मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छंद तुझा ..

psajid · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
नभामध्ये तारकांचा थवा धुंद आहे, झुळूझुळू वाहणारा 'अनिल' मंद आहे !! पावलात तुझ्या घुंगरूचा नाद तो, तालावर बेहोष मी बेधुंद आहे !! केसांत अडखळून वाऱ्यास गंध आहे, गालावरच्या खळीचा हृदयास छंद आहे !! रक्तिम ओठ चावताना तू दिसतेस अशी, तुझ्या त्या इशाऱ्यावर मन गुंग आहे !! तो कटाक्ष तिरका अन निर्मळ हास्य, कसं सांगू सखे मी बेबंद आहे !! ...खरंच बेबंद आहे !!

वाचने 1157 वाचनखूण प्रतिक्रिया 0