Skip to main content

माझे साईपदयात्रेचे अनुभव - २

लेखक कविता१९७८ यांनी शनिवार, 02/08/2014 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
माझे साईपदयात्रेचे अनुभव - १ - http://www.misalpav.com/node/28447 पहिल्या भागाची सुरुवात मी एका सोशल वेबसाईटवर मागितलेल्या मदती वरुन केली ती मदत मला कशी मिळाली आणि मी पदयात्रेच्या अनुभवाचे लेखन कसे केले ते पुढील लिंक वरुन कळेल , प्रतिसादात पुढे मिळालेल्या मदतीचे फोटो देखील आहेत. http://www.maayboli.com/node/49148 माझे साईपदयात्रेचे अनुभव - २ सकाळी ३.३० च्या दरम्यान मंडळाचे सभासद सर्वांना हाका मारुन उठवु लागले. बायका ग्रुपने ओढ्याच्या काठी जाउन प्रातःविधी उरकु लागल्या.

मैत्रीचा धागा

लेखक भिंगरी यांनी शनिवार, 02/08/2014 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
ऑगस्ट महिना आला कि नव्या पिढीची धामधूम चालू होते ती फ्रेन्डशिप डे साजरा करण्याची. रंगीबेरंगी पट्ट्या हातभार बांधून दिवसभर दिमाखात फिरणार. आता तर काय तोंडावर सुद्धा काहीबाही लिहिलेलं असतं. आमच्या वेळी नव्हतं बुवा असलं काही.(इति आमची पिढी) पण तरीही माझी शाळेत असताना झालेली मैत्री आजपर्यंत टिकून आहे इ. ५ वी असताना मला खूप मैत्रिणी मिळाल्या. त्यातील एक मैत्रीण माझी जिवाभावाची कधी झाली कळलेच नाही. एकाच बेंच वर बसून वर्ग चालू असताना खुसूखुसू गप्पा मारणे,हळूच डबा उघडून खाणे अशा आमच्या गमती जमती चालत. एकमेकी शिवाय करमत नसे.

पाऊस दाटलेला..माझ्या 'मनामधे' हा..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 01/08/2014 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस दाटलेला, माझ्या घरावरी हा दारास भास आता, हळूवार पावलांचा गवतास थेंब सारे बिलगून बैसलेले निथळून साचलेले, तळवा भिजेल आता, हळूवार पावलांचा झाडावरुन पक्षी, सारे उडून गेले जेव्हा भिजून गेले, पंखात नाद त्यांच्या हळूवार पावलांचा पाऊल वाट सारी, रात्री भिजून गेली विसरुन तीच गेली, ओला ठसा कुणाच्या हळूवार पावलांचा गीतः-सौमित्र ================ आज अगदी दुपारपासून ह्या वरच्या गीतातल्या सगळ्या भाव भावना,मानाचा अगदी छळ करत आहेत. दोन वर्षापूर्वी नविन गाडी घेतल्याची हौस म्हणण्यापेक्षा,पावसातला शांत गझल ऐकत फिरायचा आनंद अता कार मुळे आणखि स्वस्थ चित्तानी लुटता येणार..यासाठी,मन कुठे जाऊ? कुठे जाऊ?

सप्तरंगी पोपट !!

लेखक फिझा यांनी शुक्रवार, 01/08/2014 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
सप्तरंगी पोपट !! तो दिवसच नशिबात आला अन सांजवेळ ती अशुभाची आभाळ फाटुनी घात जाहला करूण व्यथा त्या पिलाची ….! असे बंधिस्त तो पिंजरा सोन्याचा कि लोहाचा, अतिरम्य पंख किती फडकले पिल्लू गोजिरे ते पार अडकले …! गेला भरधाव तो रथही घेउनि केविलवाण्या पिंजऱ्यास , आक्रोश विरला अन अश्रूही इवलेसे डोळेच फक्त सांत्वनास …! काळोख दाटला सभोवती भीती चिमुकल्या मनात , काजव्यांना साद घाले परंतू तो तर दिव्यांचा झगमगाट ….! इथे न कुणी मायबाप प्रेमाला अन मायेला , जीवाहूनही किंमत न्यारी इथे फेकील्या पैशाला ….! सापडला जीव कोंडीत प्राक्तन ते नशिबाचे , साजरे केले तरी सोह
काव्यरस

Abandoned २.०

लेखक स्पा यांनी शुक्रवार, 01/08/2014 14:37 या दिवशी प्रकाशित केले.

अस्तु "So Be It"!

