पुन्हा ५ रुपयात जेवण!
कुठलाही पक्ष सत्तेवर बसला की आपोआप माजोरडा बनून लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम मनोभावे करू लागतो असे वाटू लागले आहे. अच्छे दिन येतील तेव्हा येतील. तूर्तास महागाई, दुष्काळ, अन्नटंचाई ह्या गोष्टी अक्राळविक्राळ रुप धारण करत असताना भाजपाच्या एका मस्तवाल नेत्याने, आशिष शेलारने असे विधान केले की मुंबईत ५ रू. मधे पोट भरता येते आणि ५००० रु. मधेही भरता येते.
जॉर्ज ऑरवेलच्या अॅनिमल फार्म ह्या पुस्तकाची आठवण येते. माणसाची सत्ता झुगारून टाकण्याकरता डुकरे इतर प्राण्यांच्या मदतीने क्रांती करतात आणि मग प्राण्यांची सत्ता येते. मग डुकरे अच्छ्या दिनांचे गाजर लटकवत स्वतः माणसासारखे वागू लागतात.
मिसळपाव