Skip to main content

मामाचे गाव - (भरत)

लेखक दशानन यांनी गुरुवार, 20/11/2014 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग मळ्यावर असले की ही शेतं ती शेतं अशीच भटकंती सुरु असायची, मळ्यात मोजून १५-१६ घरं. त्यात एक भरतचे घर, भरतला आई-बाबा नव्हते, तो आज्जी-आजोबा सोबत रहात असे, आम्ही त्याला भरत जरी नावाने हाक मारत असू तरी तो आमच्यापेक्षा वयाने खूप मोठा होता. मोठी माणसं नेहमी त्याच्याकडे बघून चूकचुकायची पण का? हे आम्हाला कळत नसे, पण भरत सोबत खेळायला आम्हां लहानांना खूप आवडायचे कारण एवढं मोठ्या वयाचे त्यावेळी कोणी आमच्या सोबत खेळतच नसायचे, पण भरत खेळायचा, अगदी लपाछपीपासून ते कवड्यांचा सारीपाट पण.

जडण-घडण 14

लेखक माधुरी विनायक यांनी गुरुवार, 20/11/2014 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशवाणीच्या वृत्तकक्षात मी छान रमले होते. विद्यार्थी कधीतरी शंका विचारायला यायचे, शुभेच्छापत्रांसाठी कॉपी रायटिंगही सुरू होतं. घरात बहिणीच्या लग्नाची धामधूम सुरू होती. घरातलं पहिलं कार्य. सगळेच उत्साहात होते. ठरल्याप्रमाणे सगळं छान पार पडलं आणि ती आपल्या नव्या घरी रूळली. आमच्या घरी आम्ही अवघे पाच जण. आई-बाबा आणि आम्ही तीन भावंडं. त्यामुळे ताई लग्न करून गेल्यानंतर सुरूवातीचे काही दिवस तिचं नसणं खूप प्रकर्षाने जाणवत राहिलं. घरात आम्हा भावंडांमध्ये कॉलेजमध्ये जाणारी ताई पहिली. त्यातून ती कॉलेजच्या तिसऱ्या वर्षापासून अर्धवेळ नोकरी करायची. तिच्याकडे तिच्या रोजच्या अनुभवांचा खजिना असायचा.

डॉ. प्रकाश पवार यांच्या 'आरक्षण' विषयक लेखाच्या निमीत्ताने

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 20/11/2014 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
आरक्षण या खूप चघळून झालेल्या विषयावर खूप जणांनी वाचल, लिहिल आहेच. हेमु कर्णिक नावाच्या ब्लॉग धारकाने हे आरक्षण म्हणजे राज्यकर्यांच्या गेल्या साठ वर्षातील अपयशाची कबूली नाही का असा जरासा वेगळा प्रश्न त्यांच्या अनुदिनीतून विचारलेला दिसला. त्यांच्या ब्लॉग मध्ये खूप काही विश्लेषणात्मक आहे अस नाही पण सर्वांच्याच आत्मपरिक्षणाच्या दृष्टीने त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न महत्वाचा राहतो. आरक्षण विषयक बहुतांश विश्लेषणातून काही मुद्दे सुटलेले आढळतात त्यांची दखल घेणे आणि डॉ.

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ९

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 20/11/2014 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
आठव्या डावात आनंदने निर्णायक विजय खेचून आणणे आवश्यक असताना नीरस बरोबरी झाली. मधल्या एका विश्रांतीनंतर आज नवव्या डावात आनंद 'डू ऑर डाय' परिस्थितीत आहे. काळी अथवा पांढरी मोहोरी न बघता त्याने विजयासाठीच प्रयत्न करणे आवश्यक आहे अन्यथा सामना पुरे १२ डाव देखील होणार नाही अशी (चेन्नै साधार) भीती वाटते! :( काळ्या मोहोर्‍यांकडून खेळताना आनंदने कायम बरोबरीचे ध्येय ठेवल्यासारखे आतापर्यंतच्या डावांत वाटत आले आहे. आज आनंद पुन्हा एकदा जोमदार प्रयत्न करेल अशी आशा ठेवूयात आणि डावाकडे वळूयात. अजून १५ मिनिटे आहेत. तोवर कोणीतरी पट लावा रे!! :)

कावळ्यांची शाळा

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 20/11/2014 15:40 या दिवशी प्रकाशित केले.

