महाभारत
हे जीवन एक महाभारत आहे भाऊ !!
इथे परकीयांपेक्षा स्वकीयांची भीती जास्त वाटते,
जगण्यासाठी क्षणाक्षणाला संघर्ष करावा लागते,
छोट्या छोट्या गोष्टींसाठी वारंवार
झगडावे लागते,
हे जीवन एक महाभारत आहे भाऊ !!
इथे नीतीमत्तेची रोजच होळी केली जातेय,
जातीच्या धर्माच्या आधारावर उचनीच ठरवले जातेय,
तरी जो तत्वांना जागतो त्याला षंढ ठरवले जातेय,
हे जीवन एक महाभारत झालेय हे भाऊ !!
इथे स्वार्थासाठी जो तो हपापलाय,
माझे माझे करताना परिवार माञ विसरलाय,
दूरदूरवर पसरलाय अन्याय,
न्याय माञ कुठेतरी हरवलाय,
हे जीवन एक महाभारतच हे भाऊ !!
मानसन्मान हेवेदावे हे रोजचेच पाहुणे झालेत,
शकुनी तर माणसा माणसात ढीगाने सापडायला ला
सेहेवागी पोवाडा
जय हो..
जय हो..
जय हो..
(गद्य).......वीर..वीर.. धुरंधर ...हणामाssर सम्राssट...क्रीकेट मैदान मुलुख तोफ...चालत्या/हलत्या/बोलत्या बॉलरांचा कर्दनकाळ...असा तो कधि कधि काळ सोडणारा..परी खेळला की आग ओकणारा...तेंडुलकरी कारकिर्दीतही आपली अन्---त्याची(ही) छाप सोडणारा... वीरु विरेंद्र अमरेंद्र..धुंव्वाधांर..सरदार..सेहेवाग!!! ऐकू या त्या...चा जय जय कार जी..जी..जी...!काव्यरस
राजजामातांचे विमान जमिनीवर येणार ?
गांधी घराण्याचा आणि पर्यायाने देशाचा जावई असणारे श्रीमंत राबर्ट वदराजी सोनियाजींच्या राज्यात एखाद्या राज्याप्रमाणेच वावरत असत. त्यांच्याकरता खास अशी योजना होती की सामान्यांना लागू असणारी सुरक्षा तपासणी त्यांना लागत नसे. तसे बोर्ड तमाम भारतीय विमानतळावर होते. बाकी मंडळी ज्यांना अशी सवलत असते त्यांना विशिष्ट पदाकरता असते. त्यामुळे ह्या बोर्डावर त्या पदाचा उल्लेख असे. म्हणजे माजी राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री वगैरे. केवळ राजजामातांचा उल्लेख निव्वळ नावाने होत असे.
मिपाकरांच्या आशीर्वादाने...
नमस्कार मिपाकरहो...
मिपावर गेली काही वर्षं जिलब्या पाडून, त्या तुम्हाला बळेबळे खायला लावून, त्या कशा झाल्यायत याबद्दलच्या तुमच्या दिलखुलास आणि मोकळ्या प्रतिक्रिया माझ्या 'धाग्यांच्या' पदरात पाडून घेऊन, पुढच्या जिलब्या त्यातल्या त्यात 'ब-या' कशा होतील याचा सातत्याने प्रयत्न करून झाल्यानंतर, आता मी लोकप्रभा साप्ताहिकात अधूनमधून लिहायला सुरुवात केलेली आहे... म्हणजे मी तसा सतत लिहीतच असतो, पण ते अधून मधून माझ्या लेखनाची, छपाईसाठी निवड करतात एवढंच. तर या लोकप्रभा साप्ताहिकात आलेल्या माझ्या दोन लेखांचे दुवे मी इथे जोडतोय. यातल्या एका लेखाचा दुवा मी या आधी काही दिवसांपूर्वी ख. फ.
फ़िर तेरी कहानी याद आयी....!
आता नाही तिला आठवायचं म्हटलं किच तिची आठवण येते हमखास...
नाही आत.. नाही बाहेर....
आय पी एल २०१४
मिपावर IPL -२०१४ बद्दल एकही धागा नाहीये हे नवलच!
