Skip to main content

न्यायव्यवस्था आणि भ्रष्टाचार

लेखक उडन खटोला यांनी रविवार, 11/05/2014 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय न्यायव्यवस्थेची सध्याची स्थिति आणि अवस्था पाहता मन विषण्ण होते. संजय दत्त सारख्या राष्ट्रद्रोही गुंडाला शिक्षा व्हायला तब्बल 20 वर्षे लागली . या कालावधीत त्याने दोषी असूनही भरपूर पैसा कामावला आणि मौजमजा केली . सलमान खान देखील एकापेक्षा अधिक प्रकरणात दोषी असूनही 20 वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगाबाहेर आहे, आणि रगगाड पैसा कमवून "मज्जानु लाईफ " जगतो आहे. उद्या पैशाचा वापर करून ,साक्षीदार फोडून तो कदाचित निर्दोष ही सुटेल किंवा अतिशय मामुली शिक्षा होईलही !

ठाणे-मुंबई-कल्याण मधील मिपाकर आणि टवाळ कार्टा यांचा मिपा कट्टा....

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 11/05/2014 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
(फार घाईत टाइप करत असल्याने शुद्ध लेखन बघू नये.) श्री. टवाळ कार्टा, १० मे ते २५मे दरम्यान ठाण्यात येत आहेत. इथल्या आसपासच्या मिपाकरांना भेटण्याची त्यांना ओढ आहे.तसा त्यांचा मला व्य.नि. आला. तरी आता इथेच काय ते ठरवा. म्हणजे ठिकाण आणि वेळ, इ. इ. दुर्दैवाने, मी नेमका यानबुवलीत अडकल्याने, माझा हा पण कट्टा हुकणार. कळावे, आपल्या मिपाकरांचा एकमेकांवर लोभ आहेच, हे असे कट्टे करत आपण तो अज्जुन व्रुध्धींगत करू या.

पाककृती - रावडाचिवडा (पाककौशल्यात "ढ" असलेल्यांसाठी)

लेखक तुमचा अभिषेक यांनी रविवार, 11/05/2014 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षकावरून समजले असेलच की हि पाकृ केवळ आणि केवळ जेवण बनवण्याच्या कौशल्यात निपुण नसलेल्यांसाठी आणि काहीही पचवण्याच्या कौशल्यात पारंगत असलेल्यांसाठीच आहे. एकेकाळी, म्हणजे बारावी नापास होत असताना घरी होतो तेव्हा बरेचदा हा प्रकार करून झाला आहे. मात्र कैक वर्षांनी आज लग्नानंतर, जेव्हा बायको माहेरी आणि आईवडील नातेवाईकांकडे, असा दुहेरी सुवर्णयोग आला, तेव्हा पुन्हा एकदा किचन ओट्यावर हात साफ करायची संधी मिळाली. तिचा पुरेपूर वापर करत आज हि डिश तुमच्यासमोर पेश करत आहे.

एका पुतळ्याची व्यथा कथा

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 11/05/2014 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
एका महान नेत्याची आठवण म्हणून, शहरातल्या चौकात पुतळ्याची उभारणी केली. पुतळ्याला हार-तुरे घालण्यात आले. भाषणे झाली, अमर रहेच्या घोषणा इत्यादी झाल्या. असे पुतळ्याला वाटले, आता मस्त पैकी इथे उभे राहून, जगाला बघू. रोज सांयकाळी खाली बसलेल्या प्रेमिकांच्या गुलगुल कधी न संपणाऱ्या कथा ऐकतात, मस्त टाईम पास करू. पण झाले भलतेच, उद्घाटनाच्या, दुसऱ्याच दिवसांपासून, पुतळ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कुणीही साफ-सफाई, स्वछता करायला फिरकत नव्हते. त्याचा अंगावर धूळ-माती घाण जमा होऊ लागली. कर्कश ओरडणाऱ्या कावळ्यांनी प्रत:विधी साठी उपयुक्त जागा म्हणून पुतळ्याचा वापर सुरु केला.

नगर च्या घटनेत काहीतरी भयंकर घडलयं आणि ते लपवल जातयं.

लेखक गुल-फिशानी यांनी रविवार, 11/05/2014 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
आजच सकाळी दिव्य मराठी च्या “रसिक” पुरवणीत नितीन आगे या अहमद नगर जिल्ह्यातील खर्डा गावातील दलिय युवकाच्या क्रुर हत्ये संदर्भातील नागराज मंजुळेचा “जब्याने मारलेला दगड समाजापर्यंत पोहोचलाच नाही” हा अतिशय संवेदनशील असा लेख वाचण्यात आला. याच पुरवणीत याच घटनेवरील प्रा. सतीश वाघमारे यांचा आणखी एक संवेदनशील लेख “पुरोगामी महाराष्ट्राचा विजय असो” या नावाने आलेला आहे. दोन्ही लेख अत्यंत विचार प्रवृत्त करणारे व अतिशय अस्वस्थ करणारे असे आहेत. ही बातमी अगोदर वाचनात आली होती पण हे लेख वाचल्यावर त्या घटनेच्या तीव्रतेने अतिशय सुन्न झालोय.

पन्हे..................

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 10/05/2014 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय........, आज दुपारी उन्हाने जीव कासावीस झाल्यावर मी भाजलेल्या कैरीचे पन्हे घोटाघोटाने पीत असताना मला मावशीआज्जेची आठवण झाली....मावशीआज्जी....म्हणजे माझ्या वडिलांची सगळ्यात थोरली मावशी.....तू अजून तिला भेटला नाहीस. तिने केलेले पन्हे आजोबांना फार आवडे... तिला बिचारीला त्या वयात अजिबात ऐकू यायचे नाही...आम्ही तिच्याशी पाटीवर लिहून तिच्याशी संवाद करायचो...त्या काळातील टेक्स्ट मेसेजिंगच म्हणना....फ़क्त एकतर्फी.... मी जशी तिला बघितले तशी ती म्हातारीच होती....व आजोबांबरोबर मोठ्ठे आंगण असलेल्या कौलारु घरात रहात असे.

चार बोतल वोडका

लेखक वेल्लाभट यांनी शनिवार, 10/05/2014 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
वाहन चालवताना सांभाळून चालवावं, जपून चालवावं असं सांगून कळतं का कधी? म्हणून. अ