Skip to main content

महाभारत

लेखक निलरंजन यांनी शनिवार, 31/05/2014 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
हे जीवन एक महाभारत आहे भाऊ !! इथे परकीयांपेक्षा स्वकीयांची भीती जास्त वाटते, जगण्यासाठी क्षणाक्षणाला संघर्ष करावा लागते, छोट्या छोट्या गोष्टींसाठी वारंवार झगडावे लागते, हे जीवन एक महाभारत आहे भाऊ !! इथे नीतीमत्तेची रोजच होळी केली जातेय, जातीच्या धर्माच्या आधारावर उचनीच ठरवले जातेय, तरी जो तत्वांना जागतो त्याला षंढ ठरवले जातेय, हे जीवन एक महाभारत झालेय हे भाऊ !! इथे स्वार्थासाठी जो तो हपापलाय, माझे माझे करताना परिवार माञ विसरलाय, दूरदूरवर पसरलाय अन्याय, न्याय माञ कुठेतरी हरवलाय, हे जीवन एक महाभारतच हे भाऊ !! मानसन्मान हेवेदावे हे रोजचेच पाहुणे झालेत, शकुनी तर माणसा माणसात ढीगाने सापडायला लागलेत, विश्वासाला तर कित्येकजण यमसदनी धाडलाय टपलेत हे जीवन एक महाभारतच हे भाऊ !! इथे रोजच होतेय स्ञियांचे विडंबन, नाक्यानाक्यावर दिसतायत दुर्योधन आणि दुशासन, काही न पाहणार्या धृतराष्ट्रासारखे आंधळे झालेय प्रशासन हे जीवन एक महाभारत झालेय भाऊ !! जिंकायची आस ठेवली तरी बरेचसे गमवावे सुद्धा लागतं, मोह किती झाला तरी आपलं काय परकंसुदधा जपावे लागतं, कृष्ण काय आणि अर्जुन काय इच्छा असो वा नसो प्रत्येकाला इथे लढावचं लागतं

वाचने 2915
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

हे वाक्य हे जीवन एक महाभारत आहे भाऊ !! या ऐवजी वाचले की आपल्या काव्याला अर्थ प्राप्त होतो.

आता पुढची कविता येउ दे. हे जीवन एक रामायण आहे ताई.

In reply to by पोटे

हे जीवन एक तारांबळच आहे बाई!

In reply to by पोटे

इथे रोजच होतेय स्ञियांचे विडंबन,
येथे "विडंबन" ऐवजी "विटंबना" किंवा तत्सम शब्द अधिक उचित वाटला असता. "विडंबन" हा एक लेखनप्रकार आहे. :)

आत्मशून्य तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तुमच्या सूचनाचे मी नक्कीच पालन करीन पोटे साहेब ही कविता मनातल्या उत्कट भावनांचे प्रतीक आहे महाभारत संपले पण आजही आपल्याला पांडवासारखे लढावे लागते आणि सगऴयात जास्त ञास ते आपलीच माणसं हा जडलेला ञास वेदना दायी ठरतोय आणि तो मुक्या ने सहन सुदधा करावा लागतोय

In reply to by निलरंजन

आता रामायण लिहायला घेणार का?
हा जडलेला ञास वेदना दायी ठरतोय आणि तो मुक्या ने सहन सुदधा करावा लागतोय
ज्याम प्रयत्न करुनही तुमच्यासारखा त्रास काढता येत नाही. नक्की कसला त्रास होतोयं तुम्हाला?

In reply to by संजय क्षीरसागर

आपल्याला हेच कळत नाही के आपले शञू आपलेच जवळजवळचे लोक आहेत आणि जेव्हा हे कळते तेव्हा फार च ऊशीर झालेला असतो तोंडावर गोड बोलून पाठीत खंजीर खुपसणार्यांची भीती वाटते

हे g.one मिसळपाव आहे, इथे लेखापेक्षा प्रतिसादाचीच भिती वाटते, लिखाणाची आस असेल तर सुद्दलेखन सुधरावेच लागते, संस्थळ फुकट असले तरी काय झाल इंटरनेटचे बिल भरावेच लागते.

In reply to by जेपी

हे जीवन एक महाभारतच हे ताऊ !! इथे रोजच होतेय वस्त्रांचे उन्नयन, मोक्यामोक्यावर दिसतायत दिपिका आणि बालन, काही न पाहणार्‍या धृतराष्ट्राला सुद्धा करावेसे वाटेल प्रशासन

In reply to by निलरंजन

हे जीवन एक महाभारत झालेय दादू !! घरची हौस पुरवायला बाहेरचं कमवावं सुद्धा लागतं, मोहाला उपाय नाही, आपलं काय परकं सुद्धा जपावं लागतं, कृष्ण काय आणि अर्जुन काय इच्छा असो वा नसो प्रत्येकाला त्यासाठी वाकावचं लागतं

मी एकाच वेळी दोन्ही कडे पोस्ट केलेले