर हॉटेल वर येऊन सर्वांच्या (मागे राहिलेल्यांच्या) शिव्या खाऊन.. वर त्यांनाच (उगाच) ४ शिव्या घालुन मी झोपले..

खेळाडूवृत्तीचा आणि सर्वसमावेशकतेचा अभाव असलेले खेळ; उर्फ क्रीडा, संस्कृती इत्यादी क्षेत्रातील कंपुगिरी

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 28/03/2014 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व सामान्य जनतेच लक्ष देशाच्या राजकारणाकडे लागल असताना भारतीय सर्वोच्च न्यायालय क्रिडाक्षेत्रातील राजकारणावर (BCCI) उपाय योजण्यात व्यस्त झाले आहे. क्रिडा, संस्कृती, सहकार, शिक्षण या क्षेत्रातील कंपुगिरी हल्ली राजकारणातील राजकारणावर ताण करताना दिसते आहे.
Many of the associations by virtue of being not-for-profit companies, abuse the system of proxies, and retain control by controlling the memberships. The BCCI uses India in their logo, they use government land for stadium, they use state security for conducting matches, yet they are not agreeable to come under the RTI Act!