Skip to main content

भीतीच्या भिंती: १

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 05/12/2014 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
(नोंद: काबूलमधील वास्तव्यावर आधारित लेखमालिका. सुरक्षेच्या कारणांमुळे नावं बदलली आहेत. फार फोटोही देता येणार नाहीत.) १. एक तास जास्तीचा “विमानतळातून बाहेर पडलं की डाव्या बाजूला वळायचं, पाच मिनिटं चाललं की ‘पार्किंग बी’ अशी पाटी दिसेल, मी तिथं उभा असेन तू पोचशील तेव्हा” असं जॉर्जने मला लिहीलं होतं. आत्तापर्यंतचे सोपस्कार त्याने सांगितल्यानुसार पार पडले होते – आधी दोन फोटो देऊन आणि पासपोर्ट दाखवून नोंदणी करण्याचा सोपस्कार अपेक्षेपेक्षा फार सहजतेने पार पडला होता. माझा पासपोर्ट पाहून त्या दोनपैकी एका युवकाने “इंडिया?” असं विचारलं होतं.

मिपाकराशी भेटताना....

लेखक अमितसांगली यांनी शुक्रवार, 05/12/2014 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
'दोस्त फेल होता है तो दुख होता है, लेकिन जब वो फर्स्ट आता है तो और दुख होता है' असच काहीतरी माझ्या बाबतीत घडत होत. मग त्यातून सुरु झाला सुख,समाधान,अपेक्षा,मागण्या,स्वार्थी मदत,निस्वार्थी मदत यासारख्या शब्दांचा खेळ. पण कळत नकळत भातुकलीच्या या खेळाचे प्रचंड यातनांमध्ये कधी रुपांतर झाले व अपेक्षांच्या ओझ्याची तलवार कधी मानेवर ठेवली ते कळलेच नाही. लहानपणापासून समाजसेवा,संशोधन असले विचार डोक्यात होते. शिक्षण चालू असेपर्यंत त्या दृष्टीने प्रयत्नही करीत होतो. पण नोकरी लागली आणि प्रत्यक्षात GLAMOR या शब्दाचेच आकर्षण वाटू लागले. पैसा येऊ लागला,वाढू लागला पण त्याचबरोबर राहणीमान बदलले.

....... इथले संपत नाही

लेखक मित्रहो यांनी शुक्रवार, 05/12/2014 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
(कवी ग्रेस आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांची जाहीर माफी मागून.) थोडासा वेगळा प्रयत्न आहे, मूळ कवितेतील कमीत कमी शब्द बदलून विडंबन साधण्याचा प्रयत्न केलाय. मूळ कवितेत ५४ शब्द होते. एकूण शब्दसंख्या तशीच ५४ ठेवीत त्यातले फक्त १२ शब्द बदलून उर्वरीत ४२ शब्द तसेच ठेवून विडंबन साधण्याचा प्रयत्न केलाय.

देव भूमी......भाग-०२

लेखक मॅक यांनी शुक्रवार, 05/12/2014 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
तिस-या दिवशी.... सकाळी लवकर पेरीयार साठी प्रस्थान करावयाचे होते.... प्रवासात मध्येच प्रसिध्द अशी केरळची शान असणारी अल्लापल्ली ते निडूमुडी अशी तेरा किमी लांबीची बॅक वॉटर राईड केली...अल्लापल्ली येथून बस सोडून राईड बोट मध्ये बसून राईड सुरू झाली मध्यंतरी एका ठिकाणी एका छोट्याशा हॉटेलवर केरळातील पारंपारीक पध्दतीचे जेवण केले...... आणि पुन्हा राईड सुरू झाली ती निडुमुडीच्या दिशेना.... या प्रवासात केरळला देवभूमी असे का म्हणतात? याचा प्रत्यय येतो.... या राईड मध्ये आपण राष्ट्रीय जल मार्ग क्र.03 ने 13 किमी चा प्रवास करतो....

देव भूमी......भाग-०१

लेखक मॅक यांनी शुक्रवार, 05/12/2014 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
तस पाहिले तर केरळ बाबत ख़ुप लोकानी आज पर्यत लिहल आसेल पण ..... तरीही मी एक प्रयत्न करतोय...पहा अआवडला तर जरूर सागा...... पदवीच्या शेवच्या वर्षाला असताना खोली घेऊन रहात होतो. वर्ष होत 2006..... तीन रूम पार्टनर आणि एक मी. कुणीतरी बातमी आणली कराडला पुस्तक प्रदर्शन भरलय... झालं.... ;लगेच रविवारी कराड... माझी तशी काही इच्छा नव्हती जायची पण रूमवर बसून तरी काय करणार म्हणून मी पण गेलो..... प्रदर्शन खुपच छान आणि मोठं होत.... बाकी तिघांनी बरीच पुस्तक खरेदी केली मी काही घेतलं नव्हतं.... पण अगदी शेवच्या दालनात आल्यावर एक पुस्तक नजरेस पडलं....

भाषा तुझी-ती-माझी

लेखक शिरीष फडके यांनी शुक्रवार, 05/12/2014 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
भाषा तुझी-ती-माझी एका गावातील एक शिक्षक. एके दिवशी शाळा आटपून घरी येतो तर दरवाज्यात / पुढयात एक पत्र. आपल्याला कोण आणि का पत्र लिहिल? आपल्या तर मागे-पुढे कुणी नाही मग चुकुन आपल्या घरात पत्र पोस्टमन काकांनी टाकलं की काय? पण असं कसं होईल? काकांना तर अख्या गावातला कोपरा न कोपरा माहीत आहे मग ते चुकीच्या पत्त्यावर कसे बरे देतील? अशी प्रश्नांची मालिका डोक्यात चालू असताना बाहेर वीज कडाडली आणि तो प्रश्नांच्या जंजाळातून बाहेर आला. जणू काही त्याच्या डोक्यातील वाढत्या प्रश्नांची मालिका खंडित करण्यासाठीच ती वीज कडाडली होती.

फोडणीचे खमंग डोसे

लेखक जागु यांनी शुक्रवार, 05/12/2014 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
मिठ १ वाटी तांदळाचे पिठ अर्धी वाटी रवा पाऊणवाटी दही फोडणीसाठी : १ चमचा राई/मोहरी १ चमचा जीरं २ मिरच्यांचे तुकडे थोड कढीपत्ता फोडणीच्या गरजेनुसार तेल