लेखक स्वाती दिनेश यांनी शुक्रवार, 01/08/2014 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
.
२६ जुलै २०१४ ,शनिवारी संध्याकाळी फ्रांकफुर्टमध्ये डॉ.मोहन आगाशे यांच्या उपस्थितीत 'अस्तु' नावाच्या मराठी सिनेमाचा खेळ आणि त्यांच्याशी गप्पा असा कार्यक्रम आहे.. हे समजल्यावर तिथे जायचे हे लगेचच ठरवले. फ्रांकफुर्ट आणि आसपासच्या गावातून जवळपास ४० एक मराठी मंडळी एकत्र आलेली पाहण्याचा इतक्या वर्षातला हा आमचा पहिलाच प्रसंग! एवढे मराठी लोकं इथे आहेत..

खांडवी (नागपंचमी विशेष)

लेखक अनन्न्या यांनी शुक्रवार, 01/08/2014 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्याकडे कोकणात नागपंचमीला चंदन उगाळून त्याने पाटावर नाग काढून त्याची पूजा केली जाते. नागपंचमीला उकडीचे मोदक किंवा खांडवी केली जाते. तसे कोकणातल्या पाककृती म्हणजे त्यात तांदुळ, गूळ आणि ओले खोबरे हे मुख्य घटक हवेतच! साहित्यः दोन वाट्या तांदळाचा रवा, दोन वाट्या गूळ, एक वाटी ओले खोबरे, मीठ, तूप वेलची, पाणी. कृती: पूर्वी जातिणीवर रवा काढला जाई. आता मात्र बाजारात तयार इडली रवा मिळत असल्याने काम बरेच सोपे झालेय. हा रवा थोडा कोरडा भाजून झाल्यावर साधारण पाव वाटी तूप घालून मंद आचेवर तांबूस भाजावा. रव्याच्या दुप्पट पाणी घेऊन ते उकळण्यास ठेवावे. त्यात गूळ. मीठ, थोडे ओले खोबरे आणि वेलची पावडर घालावी.

छंद तुझा ..

लेखक psajid यांनी शुक्रवार, 01/08/2014 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
नभामध्ये तारकांचा थवा धुंद आहे, झुळूझुळू वाहणारा 'अनिल' मंद आहे !! पावलात तुझ्या घुंगरूचा नाद तो, तालावर बेहोष मी बेधुंद आहे !! केसांत अडखळून वाऱ्यास गंध आहे, गालावरच्या खळीचा हृदयास छंद आहे !! रक्तिम ओठ चावताना तू दिसतेस अशी, तुझ्या त्या इशाऱ्यावर मन गुंग आहे !! तो कटाक्ष तिरका अन निर्मळ हास्य, कसं सांगू सखे मी बेबंद आहे !! ...खरंच बेबंद आहे !!
काव्यरस

माझे साईपदयात्रेचे अनुभव - १

लेखक कविता१९७८ यांनी शुक्रवार, 01/08/2014 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
मी ६ वर्षांपासुन पदयात्रा करीत आहे. मार्च एप्रिल मध्ये जात असते. आमचा पदयात्रेचा मार्ग चारोटी - जव्हार - मो़खाडा - त्र्यंबकेश्वर - नाशिक - सिन्नर - वावी ते शिर्डी असा आहे. दिवसा कमालीचे उन आणि रात्री जंगल असल्याने भरपुर थंडी असते. एप्रिल २०१४ या महिन्यात मी माझी ६ वी वारी पुर्ण केली. रात्री अतिशय थंडी असल्याने मला ह्यावेळी रात्री झोपच लागायची नाही. २ शॉल्स नेउन सुद्धा सारखी कुडकुडायचे. म्हणुन विचार केला कि वुलनच्या उबदार शॉल्स घेतल्या तर बरं पडेल. मी आमच्याकडे शोध घेतल्या शॉल्स तर मिळाल्या पण साईज छोट्या होत्या. त्यामुळे मी दुसर्‍या एका संकेतस्थळावर मदत मागितली. मला लगेचच मदत मिळाली.

जिल्हा - पालघर

लेखक कविता१९७८ यांनी शुक्रवार, 01/08/2014 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज १ ऑगस्ट २०१४ पासुन पालघर हा स्वतंत्र जिल्हा होतोय जो आधी तालुका होता, लहानपणापासुन ता. पालघर , जिल्हा. ठाणे हा पत्ता लिहित आलोत आता जिल्हा पालघर झालाय हे ऐकुन खुपच आनंद झालाय. जिल्हापातळीवरच्या सर्व कामांसाठी ठाण्याला जावे लागायचे , ट्रेनचा २.३० ते ३.०० तासांचा प्रवास आणी बसने जायचं असेल तर सुपरफास्ट बसने २.३० तास, आता मात्र जिल्हाचे ठीकाण आमच्यासाठी ट्रेन ने १० मिनिटांच्या अंतरावर झाले आहे. Palghar District