मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

न्यायव्यवस्था आणि भ्रष्टाचार

उडन खटोला · · काथ्याकूट
भारतीय न्यायव्यवस्थेची सध्याची स्थिति आणि अवस्था पाहता मन विषण्ण होते. संजय दत्त सारख्या राष्ट्रद्रोही गुंडाला शिक्षा व्हायला तब्बल 20 वर्षे लागली . या कालावधीत त्याने दोषी असूनही भरपूर पैसा कामावला आणि मौजमजा केली . सलमान खान देखील एकापेक्षा अधिक प्रकरणात दोषी असूनही 20 वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगाबाहेर आहे, आणि रगगाड पैसा कमवून "मज्जानु लाईफ " जगतो आहे. उद्या पैशाचा वापर करून ,साक्षीदार फोडून तो कदाचित निर्दोष ही सुटेल किंवा अतिशय मामुली शिक्षा होईलही ! पण त्यामुळे "न्याय"होईल असे वाटते का? सध्याची न्यायव्यवस्था ही एक सर्कस किंवा पैशाचा खेळ बनली असून धांनदांडग्यांच्या पैशाने ,सुस्त अन भ्रष्ट नोकरशाहीमुलळे आणि वेळखाऊ न्यायव्यवस्थे मुळे सामान्य मनुष्य या सर्कस मधला एक हतबल जोकर आहे ,असे मनोमन वाटून जाते. यावर काही उपाय असू शकतो का? पुराण काळात किंवा इतिहास काळात काही दाखले सापडतात . धर्मराजाने न्याय करताना तत्कालीन वर्णव्यवस्थे नुसार एकाच गुन्ह्यासाठी ब्राह्मण , क्षत्रीय ,वैश्य व शूद्र यांना वेगवेगळी शिक्षा दिली होती. आजच्या बदललेल्या सामाजिक परिस्थिथीत "आर्थिक उत्पन्न " या निकषावर आधारित न्यायव्यवस्था लागू करावी का? उदाहरणार्थ -सलमानच्या खटल्यात गेल्या 20 वर्षापासून झालेला सरकारी खर्च ,कायद्यातीळ पळवाटा शोधून /साक्षीदार फोडून /वकिली काव्यांचा वापर करून ,कोर्टबाजीत आणि न्यायाप्रक्रियेत खर्च झालेला प्रचंड पैसा /वेळ आणि मनुष्यबळ ह्याचा विचार करता इतक्या वर्षांनंतर देखील फुटपाथ वर मृत्यू झालेल्या नागरिकांच्या वारसाना काही नुकसान भरपाई मिळेल याची काडीचीही शाश्वती नाही. म्हणजे शेवटी त्यांना "न्याय"मिळणार नाहीच ! Justice delayed is justice denied ह्याचा विचार करता अशा प्रकरणात सलमान सारख्या गुंडाला त्याच वेळी (20 वर्षापूर्वी) अनावश्यक कोर्टबाजी टाळून जबर रकमेचा दंड (सुमारे 50 कोटी रुपये )आणि 1/3 वर्षाची कैद अशी शिक्षा दिली गेली असती (किंवा आताही दिली गेली )तर थोडाफार तरी "न्याय"होईल. कारण दंडाच्या रकमेतील अर्धी रक्कम मृतांच्या वारसाना आणि अर्धी रक्कम सरकारजमा करावी . आणि भविष्यातही आर्थिक निकषांवर शिक्षा देण्याच्या पद्धतीचा अवलंब करून न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार समूळ उपटून काढावा. अर्थात प्रत्येक व्यवस्थेत काही फायदे /तोटे असतातच! या व्यवस्थेतही काही धोके असू शकतील . पण तरीही आशा प्रकरणात "न्याय"प्रस्थापित करण्याचा हा एक उपाय असू शकतो , असे माझे वैयक्तिक व प्रामाणिक मत आहे... चर्चा अपेक्षित !

वाचने 16753 वाचनखूण प्रतिक्रिया 8

दुश्यन्त Sun, 05/11/2014 - 18:24
छोटीशी दुरुस्ती: संजय दत्तची केस २०+ वर्षे जुनी आहे (१९९३ ला बॉम्ब स्फोट झाले). सलमानची काळवीट शिकारीची केस १५-१६ वर्षे जुनी तर दारू पिवून गाडीखाली चेंगरल्याची केस १२ वर्षे जुनी आहे.मात्र अश्या केसेसचा लवकरात लवकर निकाल लागावा ही अपेक्षा अगदी योग्य आहे. ज्यांच्याकडे पैसा,वशिला, ओळखी, पावर वगैरे आहे ते लोक कितीही वर्षे कोर्टात केस-केस खेळत राहतात आणि स्वतः मोकाट फिरतात ही एक बाजू आणि दुसरी बाजू म्हणजे ज्यांच्याकडे हे काही नाही ते लोक कोर्टात केस कधी उभी राहील या आशेवर निव्वळ कच्चे कैदी बनून तुरुंगात वर्षानुवर्षे खितपत पडतात.आपल्या देशात न्याय पैशांत विकत मिळतो हेच खरे.

आयुर्हित Sun, 05/11/2014 - 18:43
अजून काही किस्से यात येतात जसे १)लालू प्रसाद यादव यांना ५ वर्षाचा कारावासाची शिक्षा असतांना निवडणूक जवळ आली असतांना तुरुंगाच्या बाहेर २)कलमाडी निवडणूक जवळ आली असतांना तुरुंगाच्या बाहेर ३)राजीव गांधींच्या मारेकरयांना निवडणूक जवळ आली असतांना फाशीची शिक्षा माफ ४)२० वर्षापूर्वीच्या आयकरासाठी जयललितावर निवडणूक जवळ आली असतांना कारवाई

चौकटराजा Sun, 05/11/2014 - 19:42
निसर्ग॑ सोडला तर मानवी जगात अशी कोणतीही समस्या नाही जिला उकल नाही.फक्त कुणाच्या तरी ** वर लाथ मारण्याची समाजात धमक हवी .There is no problem in this cultural world of mankind where there is no solution ,provided the society have guts to kick out the culprit. असे चौकटराजा नावाचे फिलासॉफर फार पूर्वीच म्हणून गेले आहेत.

In reply to by सुबोध खरे

चौकटराजा गुरुवार, 05/15/2014 - 07:17
एम सी चागला यानी 'शिशिरातले गुलाब" Roses in December नावाची आत्मकथन लिहिले आहे त्यात त्यांचे एक वाक्य आहे ते असे WE IN THE COURT, GIVE VERDICT NOT NECESSARILY THE JUSTICE !