Calligraphy: देवनागरी सुलेखन तक्ता
डिस्क्लेमर १ - खालील कैच्याकै क्यालिग्राफी उर्फ सुलेखन पाहून कोणाला आम्हांस शिव्या द्यायची इच्छा झाल्यास अवश्य द्या. ;-) आमच्याकडून हे पातक करवून घ्यायची कल्पनेची आयडिया ही मिपाचे माननीय सुपरशेफ गणपाशेट यांची आहे. तेव्हा खालील कित्त्यांकडे पाहून कोणाला जे काही वाटेल ते सर्व मिररवरून परावर्तित होऊन त्यांच्याकडे जाणार आहे. यात त्यांना आमचा पत्ता देणार्या माननीय पैसाताईंचापण वाटा आहे.
डिस्क्लेमर २ - आपल्याला द्येव्वनाग्री क्यालिग्राफी काही येत नाही. तेव्हा चुकल्यामाकल्या वळणांकडे दुर्लक्ष केले जावे. खाली दिलेली उदाहरणे ही इंडिकेटिव्ह आहेत. फॉन्ट-फॉन्टमध्ये फरक असू शकतो. माझ्याकडे देवनागरीसाठी वापरला जाणारा बोरू वगैरे नव्हते. नेहमीचा जो डावीकडे कातरलेला बोरू बाजारात मिळतो तो रोमन लिपीच्या कॅलिग्राफीसाठी योग्य असतो. त्याने देवनागरी सुलेखन करता येत नाही. देवनागरीसाठी उजवीकडे कातरलेला बोरू मिळतो, तो घ्यावा. तसेच शाई वापरावी. त्यासाठीही खास गडद शाई मिळते. मी खालील सुलेखन हे घरात बरेच दिवस पडून असलेल्या साध्या A-4 कागदांवर काळ्या जलरंगाने व चार नंबरच्या सपाट (फ्लॅट) ब्रशने केले. त्यामुळे त्या कागदांचा सदुपयोगपण झाला आणि जलरंगांच्या पेटीतील कधीही न वापरला जाणारा एक रंगही संपला! (FYI: जलरंगचित्रणात काळा आणि पांढरा रंग वापरला जात नाही. कागदाचा पांढरेपणा आणि वेगवेगळे रंग एकत्र करून बनवलेले गडद मिश्रण वापरले जाते.) बोरूने जास्त सुबक सुलेखन करता येईल.
आता वेळ नाही. आकृत्यांमध्ये जास्तीत जास्त पायर्या दाखवल्या आहेत. काही शंका असल्यास अजिबात विचारू नये. :-D
स्वर - अ अॅ आ ऑ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः ऋ ॠ ऌ ॡ यातील अ, इ, उ, ऋ आणि ऌ हे र्हस्व स्वर आहेत तर उरलेले दीर्घ स्वर आहेत.
ब्रशने दिलेल्या स्ट्रोकची जाडी सुमारे आठ ते दहा मिमी इतकी येत असल्याने मी त्याच्या सहापट मिडल झोनची उंची ठेवली. तसेच अडीच-अडीच पट जागा ही टॉप झोन आणि बॉटम झोनसाठी ठेवली. टॉप झोनमध्ये वेलांट्या, मात्रा वगैरे येतात. बॉटम झोनमध्ये 'द' सारख्या अक्षरांचे पाय तसेच उकार वगैरे येतात.
दुसरे असे, की तुम्ही जर साध्या पेनने किंवा बोरूने सुलेखन करणार असाल तर देवनागरी अक्षरांवरील आडवी दांडी ही सर्वात शेवटी दिली जाते. पूर्ण शब्द किंवा अक्षर काढून झाल्यावर. इथे साइनबोर्ड पेंटिंगची पद्धत वापरली आहे. त्यात आधी आडवी रेघ देतात. (ज्ञानामृत स्रोत - लहानपणी पेंटरांचं नीरस शासकीय पाट्या रंगवण्याचं काम तासन् तास न्याहाळणे. आता तो वर्गच दुर्मिळ झाला बिचारा. फ्लेक्सने वाट लावली या धंद्याची!)
अं आणि अः (अनुस्वार आणि विसर्ग) हे स्वर नसून व्यंजने मानली जातात.
व्यंजने -
कंठव्य - क, ख, ग, घ, ङ
ख च्या दोन पद्धती दाखवल्या आहेत. जी आवडेल ती वापरा. जुन्यासारखी 'रव' ही पद्धत आता वापरात नाही. महाराष्ट्र शासनाने अशा श, ल यांच्या वळणांसारख्या काही गोष्टी हिंदीतून आयात केल्या असे मध्ये कधीतरी वाचले होते. असोत.
तालव्य - च, छ, ज, झ, ञ
मूर्धव्य - ट, ठ, ड, ढ, ण
दंतव्य - त, थ, द, ध, न
ओष्ठव्य - प, फ, ब, भ, म
विशिष्ट व्यंजने - य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ, क्ष, ज्ञ
ल जुने मराठी वळण आणि दांडीवाले हिंदीतून घेतलेले वळण.
श चे पण तसेच. डावीकडचे जुने वळण.
यातील ज्ञ, क्ष, श्र, क्त वगैरे व्यंजने ही जोडाक्षरे असल्याने काही वेळा त्यांचा समावेश वर्णमालेत स्वतंत्र व्यंजन म्हणून केला जात नाही. पण मी बालवाडीत वगैरे जे शिकलेलो आठवतंय त्यानुसार इथे क्रम दिला आहे.