काकशाला

कावळ्यांची शाळा “ओकांना कावळे आवडते दिसतायत....”! … खरे आहे. पुण्यातल्या ओंकारेश्वराच्या आसपास नदीपार जवळून पास होताना सहज जाता जाता नुकतेच आईच्या अंत्यविधीसाठी जमलो असताना निर्माण झालेले दृष्य डोळ्यासमोर तरळले.

माझं कोकणातलं गांव :- भाग-६ माझा एन्रॉनमध्ये प्रवेश

लेखक प्रमोद देर्देकर यांनी गुरुवार, 20/11/2014 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे भाग भाग-१. भाग-२ . भाग-३. भाग-४. भाग-५ या लेखामालेतील पाचवा भाग प्रसिध्द झाल्यानंतर टंकनाचा कंटाळा आल्याने मध्येच ७ महिने निघुन गेले. त्यामुळे क्षमा असावी. मागिल लेखापर्यंत मी माझ्या कोकणातल्या गावाचे वर्णन केले होते.

नातं - भाग १

लेखक शिरीष फडके यांनी गुरुवार, 20/11/2014 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
नातं कुण्या एका गावाच्या वेशीवर एक कुटुंब छोट्याश्या घरात रहात असतं. आईवडील आणि त्यांची चार मुलं. आईवडील वेशीबाहेरच्या जंगलात जाऊन वनौषधी गोळा करून गावातल्या एका वैद्याला विकत असत. त्यातून मिळणार्या पैशांतून घर चालत असे. दोन वेळेचं जेवण कसंबसं भागत होतं. वडिलांकडे वंशपरंपरागत आलेलं वनौषधी आणि आयुर्वेदाचं ज्ञान त्यांना जंगलात वनस्पती निवडण्यात कामी येत होतं. आईचं काम होतं त्यांना मदत करणं आणि चूल पेटवण्यासाठी लाकडं गोळा करणं. कित्येक वर्षं हे नित्यनियमाने सुरू होतं. मुलं मोठी होत गेली. जसजशी मुलं मोठी होत गेली तसतसं आईवडील आणि मुलांमधलं अंतरही वाढत गेलं.

आम्ही अस्पृश्याची पोरे

लेखक देवदत्त परुळेकर यांनी गुरुवार, 20/11/2014 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
विठ्ठलाचा पुत्र रुक्मिणीचा बाळ संन्याशाचे पोर म्हणूनी अस्पृश्य   नका दे‌ऊ अन्न नका दे‌ऊ पाणी नका दे‌ऊ थारा पहा हा अस्पृश्य   सावली पडता दूर हो म्हणती शिव्या शाप देती म्हणती अस्पृश्य   दुषणे ठेविली भिक्षा नाही दिली मुंज नाही केली ठेविले अस्पृश्य   ज्ञानराज श्रेष्ठ भक्तराज श्रेष्ठ योगीराज श्रेष्ठ परि तो अस्पृश्य?   गीता उपदेशी बोले ज्ञानदेवी ज्ञान करी मुक्त परि तो अस्पृश्य?   विठोबाचा प्राण विसोबाचा गुरू नामयाचा बाप परि तो अस्पृश्य?   जनीची साजणी दीनांची मा‌उली संतांची सा‌उली तरी ती अस्पृश्य?
काव्यरस

छावणी - २

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 20/11/2014 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/29500 ******* ३ जून १९४७ !! या दिवशी दिल्लीहून आकाशवाणीवरुन एक महत्वाची घोषणा केली जाणार होती. जनाब जिन्हांना अपेक्षीत असलेलं पाकीस्तान मिळणार की नाही? हिंदुस्तान एकसंध राहणार की देशाची फाळणी होणार? फाळणी झालीच तर ती नेमक्या कोणत्या आधारावर? पश्चिमेला पंजाब आणि पूर्वेला बंगाल यांच्यातील नेमका कोणता भाग पाकीस्तानमध्ये जाणार? पाकीस्तान झालंच तर तिथल्या हिंदू आणि शीखांचं काय? त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार? पाकीस्तान की हिंदुस्तान? उभ्या हिंदुस्तानातील अनेकांचं भवितव्य या घोषणेवर अवलंबून होतं.