Skip to main content

नाते

लेखक अमेय६३७७ यांनी शनिवार, 29/03/2014 07:16 या दिवशी प्रकाशित केले.
ना ओढ असे देहांची वा स्पर्शाची मर्यादा सहवासाने उजळावे वाटे तरीही कितीदा ना प्रीती - ना ही मैत्री हे तुजला मजला ठावे जे मिळते यातुन, पुरते का द्यावी खोटी नावे हे देण्या अन् घेण्याचे फुललेले मोहक अंगण का बहराला मारावे नसलेले घालुन कुंपण याआधी कैसे होते यापुढती कैसे जाऊ सध्या ठरवू इतके की सध्याला बिलगुन राहू क्षण अपार श्रीमंतीचे ये जपून हृदयीं ठेवू नाजुकसे नाते अपुले वळणाशी अलगद नेऊ -- अमेय
लेखनविषय:

वाचने 2724
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

छान! यावरून ही आठवली, वगैरे! कधी तुझ्यास्तव मनात भरते मेघ पिणारे चांदल नाते दवात जे घर बांधूनि राही पण ते नाही प्रेम वगैरे! तव शरिरातून कधी पेटती लाल किरमिजी हजार ज्योती त्यात मिळाया पतंग होतो परि नसे ते काम वगैरे! कधी शिवालय पांघरुनी तू समोर येता विरती हेतू मनात उरते मात्र समर्पण मी नसतो पण भक्त वगैरे! रंगित असले धुके धराया सार्थ शब्द हे अपरे वाया त्या पलिकडचा एक जरासा दिसे बरासा फक्त वगैरे! -कुसुमाग्रज