वेलांटीची पद्धत - र्हस्व आणि दीर्घ वेलांट्या. यात वेलांट्यांच्या कुठल्या बाजू टेकलेल्या आहेत व कुठपर्यंत त्या खेचायच्या याकडे लक्ष द्या.
उकार - र्हस्व आणि दीर्घ
रु आणि रू
काही जोडाक्षरे -
र इतर अक्षरांना जोडण्याच्या पद्धती
ह इतर अक्षरांना जोडण्याचा पद्धती
द्य - हे वळण मी दिले आहे तसे आधुनिक पद्धतीने काढावे. हीच पद्धत द्ध सारख्या इतर जोडाक्षरांनाही वापरावी. त्यामुळे 'मु्द्द्याचे' हा शब्द नीट लिहीता येईल. इथे मिपावर दिसतो तसा नका लिहू.
आणि हे अंक -
हुश्श...! बास झालं, आता तुमचं तुम्ही गिरवत बसा! आमची बेडरेस्ट संपली... ;-) (गणपाशेठ, खुश?) जाताजाता - शुद्धलेखनाशिवाय सुलेखन म्हणजे रंगलेल्या मैफिलीत गायिकेला लागला ठसका. तेव्हा आधी शुद्धलेखन शिकावे. :-)

वाचने
59149
वाचनखूण
प्रतिक्रिया
70
मस्तच
प्राथमिक तरीही आवश्यक असे.
बापरे केवढी ती चिकाटी!!
In reply to बापरे केवढी ती चिकाटी!! by सखी
+१
In reply to +१ by मधुरा देशपांडे
+२
आता 'हाताने' लिहिणं हे
In reply to आता 'हाताने' लिहिणं हे by आतिवास
हो ना! ते इ काढून काढून
मस्तच..........
फारच छान!
In reply to फारच छान! by बहुगुणी
त्यामुळे द्द हे दोनदा सुटे
In reply to त्यामुळे द्द हे दोनदा सुटे by एस
अनेकानेक धन्यवाद..
In reply to त्यामुळे द्द हे दोनदा सुटे by एस
आणि हो..
अप्रतिम
In reply to अप्रतिम by श्रीरंग_जोशी
तुमच्या चिकाटीला व
तुमच्या चिकाटीला व परिश्रमांना सलाम.अगदी असेच म्हणेन. मला एलिमेंट्री चित्रकलेची परीक्षा आठवली.मस्त !
झक्कास!
_/\_ धन्स.
In reply to _/\_ धन्स. by गणपा
गिरवा गिरवा!
लहानपणी काही गोष्टी आमच्या
माझा अत्यंत आवडता विषय !!
मनःपूर्वक धन्यवाद !
जबरदस्तच रे !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे. ;)मस्तच!
मस्त लेख...
In reply to मस्त लेख... by मुक्त विहारि
:-D
In reply to :-D by एस
बहूदा....
भारी आहे राव.
सुलेखन करण्यासाठी बोरु ?
१अ) शुध्+द शुधद शुध्द .बरोबर
In reply to १अ) शुध्+द शुधद शुध्द .बरोबर by कंजूस
१अ) शुध्+द शुधद शुध्द .बरोबर
In reply to १अ) शुध्+द शुधद शुध्द .बरोबर by एस
माहितीपूर्ण.
In reply to १अ) शुध्+द शुधद शुध्द .बरोबर by कंजूस
आपण मराठीत जोडाक्षर शक्यतो
आपण मराठीत जोडाक्षर शक्यतो उच्चाराप्रमाणे पूर्ण अक्षरास अर्धे अक्षर जोडतो जसे रत्+नागिरी रत्नागिरी ,अन्+तू अन्तू बर्वा परंतू कानडीत याला बहुधा उलट (=रन्तागिरी)करतात.होय. कन्नडमध्ये रत्नागिरी (ರತ್ನಾಗಿರೀ)च लिहितात. 'त्न'साठी 'ತ್ನ್' इतकेच. आणी काना याच ತ್ನ್ (त्न) ला दिला जातो. त्यामुळे असे वाटते की, 'त'ला काना दिलाय आणी 'न' अर्धं काढलंय. रन्तागिरी असे लिहिता येते:- ರಂತಾಗಿರೀकाही माहिती..
In reply to काही माहिती.. by चौकटराजा
अगदी अगदी..
मस्त धागा.
बॉलपेन आल्यापास्नं
Calligraphy: देवनागरी सुलेखन तक्ता
या धाग्याने घाम काढला!
तुम्ही हे सगळं स्वहस्ते लिहून
परत माझा एक प्रयत्न !!
In reply to परत माझा एक प्रयत्न !! by खटपट्या
वा!
In reply to वा! by एस
साधा हायलायटर मार्कर आहे.
In reply to परत माझा एक प्रयत्न !! by खटपट्या
मस्त !
In reply to परत माझा एक प्रयत्न !! by खटपट्या
अप्रतिम!
In reply to परत माझा एक प्रयत्न !! by खटपट्या
भारी ...
In reply to भारी ... by चौकटराजा
सर्वान्चे धन्यवाद
In reply to परत माझा एक प्रयत्न !! by खटपट्या
मस्तच जमलं आहे.
धन्यवाद स्वॅप्स साहेब,
स्वॅप्स साहेब, खूप सुंदर क्यालिग्राफी !
मी २००२ की २००३ मध्ये अच्युत