असो मी आत्ता IPL -२०१४ वर नवीन धागा सुरु करतेय IPL संपत आली असताना :-)
ह्या IPL मध्ये कोण जिंकेल असे वाटते?
पंजाबचा फॉर्म बघता तेच जास्त योग्य वाटत आहेत
पण डार्क हॉर्स कोलकाता ने अनपेक्षितपणे फायनल पर्यंत धडक मारली आहे
कितीही नावे ठेवली तरी IPL ने जास्त मनोरंजन केले आहे ( डेली सोप्स पेक्षा ) हे मान्य करावेच लागेल
निम्मे श्रेय सिद्धूच्या कॉमेंट्रीला :-)
जाता जाता : सचिन तेंडूलकर नसल्यामुळे मुंबई ने काही खास कामगिरी केली नाहीये आणि त्याला असे मैदानावर न बघून थोडे वाईट वाटत होते
आमच्या शेजारचे आजी-आजोबा…!
_____________________________________________________________________________________________
"काय मग?… कसं वाटतंय नवीन घर?"
नुकतंच आम्ही आमचं घर बदललं होतं. घर अजून नीट लावलंही नव्हतं.. हिची आतल्या खोलीत झाशीच्या राणीच्या अवतारात साफसफाई चालू होती आणि आमच्या अंगात नक्षलवादी संचारले होते. अश्या एकंदर युद्धाच्या वातावरणात दारावरची कडी वाजली. साधारण सत्तरीतले आजोबा हातात काठी, डोळ्यावर चष्मा, पांढरा कुर्ता, धोतर आणि चेहर्यावर प्रसन्न हसू अश्या पेहरावात दारात उभे..
"आज उठल्या उठल्या दारात हा टेम्पो दिसला आणि कळालं आपण आलात ते"
"हो ना कालच आलो.. अजून सफाईच चालू आहे..
तू गेलीस तेव्हा...
तू गेलीस आणि मीच मला शोधीत राहिलो..
सुकलेली तुटकी स्वप्ने कुरवाळीत राहिलो
अधरांवर उरली एक अधिरशी हूरहूर ओली
कावितेत तुझ्या मी आठवणी गुंफीत राहिलो..
तू गेलिस तेव्हा सांज जराशी ओली होती
नुकतीच पसरली प्रेमफुलांवर लाली होती
तू अश्रूसम पापणीतुनी ओघळून जाता
तो अश्रू ओला चोहिकडे शोधीत राहिलो..
गे स्मरती सखये सांजेच्या त्या वेड्या भेटी
अंतरात अजुनी सलती त्या स्मरणांच्या गाठी
बघ धून आळवीत नित्याची मी होवूनी कान्हा
राधा म्हणुनी तुजला गे हाकारीत राहिलो..
तू सर प्रेमाची चातक मी एकला अधिरसा
रोखून श्वास या इथे उभा मी सखे कधीचा
हा श्वास संपता खोल तुझ्या डोहात बुडावे
इतुकेच मागणे नित्य सखे मागीत राहिलो..
सेकंड होम...
सह्याद्रीच्या सांदी कोपऱ्यात मोठमोठ्या वसाहती उभ्या राहतायत. निसर्गाने अंथरलेल्या हिरवाईचच मार्केटींग करून तिलाच छेदत, भेदत गुळगुळीत रस्ते बनतायत आणि टुमदार घरं वसतायत. सेकंड होम्स म्हणे...
मागे एक (उगाचच) इंग्रजाळलेली माझी मैत्रीण (?) मला कोण कौतुकाने सांगत होती. निसर्गाने नटलेल्या त्या परिसरात पूल साईडला त्यांचा ग्रुप कसा तर्र झाला होता, कसं चिल मारलं वगैरे वगैरे. मला याचंही विशेष वाटलं कि माझा स्पष्टवक्तेपणा (किंवा तुसडेपणा) माहित असूनही तिने मला हे सांगितलं. वर त्या बेहोशी का आलमचे फोटोही दाखवले. अपलोडहि केले असतील कदाचित. आणि करणाऱ्यांनी लाईक्स पण केले असतील...
मिसळपाव